Maharashtra Politics Updates Today : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात, भाजपाचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नवाब मलिक, समीर भुजबळ आदी काही महत्त्वाचे बंडखोर माघार घेतात का, याकडे आता सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल त्यांनी १३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आज अचानक निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. याशिवाय राज्यातील इतरही राजकीय घडामोडींकडे आपले लक्ष राहणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Live Today, 04 November 2024 : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार
धाराशिव, दि. ४ : विविध पक्षातून उमेदवारी न मिळाल्यामुळे राजकीय महत्वकांक्षा असलेल्या अनेकांनी मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी मिळेल, असा कयास बांधला होता. सोमवारी सकाळी जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढण्याचा अधिकृत निर्णय जाहीर केला आणि मराठा समाजाच्यावतीने उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी करीत असलेल्या अनेकांच्या इच्छेवर पाणी फिरले. जरांगे पाटील यांची सोबत नसेल तर निवडणुकीत डाळ शिजणार नाही, हे पुरते ओळखून असलेल्या अनेक उमेदवारांनी आखाडा पेटण्यापूर्वीच निवडणुकीच्या रणांगणातून माघार घेतली आहे. धाराशिव जिल्ह्यातील एकूण चार विधानसभा मतदारसंघातून तब्बल ९८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला.
भाईंदर :- गेल्या अनेक वर्षांपासून मिरा भाईंदर शहरात स्थानिक पातळीवर सुरु असलेला शिवसेना-भाजप महायुतीमधील वाद अखेर शमला आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी मिरा भाईंदर शहरात भाजप-शिवसेना पक्षातील वाद जुना आहे. शहरातील दोन्ही पक्षाच्या संघटना एकमेकांच्या कडव्या विरोधक असल्यामुळे याचा फटका महायुतीला बसत आला आहे. यात प्रामुख्याने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यातील वाद शिगेला पोहोचल्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत मेहता यांचा पराभव झाला होता. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या मताधिक्यात कमी झाल्याचे दिसून आले होते.
ठाणे : मनसेचे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार आणि सध्या अधिकृत उमेदवार असलेले राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे.
यवतमाळ : जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात ७७ उमदेवारांनी नामांकन अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात १०२ उमेदवार आहेत
अमरावती : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक बंडखोरांनी आपल्या तलवारी म्यान केल्या. परंतु, बडनेरा, अमरावती, अचलपूर, दर्यापूर, मोर्शी मतदारसंघांमधील सात बंडखोर निवडणुकीच्या रणांगणात कायम आहेत.
“काल तासगावमध्ये झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. मला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात आहे. माझ्या लोकांना माझ्यावर विश्वास आहे. अशा पद्धतीचं बदनामीचं राजकारण कोण करतंय हे लोकांना माहिती आहे. लोकं त्यांना उत्तर देतील”, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पाटील यांनी दिली आहे.
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघात वंचितने काँग्रेसचे युवा नेते तथा महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते डॉ. झिशान हुसेन यांना ऐनवेळी उमेदवारी दिली होती.
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे प्रदेश उपाध्यक्ष संदीप बाजोरीया यांनी दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असे जाहीर करून येथील काँग्रेसची झोप उडविली होती. मात्र पक्षनेते शरद पवार यांच्या सुचनेनंतर त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. संदीप बाजोरीया यांच्या निर्णयाने यवतमाळात महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.
नागपूर : जिल्ह्यातील विधानसभेच्या १२ जागांपैकी सर्वात लक्षवेधी ठरलेल्या रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी येथील शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात केलेल बंड कायम आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-शिंदे गटाच्या दोन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठं यश. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून अविनाश हैबत राणे आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून धनराज हरिभाऊ महाले यांनी आज माघार घेतली.
राजन विचारेंच्या उमेदवारीने ठाण्यात संजय केळकर यांना बळ
ठाणे : राजन विचारे यांच्या उमेदवारीमुळे केळकरांमागे बळ उभे करावे लागत असल्यामुळे ठाण्यातील शिंदे सेनेच्या नेत्यांची अवस्था इकडे आड तर तिकडे विहीर अशी झाली आहे.
Diwali Milan Function Chandrapur – चंद्रपूर : भाजप नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी राजकीय दिवाळी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. चंद्रपूरचे भाजप उमेदवार आमदार किशोर जोरगेवार यांना मतदारांसमोर ‘प्रोजेक्ट’ करण्यासाठी आयोजित या स्नेहमिलन सोहळ्यात राज्याचे वनमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार निमंत्रित नव्हते. त्यामुळे या राजकीय स्नेहमिलन सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
इंदापूरमध्ये प्रवीण मानेंची बंडखोरी कायम, तिरंगी लढत होणार
राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात पिपाडा यांची बंडखोरी कायम
आंबेगावात महाविकास आघाडीत बंडखोरी कायम
शेवगाव-पार्थडीमधून भाजपाच्या बंडखोर उमेदवाराची माघार
पुरंदरमध्ये महायुतीत बंडखोरी कायम, अजित पवार गटाच्या संभाजी झेंडेंची माघार नाही
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती.
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनोज जरांगे यांच्याकडे विविध मतदारसंघात आंदोलनातील सामान्य सक्रिय कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केले होते. अनेकांनी प्रचाराच्या एक-दोन फेऱ्याही पूर्ण केल्या होत्या. जरांगे यांनी अखेरच्या क्षणी भूमिका बदलल्याने इच्छुकांचा हिरमोड होऊन नाराजांची संख्या वाढली. समाजात वेगळा संदेश गेल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली. याचा मराठा आरक्षणासाठी चाललेल्या आंदोलनास फटका बसणार असल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
या बेकायदा इमारतीवर कारवाई करावी म्हणून गेल्या दीड महिन्यापासून जागरूक नागरिक विनोद जोशी मुंंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.
या आगीची नेमकी कारणे अद्याप समजू शकलेली नसली तरी फटाके तसेच अन्य कारणांमुळे आग लागण्याच्या घटना घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर – विधानसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील मतदारसंघ निवडताना रविवारी रात्री मनोज जरांगे यांनी निवडलेली यादी शिवसेना मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) यांच्या बाजूला झुकणारी असल्याची चर्चा सुरू झाली होती. सकाळी मनोज जरांगे यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का मानाला जात आहे.
नागपूर : राज्य पोलीस दलाच्या प्रमुख पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी १ मार्च २०२४ ला अचानक नागपुरातील संघ महाल येथील संघ मुख्यालयात पोहचल्या होत्या. त्यांनी जवळपास अर्धा तास तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
Uddhav Thackeray : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना आणि अपक्षांना उद्धव ठाकरेंनी इशारा दिला आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. तसंच ज्या ठिकाणी बंडखोरी किंवा अपक्ष लढण्याचा निर्णय ज्यांनी निर्णय घेतला आहे त्यांना आम्ही अर्ज मागे घेण्यास सांगितलं आहे. अर्ज मागे घेतले गेले नाहीत तर मात्र आम्ही अशांवर कारवाई करु. दुपारी ३ नंतर यासंबंधीचं चित्र स्पष्ट होईल” असं शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.
कर्जत : आपल्यासोबत असणारे कार्यकर्ते टिकवणे व सांभाळणे हे सर्वात मोठे व अवघड काम आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी कर्जत येथे ध्यान मंदिर परिसरातील कार्यक्रमात बोलताना केले.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. याच कालावधीत दिवाळी सण आला. पालिकेचा बहुतांशी अधिकारी, कर्मचारी वर्ग निवडणूक कामात व्यस्त आहे.
दिघे यांचा शिष्य म्हणून आताही अनेक जुने वृध्दत्वाकडे झुकलेले शिवसैनिक दिघे यांच्यासारखा कपाळी टिळा लावून आपला स्वाभिमानी बाणा टिकवून आहेत.
घरात अडकलेल्या बेशुद्ध बहीण आणि भावाला वेळेत रूग्णालयात दाखल करून अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना जीवदान दिले आहे.
रश्मी शुक्ला यांच्या बदलीनंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
मी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत करतो. तसेच त्यांना धन्यवाद देतो. मात्र, अजूनही एक प्रश्न अनुत्तरीत आहे, तो म्हणजे, निवडणूक जाहीर होताच झारखंड आणि पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांची बदली झाली. पण रश्मी शुक्ला यांची बदली करण्यासाठी इतके दिवस का लागले? याचं उत्तर मिळालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
नागपूर : येत्या विधानसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम राहावा, यासाठी पोलीस वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करीत आहेत.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या होत्या.
योगींचा मृत्यू बाबा सिद्दीकीसारखा झाला, तर भारताची अवस्था हमास, इस्त्राईलसारखी आणखी एक धमकीचा संदेश
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमकीचा संदेश पोलीस नियंत्रण कक्षाला आल्याची घटना ताजी असताना आता मुंबई पोलिसांना आणखी एक धमकीचा संदेश आला आहे.
मी माहीममधून निवडणूक लढण्यावर ठाम – सदा सरवणकर
मी माहीममधून निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मी माघार घेणार नाही. पण जर मनसेने महायुतीच्या विरोधातील सर्व उमेदवार मागे घेतले, तर मी माहीममधून अर्ज मागे घायला तयार आहे, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी मांडली आहे. तसेच यापुढचा निर्णय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घेईन, असेही त्यांनी सांगितलं.
जाहीर केलेल्या मतदारसंघापैकी बहुतांश मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती. मात्र, सकाळी सर्व मतदारसंघातून माघार घेत असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे जाहीर केलं आहे. काल रात्री उशीरा त्यांनी पत्रकार परिषद घेत १३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आज त्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. राज्यांनी ज्या मराठा बांधवांनी अर्ज दाखल केलं, त्यांनी अर्ज मागे घ्यावे, असं आवाहन त्यांनी केलं.