2024 Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Updates, 22 November 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले. या निवडणुकीत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. पाठोपाठ अनेक संस्था व वृत्तवाहिन्यांनी त्यांचे निवडणुकीच्या निकालाबाबतचे एक्झिट पोल्स जाहीर केले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत जवळपास चार टक्के मतदान वाढलं आहे. गेल्या ३० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे वाढलेलं मतदान नेमकं कोणाच्या पारड्यात पडलंय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. बुधवारी जाहीर झालेल्या एकूण १० एक्झिट पोल्सपैकी सहा पोल्सनी महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. तर काही पोल्सनी राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. तीन एक्झिट पोल्सनी जनतेचा महाविकास आघाडीच्या बाजूने कल असल्याचं सूचवलं आहे. मतदान, एक्झिट पोल्स व उद्या जाहीर होणारा निकाल यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय मोर्चेबांधणी, चर्चा, बैठका चालू झाल्या आहेत. या सर्व राजकीय घडामोडींवर आमचं लक्ष असेल. यासंबंधीच्या बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा