Maharashtra Vidhan Sabha Election Updates Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. त्यात दोन दिवस आधीच प्रचार संपणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. त्यात महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही आघाड्यांमधील पक्षांचा समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रचाराचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra News Today, 08 November 2024: राज्यात सभांचा धडाका, प्रचार शिगेला!
चिपळूण : महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली. २०१४ पूर्वी केंद्राच्या उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के होता, तो आता १३ टक्केवर घसरला घसरला आहे. दरडोई उत्पन्नातही २०१६ पासून महाराष्ट्र गुजरातच्याही मागे गेला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे मोदी आणि शहा यांना घाबरतात. ७० हजार कोटी घोटाळ्याचे आरोप झाल्यावर लाचार होऊन शरमेने मान खाली घालत राष्ट्रवादीचे ४० आमदार भाजपात गेले. या गद्दारीला जनता माफ करणार नाही. या विधानसभा निवडणूकीत गद्दारांना जनता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चिपळूणातील प्रचार सभेत केले.
नाशिक - विधानसभा निवडणुकीत विभागातील पाचही जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, त्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिल्या आहेत.
स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती संदर्भातील उपक्रमांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला. पाचही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, स्वीपचे मुख्य अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती.
लोकसभा निवडणूकीत मोठ्याप्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी विधानसभा मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी केली आहे,
नागपूर : दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मुख्य लढत भाजपच्या देवेंद्र फडणवीस आणि कॉँग्रेसच्या प्रफुल गुडधे पाटील यांच्यात होत असली तरी मैदानात इतर दहा उमेदवारही जोरदार प्रचार करत आहे. यापैकीच एक असलेले अपक्ष उमेदवार सचिन वाघाडे त्यांच्या अनोख्या प्रचारामुळे सध्या चर्चेत आहेत. दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील शंकरनगर परिसरातील त्यांचे प्रचाराचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.
बुलढाणा : लोकसभेच्या निवडणुकीत ‘अबकी बार चारसो पार’ च्या वल्गना करणाऱ्या महायुतीचे चौखूर उधळलेले खेचर दिल्लीसमोर कधीच न झुकणाऱ्या महाराष्ट्राने रोखले. आताही सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने प्रज्वलित झालेल्या मशालीच्या ज्वालानी गद्दारांचा कारभार भस्मसात होईल. आघाडी सत्तेत आली तर जिथून गद्दार आसामकडे पळाले त्या सुरत शहरासह महाराष्ट्रात सर्वत्र छत्रपती शिवरायांची मंदिरे उभारणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदार संघात काँग्रेसने बौध्द समाजातील सामान्य कार्यकर्ता प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी दिली. परंतु, आर्थिकदृष्ट्या अशक्त या उमेदवाराला प्रचारात काँग्रेसच्या नेत्यांनी वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांना तंबी दिल्यानंतर अजित गव्हाणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आमदार महेश लांडगे यांना पराभव दिसत असल्याने अशी वक्तव्य करत असल्याचं अजित गव्हाणे यांनी म्हटलं आहे. अजित गव्हाणे हे पिंपरी- चिंचवड मध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा जोरदार धडाडत असून नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. पश्चिम विदर्भातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा ९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता अकोल्यात होणार आहे.
भाजपावाल्यांची आणि मोदींची आम्हाला कमाल वाटते आहे की तुम्ही चोर-दरोडेखोरांना घेऊन आमच्यावर कसे काय चालून येत आहात? भाजपाला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा आम्ही तुम्हाला साथ दिली. शिवसेना नसती तर मोदीही पंतप्रधान झाले नसते आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा भ्रम तुम्ही निर्माण केलात. वर गेल्यानंतर आम्हाला लाथा घालू लागलात? ठीक आहे तुमचं तंगडं धरुन तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर भिरकावून दिलं नाही तर मी छत्रपती शिवाजी महाराज की जय हे बोलणार नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
पनवेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्यावतीने लीना गरड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी राजीनामास्त्र उघारुन शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा जाहीर प्रचार सूरु केल्याने निवडणूकीला अवघे १२ दिवस शिल्लक असताना स्थानिक शिवसैनिकांची सुटलेली साथ ही गरड यांना परवडणारी नसून गरड या प्रचारात पिछाडीवर आणि एकाकी पडल्याचे चित्र आहे. सविस्तर वाचा…
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत चर्चेत असलेले भाजपचे माजी आमदार आणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुळीक यांची भेट घेऊन त्यांना आमदारकीचा शब्द दिला. सविस्तर वाचा…
‘लाडकी बहीण’साठी सरकारने तिजोरी रिकामी केली असून रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटींच्या कर्जाची मागणी करावी लागली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. सविस्तर वाचा…
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबईतील व्यवसायिकाच्या ठिकाणावर केलेल्या कारवाईत सव्वा दोन कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली आहे.
निवडणूक काळात वसई विरार शहरात पैशांचा पाऊस सुरूच आहे. शुक्रवारी सलग दुसर्या दिवशी विरार २ कोंटी रुपयांची रोकड पालिकेच्या भरारी पथकाने जप्त केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live: राज ठाकरेंचं गुहागरमध्ये सत्ताधाऱ्यांवर टीकास्र
सलमान-शाहरूखचे चित्रपट शुक्रवारी पडले तर सोमवारी नवीन चित्रपट सुरू करता येतात. पण निवडणुकांमध्ये एकदा पडलं की पाच वर्षं निवडणुका येत नाहीत. पुढची पाच वर्षं तुमच्या-आमच्या आयुष्यातली निघून जातात. किती वर्षं आपण त्याच त्याच मुद्द्यांवर निवडणुका लढवणार? तुम्ही चुकीची माणसं निवडून दिली हे तुमचं दुर्भाग्य - राज ठाकरे</p>
नवी मुंबई : गुरुवारी रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास कोपरखैरणे सेक्टर १७ येथे प्रेशर कुकर वाटप करण्याचा प्रयत्न करत असताना निवडणूक आयोगाने कारवाई केली. कुकरवर ऐरोलीचे अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचे छायाचित्र असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन कार कुकर वाटप करीत असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून गाड्या पकडल्या . दोन्ही गाड्या आणि आतील प्रेशरकुकर जप्त करून घेऊन गेले आहे. प्रेशर कुकर वाटप सुरू होते जे नियम बाह्य आहे. त्यावर अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचे छायाचित्र असले तरी कुकर नेमके कोण वाटप करीत आहे. याचा शोध घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती देण्यात आली.
PM Narendra Modi Maharashtra Daura Live: मोदींनी महाविकास आघाडीला लगावला टोला!
काही लोक लोकांना लुटण्यासाठी राजकारणात आले आहेत. असे महाविकास आघाडीसारखे लोक सरकारमध्ये आले की विकास ठप्प करून टाकतात. प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात - पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>
PM Narendra Modi Maharashtra Daura Live: मोदींनी महाविकास आघाडीला लगावला टोला!
महाराष्ट्राला हवं असलेलं सुशासन फक्त महायुतीच देऊ शकते. तिकडे महाआघाडीच्या गाडीला ना चाकं आहेत, ना ब्रेक आहेत आणि चालकाच्या जागेवर बसण्यासाठीही वाद चालू आहेत - मोदी
PM Narendra Modi Maharashtra Daura Live: मोदींनी भाषणात केला २०१४ चा उल्लेख...
मी महाराष्ट्राकडे जेव्हा कधी काही मागितलं, तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेनं मला मनमोकळेपणाने आशीर्वाद दिले आहेत. २०२४ ला मी धुळ्यात आलो होतो. राज्यात भाजपाचं सरकार आणावं असा आग्रह मी केला. तुम्ही महाराष्ट्रात १५ वर्षांच्या अंतराने भाजपाला अभूतपूर्व विजय मिळवून दिला होता. आज पुन्हा एकदा मी धुळ्याला आलो आहे. इथूनच मी महाराष्ट्रात निवडणूक प्रचार मोहिमेला सुरुवात करतोय - पंतप्रधान नरेंद्र मोदी</p>
Deoli Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेत वर्धा जिल्हा १०० टक्के भाजपमय करण्याचा निर्धार पक्ष नेते गत दोन निवडणुकांपासून सोडून बसले आहे. मात्र काँग्रेसच्या रणजित कांबळे यांना ते तोड देवू शकले नसल्याने जिल्हा व वरिष्ठ भाजप नेते प्रामुख्याने देवळीत लक्ष ठेवून आहेत.
PM Narendra Modi Maharashtra Daura Live: देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा केला वोट जिहादचा उल्लेख!
ही निवडणूक म्हणजे वोट जिहादविरोधात एकत्र येऊन मतदान करण्याची निवडणूक आहे - देवेंद्र फडणवीसांचं धुळ्यातील सभेत आक्रमक भाष्य
PM Narendra Modi Maharashtra Daura Live: मोदींचं धुळ्यात प्रचारसभेसाठी आगमन
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारसभेसाठी धुळ्यात दाखल. महाराष्ट्र विधानसभेसाठीची ही मोदींची पहिली प्रचारसभा आहे.
सोलापूर : देशात स्वातंत्र्यानंतर प्रथमच २०१४ नंतर गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा खरा विकास झाला आणि देश सुरक्षित राहिला आहे. त्यातूनच संपूर्ण जगाला भारताच्या शक्तीची जाणीव झाली आहे, असा दावा राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीत सोलापुरात भाजपच्या प्रचारासाठी भजनलाल शर्मा यांच्या उपस्थितीत स्थानिक मारवाडी समाजाचा मेळावा पार पडला. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री शर्मा बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर सडकून टीका केली.
ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला आणखी पुढे विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी खरी वेळ आली आहे.
देशात अनेक वर्षं सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस पक्षाने फुटीरतावादाला खतपाणी घालण्याशिवाय दुसरे काम केले नाही. काँग्रेसने नेहमीच जाती-धर्माच्या नावाने मते मागितली. काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराचे उगमस्थान राहिला आहे. भ्रष्टाचार आणि घराणेशाहीशी काँग्रेसचा नेहमीच निकटचा संबंध राहिला असल्याची टीका शर्मा यांनी केली. राज्यात काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न चालविला असून त्यापासून सर्वांनी सावध राहून पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजपला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
चिमूरमध्ये थेट लढतीमुळे कीर्तीकुमार भांगडिया अडचणीत
चंद्रपूर : क्रांतीभूमी चिमूर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया व काँग्रसचे डॉ. सतिश वारजूकर यांच्यात थेट लढत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले ३८ हजारांचे मताधिक्य व ‘अँटिइन्कम्बन्सी’मुळे भांगडिया यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सर्वात दक्ष व विशेष खबरदारी सर्वच राजकीय पक्षाचे उमेदवार घेत असून मोबाईलवर बोलणे बंद, असे बंधनच त्यांनी स्वतःला घालून घेतले आहे. एकदाचे ‘ निरोप ‘ पोहचले नाही तरी चालेल, पण व्हॉटसअॅप कॉल शिवाय बोलणे नकोच.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला. या नाऱ्यावर महायुतीमधील घटक पक्ष अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सविस्तर वृत्त वाचा
ईडीमुळे आम्ही भाजपाशी हातमिळवणी केली, असा दावा छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात केला आहे. या पुस्तकातील बाहेर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर आता छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वृत्त वाचा
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live: देवेंद्र फडणवीसांना झालंय तरी काय? - सुप्रिया सुळेंचा प्रश्न
देवेंद्र फडणवीसांना झालंय तरी काय? महाराष्ट्रात एका गृहमंत्र्यांचे बॅनर 'बदलापूर' लिहून व्हायरल होतात. ते त्यांनी लावले नसतील, पण नंतर काढायलाही लावले नाहीत. नंतर अजित पवारांवर आरोप केल्यानंतर त्याची फाईल स्वत:च त्यांना दाखवली. बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारची विधानं ते करतायत. ते म्हणाले दोन पक्ष फोडून मी सरकारमध्ये आलोय, ही काय कौतुकाची गोष्ट आहे का? राहुल गांधींनी हातात संविधान घेऊन फोटो दिला, भाषण केलं. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतलं - सुप्रिया सुळे</p>
Maharashtra Assembly Election 2024 Live: देवेंद्र फडणवीसांना सुप्रिया सुळेंचं आव्हान!
मी देवेंद्र फडणवीसांशी अतिशय नम्रपणे ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ती वेळ, हव्या तेवढ्या कॅमेऱ्यांसमोर चर्चा करायला तयार आहे. भुजबळांच्या विधानाबाबतच्या चर्चेतलं काहीही खोटं असेल, तर त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यावं - सुप्रिया सुळे</p>
ईडीपासून सुटकेसाठीच भाजपाबरोबर अजित पवार गटानं युती केल्याचं छगन भुजबळांनी मान्य केल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्या पुस्तकात केला होता. हा दावा आता छगन भुजबळांनी फेटाळून लावला आहे. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असतानाच आपल्याला क्लीनचिट मिळाली होती, असं ते म्हणाले आहेत. तसेच, पुस्तक वाचल्यानंतर त्यावर भाष्य करेन, असंही ते म्हणाले.