Maharashtra Politics Updates Today : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्यामुळे बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात, भाजपाचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नवाब मलिक, समीर भुजबळ आदी काही महत्त्वाचे बंडखोर माघार घेतात का, याकडे आता सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे. काल त्यांनी १३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आज अचानक निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. याशिवाय राज्यातील इतरही राजकीय घडामोडींकडे आपले लक्ष राहणार आहे.
Maharashtra Breaking News Live Today, 04 November 2024 : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार
मनोज जरांगेंच्या निर्णयाचं स्वागत – छगन भुजबळ
मनोज जरांगे यांनी जो निर्णय जाहीर केला आहे, त्याचं मी स्वागत करतो. या निर्णयानंतर देर आये दुरुस्त आये असं आपल्याला म्हणता येईल. एकप्रकारे मनोज जरांगे यांचे म्हणणं योग्यच आहे. एका समाजाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवता येत नाही. त्यामुळे मराठा समाजाचे बांधव मोकळेपणाने मतदान करतील, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. पुढे बोलताना, सर्व पक्षातून जे उमदेवार उभे आहेत, त्यापैकी ६० ते ७० टक्के उमेदवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांचा निर्णय योग्य आहे, असेही ते म्हणाले.
गोखले संस्थेच्या कुलगुरू पदी डॉ. अजित रानडे असण्यावरून वाद निर्माण झाला होता. डॉ. रानडे यांच्याकडे या पदासाठी आवश्यक पात्रता नसल्याचा आक्षेप घेऊन तक्रारी करण्यात आल्या.
जत विधानसभा मतदार संघामध्ये स्थानिक विरूध्द उपरा या मुख्य मुद्दयाभोवती यावेळची निवडणुक गाजत असून हेच भाजपपुढील मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
शरद पवार यांच्या उमेदारांना आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहे. मात्र, त्यांनी हे लिहून द्यावं की ते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची काळजी ते घेतील. जर ते लिहून देणार असतील, तर आम्ही त्या उमेदवारांना पाठिंबा देऊ, अशी भूमिका ओबीसी लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष सातत्याने सुरु आहे. हा संघर्ष समाजाच्या विकासासाठी आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या प्राणाची बाजी लावली निवडणूक संदर्भात त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय आहे. त्यांचा लढा राजकीय आहे, असं आम्ही मानत नाही. तो सामाजिक आहे, असं आम्ही मानतो. त्यांच्या लढ्याला कायम आमचा पाठिंबा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष बंडखोरांना समजवण्याचा प्रयत्नात – संजय राऊत
तिन्ही पक्ष बंडखोरांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल. तिन्ही पक्षांनी आघाडी धर्म पाळण्याचा निर्णय घेतला आहे., अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. तसेच अलिबाग, पनवेल आणि पेनची जागा शेकापला सोडणार असल्याचेही त्यांनी जाहीर केलं.
गोपाळ शेट्टींची निवडणुकीतून माघार; भाजपाला बंडखोरी रोखण्यात यश
भाजपाचे नेते गोपाळ शेट्टी यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपाला बोरीवलीत बंडखोरी रोखण्यात यश आलं आहे. विनोद तावडे यांच्या भेटीनंतर गोपाळ शेट्टी यांनी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. बोरिवलीत भाजपाने संजय उपाध्यय यांनी उमेदवारी दिली आहे.
मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; शंभूराज देसाई म्हणाले…
मराठा समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांना जो शब्द दिला, तो पूर्ण करण्यासाठी सरकारने बरेच प्रयत्न केले. काही गोष्टी कायदेशीर चौकटीत बसवायच्या आहेत. त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या माध्यमातून नाही, तर आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याची जी भूमिका घेतली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. सुरुवातीपासून आमचंही तेच म्हणणं आहे, अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली.
तासगावमध्ये रोहित पाटील यांच्या समर्थकांनी पैसे वाटल्याचा आरोप संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी केला जातो आहे. यावर आता रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला बदनाम करण्यासाठी अशाप्रकारचे आरोप केले जात आहेत, माझा याच्याशी काहीही संबंध नाही, असं ते म्हणाले.
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
मराठा समाज बांधवांशी आम्ही बरीच चर्चा केली. चर्चा करेपर्यंत पहाटे तीन वाजले. मित्रपक्षांची यादी येणार होती, यादी आली नाही. एका जातीवर लढणं शक्य नाही. अजूनही मित्रपक्षांची यादी आलेली नाही. नाईलाजाने आपण थांबलेलं बरं. आता पाडापाडी करावी लागेल. आपण १३-१४ महिने राजकारण पाहतोय फक्त. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढायची नाही अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली आहे. आपले अर्ज, मागे घ्या ही सगळ्यांना विनंती करतो आहे. आपली उगाच फसगत होईल. आपलं आंदोलन सुरुच आहे. निवडणूक झाली की आपण पुन्हा आपला लढा देऊ. एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. एका जातीवर जिंकता येणार नाही. मित्रपक्षांनी यादी पाठवलेली नाही. त्यामुळे आम्ही निवडणूक लढवणार नाही असं मनोज जरांगेंनी जाहीर केली आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे जाहीर केलं आहे. काल रात्री उशीरा त्यांनी पत्रकार परिषद घेत १३ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, आज त्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे. राज्यांनी ज्या मराठा बांधवांनी अर्ज दाखल केलं, त्यांनी अर्ज मागे घ्यावे, असं आवाहन त्यांनी केलं.