Maharashtra Assembly Election Sharad Pawar NCP 4th Candidate List : विधानसभेची निवडणूक (Assembly Elections 2024) जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, महायुती, तसेच इतर पक्षांकडूनही उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आता आज (२८ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ७ जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये माण मतदारसंघासाठी प्रभाकर घार्गे, काटोल-सलील अनिल देशमुख, खानापूर-वैभव पाटील, वाई-अरुणादेवी पिसाळ, दौंड-रमेश थोरात, पुसद- शरद मेंद, सिंदखेडा-संदीप बेडसे यांच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याआधी तीन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

अनिल देशमुखांच्या मुलाला उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना काटोल विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली आहे. त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख हे आता निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. अनिल देशमुख यांनी माघार घेतल्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

कोणत्या सात उमेदवारांची यादी जाहीर झाली? वाचा यादी!

क्र.मतदारसंघाचे क्रमांकमतदारसंघाचे नावउमेदवारांचे नाव
२५८माणप्रभाकर घार्गे
४८काटोलसलील अनिल देशमुख
२८६खानापूरवैभव पाटील
२५६वाईअरुणादेवी पिसाळ
१९९दौंडरमेश थोरात
८१पुसदशरद मेंद
सिंदखेडासंदीप बेडसे

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून २४ ऑक्टोबर रोजी ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २७ ऑक्टोबर रोजी ९ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता आज ७ उमेदवारांची यादी चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता उद्या २९ ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तसेच राहिलेल्या उमेदवारांच्या याद्याही आता जाहीर करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सात उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व निवडणूक २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra assembly election 2024 ncp sharad pawar release another list of 7 candidate including salil deshmukh gkt