श्रीनिवास वनगा १७ तासांपासून नॉट रीचेबल… पुन्हा अज्ञातवासात गेल्याची चर्चा..

विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर मधून उमेदवारी नाकारून भाजपमधून आयात केलेले माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे.

maharashtra assembly election 2024 mla srinivas vanga not reachable
श्रीनिवास वनगा हे सोमवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता अज्ञात वाहनातून घरातून निघून गेले

बोईसर : शिवसेना (शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर विधानसभेची उमेदवारी नाकारून भाजपमधून आयात उमेदवार राजेंद्र गावित यांना दिल्यानंतर श्रीनिवास वनगा आणि त्यांचे कुटुंबीय मानसिक दृष्ट्या प्रचंड व्यथित झाले आहे.  श्रीनिवास वनगा हे सोमवारी संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास कोणाला काहीही न सांगता अज्ञात वाहनातून घरातून निघून गेले असून  १७ तासांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस यंत्रणा रात्रीपासून त्यांचा शोध घेत असून अजून पर्यंत ते कुठे आहेत याचा  ठावठिकाणा लागलेला नाही.

विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना पालघर मधून उमेदवारी नाकारून भाजपमधून आयात केलेले माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. पालघर मध्ये नाही तर निदान डहाणू मधून उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले वनगा यांना डहाणू मधून भाजपचे विनोद मेढा यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जबर धक्का बसला. पक्षाकडून आपली फसगत झाल्याची खंत त्यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली. शिवसेना सत्ता संघर्षाच्या वेळी आपण एकनाथ शिंदे यांना साथ दिली, त्यांनी बंडामध्ये सामील ४० आमदारांपैंकी  ३९ आमदारांना पुन्हा उमेदवारी संधी दिली मात्र फक्त एकट्या श्रीनिवास वनगा यांची उमेदवारी कापल्याने ते प्रचंड व्यथीत झाले आहेत.

maharashtra assembly election 2024 eknath shinde cheated me says palghar mla srinivas vanga
एकनाथ शिंदेंनी मला फसवलं; उमेदवारी डावललेल्या आमदार श्रीनिवास वनगा यांचे वक्तव्य
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mla srinivas vanga visited home after 32 hours again went to unknown place for rest
३२ तासानंतर वनगांचा ठावठिकाणा; पहाटे घरी भेट दिल्यानंतर विश्रांतीसाठी पुन्हा अज्ञातस्थळी
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Shrinivas Vanga cried palghar candidature
Shrinivas Vanga: ‘उद्धव ठाकरे देवमाणूस, एकनाथ शिंदे घातकी’, गुवाहाटीला गेलेल्या श्रीनिवास वनगांचे तिकीट कापले; कालपासून नॉट रिचेबल, कुटुंब चिंतेत
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

राजेंद्र गावित यांना उमेदवारी देताना आपल्याला वरिष्ठांनी कोणत्याही प्रकारे संपर्क न करता किंवा विश्र्वासात न घेता एकटे पाडले असा आरोप त्यांनी केला होता.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंनी मला फसवलं; उमेदवारी डावललेल्या आमदार श्रीनिवास वनगा यांचे वक्तव्य

शिवसेना किंवा भाजपमधून उमेदवारी मिळण्याची आशा मावळताच श्रीनिवास वनगा यांनी दोन दिवसांपासून जेवण सोडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यांनी घरातील एका खोलीत स्वतःला बंद करून घेतले होते. सोमवारी सायंकाळी प्रथम माध्यमांसमोर आपली व्यथा मांडल्यानंतर सात वाजेच्या सुमारास रडत रडत त्यांनी कोणाला काही न सांगता घर सोडले. बाहेर जाताना गावात फेरफटका मारून येतो असे त्यांनी कुटुंबीयांना सांगितल्याचे समजते. मात्र घराच्या दरवाज्यापाशी उभ्या असणाऱ्या एका अज्ञात वाहनात बसून ते बाहेर निघून गेल्याची दिसून आले आहे.

हेही वाचा >>> हितेंद्र ठाकूर एकाकी, महाविकास आघाडीची दारे बंद

आमदार वनगा यांचे वक्तव्य माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधण्या साठी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना पाचरण करण्यात आले. तसेच पोलिसांनी देखील त्यांचा ठाव ठिकाणा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. वनगा हे नॉट रीचेबल असल्याची माहिती मिळतात शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्या पत्नीशी  मोबाईलद्वारे संपर्क साधत धीर देण्याचा प्रयत्न केला.

आमदार श्रीनिवास वनगा यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र संरक्षणार्थ असणाऱ्या पोलिसांना त्यांनी काही काम नसल्याचे सांगून घरी पाठवून दिले होते. पोलिसांनी आपल्या वरिष्ठांना कळवून श्रीनिवास वनगा यांची सोबत काल सकाळी सोडल्याची माहिती पुढे आली आहे.

तर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा वनगांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करीत असून ते गुजरातच्या दिशेने गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी रात्री काही ठिकाणी नाकाबंदी लावली होती. मात्र त्यापूर्वी श्रीनिवास वनगा बाहेर आज्ञास्थळी निसटण्यात यशस्वी झाले.

बंडाच्या वेळेस श्रीनिवास वनगा च्या मुलाच्या वाढदिवसाचे दिले होते कारण

एकनाथ शिंदे यांनी बंड करून सुरत गाठताना सहकारी आमदार यांना प्रथम आमदार श्रीनिवास वनगा यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे कारण सांगून मुंबई सोडली होती. मात्र नंतर रात्रीच्या अंधारात तलासरी चेक पोस्ट ओलांडून बंड करणाऱ्या आमदारांनी सुरत येथे वास्तव्य केले होते. या बंड प्रकरणातील पहिल्या सत्रांपासून श्रीनिवास वनगा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहिले होते.

२०१८ ची पुनरावृत्ती

खासदार ऍड. चिंतामण वनगा यांच्या जानेवारी २०१८ मध्ये निधन झाल्यानंतर भाजपातर्फे वनगा कुटुंबीयांऐवजी पर्यायी उमेदवार देण्याच्या हालचालीला वेग आला होता. यावेळी शिवसेनेत मंत्रीपदी असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास यांना भाजपामधून शिवसेनेत प्रवेश देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी काही काळ श्रीनिवास वनगा अशाच प्रकारे अज्ञातवासात राहिल्याचे दिसून आले होते. नंतर त्यांनी मातोश्री वर जाऊन पक्षप्रवेश केला होता. ** शिवसेनेने २०१९  च्या विधानसभा निवडणुकीत श्रीनिवास वनगा यांचे पुनर्वसन करण्यासाठी विद्यमान आमदार अमित घोडा यांच्याऐवजी पालघर विधानसभेची उमेदवारी दिली होती. २०१९ च्या निवडणुकीत श्रीनिवास वनगा ६० हजारपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आले होते. नंतरच्या पाच वर्षांच्या कालावधीत श्रीनिवास वनगा यांचा लोकसंपर्क नसल्याचे कारण देत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly election 2024 mla srinivas vanga not reachable missing since yesterday zws

First published on: 29-10-2024 at 13:17 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या