Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 Shivsena Seat Wise Analysis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. आज या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ लागला आहे. दुपारपर्यंत आलेल्या निवडणुकीच्या निकालांनुसार राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत महायुतीने २१८ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ५८ जागांवर आघाडी मिळाली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षफुटीपासून सुरू झालेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेचे दोन्ही गट आम्हीच खरी शिवसेना, आमचा पक्ष हाच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे असा दावा करत होते. या वादावर विधानसभा निवडणुकीद्वारे उत्तर मिळेल असं बोललं जात होतं. राज्यात ५१ मतदारसंघात शिवसेना (शिंदे) विरुद्ध शिवसेना (ठाकरे) असा सामना रंगला. या ५१ मतदारसंघांमध्ये कोण जिंकलं असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा