Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: “शाहरूख-सलमानचे चित्रपट शुक्रवारी पडले तरी…”, राज ठाकरेंची गुहागरमध्ये टोलेबाजी!

2024 Maharashtra Assembly Election Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स एका क्लिकवर!

Raj Thackeray
राज ठाकरे, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Maharashtra Vidhan Sabha Election Updates Today: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. त्यात दोन दिवस आधीच प्रचार संपणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. त्यात महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही आघाड्यांमधील पक्षांचा समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रचाराचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Today, 08 November 2024: राज्यात सभांचा धडाका, प्रचार शिगेला!

10:54 (IST) 8 Nov 2024
पिंपरी- चिंचवड: लांडगे संतापले; “कार्यकर्त्यांला त्रास दिल्यास वीस तारखेनंतर चा महेश लांडगे डोळ्यासमोर ठेवा”; शांततेचा अंत…

भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आमदार महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्याला विरोधकांनी त्रास दिल्याने लांडगे यांनी विरोधकांना तंबी दिली आहे. माझ्या कार्यकर्त्याला कोणी त्रास दिल्यास मी सहन करणार नाही. सविस्तर वाचा…

10:54 (IST) 8 Nov 2024
पिंपरीत भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; आतापर्यंत १३ माजी नगरसेवकांचे पक्षांतर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड भाजपमधील अंतर्गत खदखद बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. पक्षाच्या १३ माजी नगरसेवकांनी आतापर्यंत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यात सर्वाधिक आठ नगरसेवक भोसरीतील आहेत. सविस्तर वाचा…

10:53 (IST) 8 Nov 2024
भोसरीत भाजपकडून ‘ऑनलाइन लक्ष्मी दर्शन’?, कोणी केला हा गंभीर आरोप

लोकसभा निवडणुकीवेळी मध्यरात्री बँकांच्या शाखा खुल्या ठेवूनही काय झाले ते राज्याने पाहिले. आता भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या ‘डिजिटल इंडिया’चा चांगलाच प्रचार सुरू आहे. सविस्तर वाचा…

10:52 (IST) 8 Nov 2024
पिंपरी : ‘याला पाडा,त्याला गाडा ही कुठली संस्कृती’; पंकजा मुंडे यांचा हल्ला

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी गेल्या दहा वर्षांत समाविष्ट गावांमध्ये अनेक कामे करून दाखवली आहेत. ही कामे केल्यानंतरही केवळ विरोधाला विरोध आणि राजकारणात टिकायचे म्हणून टीका करायची. सविस्तर वाचा…

10:50 (IST) 8 Nov 2024
Tasgaon Kavathe Mahankal Assembly Elections : ‘एक मत, दोन आमदार’ तासगाव – कवठेमहांकाळमध्ये वेगळाच प्रचार

एक मत, दोन आमदार’, या प्रचारामुळे तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. महाआघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील आणि महायुतीचे, राष्ट्रवादी काँग्रेस<a rel=”noamphtml” id=”event-213650″ data-post-id=”event-213650″ data-event-category=”Keyword_To_URL_widget” data-event-action=”click” data-event-label=”Desktop_4697687″ class=”ie-click-event” href=”https://www.loksatta.com/about/ajit-pawar/”> अजित पवार पक्षाचे उमेदवार संजय पाटील यांच्यात जोरदार आरोप – प्रत्यारोप होताना दिसत आहे. सविस्तर वाचा…

10:44 (IST) 8 Nov 2024
अर्जुनी मोरगावात बहुरंगी लढत; महायुतीपुढे बंडखोरांचे, तर आघाडीपुढे नाराजांचे आव्हान

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघांत बहुरंगी लढत रंगण्याची चिन्हे आहे. महायुतीसमोर बंडखोरांचे, तर महाविकास आघाडीपुढे नाराजांचे आव्हान असणार आहे.

वाचा सविस्तर…

10:23 (IST) 8 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election: संजय राऊतांचा शिंदे व अजित पवार गटावर हल्लाबोल

प्रताप सरनाईक काय म्हणतायत, भावना गवळी काय म्हणतायत याला आता काही अर्थ नाही. हे एकनाथ शिंदे, अजित पवारांपासून सगळे पक्ष सोडून गेले ते ईडीपासून बचाव करण्यासाठीच. तसं नसतं तर भाजपात जाताच प्रफुल्ल पटेलांसह इतर अनेकांच्या मालमत्ता मोकळ्या झाल्या नसत्या, ईडी-सीबीआयच्या फायली बंद करून कपाटात ठेवल्या नसत्या. या सगळ्यांचं पलायन ईडीला घाबरून झालेलं आहे.

छगन भुजबळ, त्यांचा पुतण्या तुरुंगात जाऊन आले आहेत. त्यांची मालमत्ता अजूनही जप्त आहे. प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता. म्हणून त्यांनी आपापल्या पक्षाच्या, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. आता लपवाछपवी कशाला करताय? – संजय राऊत</p>

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह (फोटो – लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

Maharashtra News Today, 08 November 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!

Web Title: Maharashtra assembly election 2024 live pm narendra modi nashik maharashtra rally today amit shah sangli sabha chhagan bhujbal bjp raj thackeray ajit pawar news pmw

First published on: 08-11-2024 at 10:22 IST