Maharashtra Assembly Election 2024 Shivsena vs Shivsena : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात अनेक पक्ष व हजारो उमेदवार आहेत. उद्या (शनिवार, २३ नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. दरम्यान, खरी शिवसेना कोणाची? खरी राष्ट्रवादी कोणाची? या प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील. एकनाथ शिंदेंबरोबर जास्त आमदार असल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला नवं नाव आणि नवं निवडणूक चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवावी लागली. मात्र, आता निवडणुकीत मतदार कोणत्या शिवसेनेची निवड करणार? जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना म्हणून कोणाला मान्यता मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशात १९ जागांवर आणि एकट्या मुंबईत १२ मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा थेट सामना होणार आहे. मराठवाडा आणि कोकणात आठ, विदर्भात सहा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी चार जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल. मतदारांच्या नजरेतील बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? याचा निकाल या माध्यमातून लागणार आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटासाठी लिटमस टेस्टसारखी आहे. आपल्या वडिलांचा खरा वारसदार कोण? हे सिद्ध करण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली आहे. तसेच अधिकच्या जागा जिंकून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाचा दावा करण्यासाठीही ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरही शिवसेना पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं आव्हान आहे. त्यांच्याबरोबर गेलेल्या ४० आमदारांची आमदारकी टिकवणं आणि काही नवे आमदार निवडून आणणं त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. ५० हून अधिक आमदार निवडून आले तर कदाचित त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदही मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
shinde shiv sena door open to bjp rebels in navi mumbai
भाजपविरोधी बंडखोरांना शिंदे गटाचे दार खुले? पालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी व्यूहरचना
Mahavikas Aghadi
Sanjay Shirsat : ‘मविआ’ला धक्का बसणार? “अनेकजण शिवसेना, भाजपाच्या संपर्कात”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansion : महायुतीत गृहमंत्रिपदाचा तिढा सुटेना? आता शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आम्ही अद्याप…”
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं

हे ही वाचा >>महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? शिवसेना नेत्यांची मोर्चेबांधणी; भाजपाचाही पाठिंबा?

‘हे’ ४९ मतदारसंघ ठरवणार खरी शिवसेना कोणाची

राज्यातील एकूण ४९ मतदारसंघांमध्ये शिवसेना (ठाकरे) विरुद्ध शिवसेना (शिंदे) पक्षाचे उमेदवार आमने सामने उभे ठाकले आहेत. या ४९ मतदारसंघांवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल. या ४९ पैकी जास्त जागा जो पक्ष जिंकेल तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारा पक्ष आमचाच आहे, आम्हीच मूळ शिवसेना आहोत असा दावा करू शकेल.

क्र.मतदारसंघशिवसेना (शिंदे)शिवसेना (ठाकरे)
1मागाठाणेप्रकाश सुर्वेउदेश पाटेकर
2भांडुप पश्चिमअशोक पाटीलरमेश कोरगावकर
3जोगेश्वरी पूर्वमनीषा वायकरअनंत नर
4दिंडोशीसंजय निरुपमसुनील प्रभू
5चेंबूरतुकाराम कातेप्रकाश फातर्पेकर
6माहीमसदा सरवणकरमहेश सावंत
7भायखळायामिनी जाधवमनोज जामसुतकर
8वरळीमिलिंद देवराआदित्य ठाकरे
9विक्रोळीसुवर्णा कारंजेसुनील राऊत
10कुर्लामंगेश कुडाळकरप्रविणा मोरजकर
11अंधेरी पूर्वमुरजी पटेलऋतुजा लटके
12कुडाळनिलेश राणेवैभव नाईक
13रत्नागिरीउदय सामंतबाळा माने
14राजापूरकिरण सामतराजन साळवी
15सावंतवाडीदीपक केसरकरराजन तेली
16महाडभरत गोगावलेस्नेहल जगताप
17दापोलीयोगेश कदमसंजय कदम
18गुहागरराजेश बेंडलभास्कर जाधव
19कर्जतमहेंद्र थोरवेनितीन सावंत
20पालघरराजेंद्र गावितजयेंद्र दुबळा
21अंबरनाथबालाजी किणीकरराजेश वानखेडे
22बोईसरविलास तरेविश्वास वळवी
23भिवंडी ग्रामीणशांताराम मोरेमहादेव घाटाळ
24कल्याण पश्चिमविश्वनाथ भोईरसचिन बासरे
25कल्याण ग्रामीणराजेश मोरेसुभाष भोईर
26ओवळा माजिवडाप्रताप सरनाईकनरेश मनेरा
27कोपरी पाचपाखाडीएकनाथ शिंदेकेदार दिघे
28छत्रपती संभाजीनगर पश्चिमसंजय शिरसाटराजू शिंदे
29छत्रपती संभाजीनगर मध्यप्रदीप जैस्वालबाळासाहेब थोरात
30परभणीआनंद भरोसेराहुल पाटील
31सिल्लोडअब्दुल सत्तारसुरेश बनकर
32पैठणविलास भुमरेदत्ता गोर्डे
33कन्नडसंजना जाधवउदयसिंह राजपूत
34वैजापूररमेश बोरनारेदिनेश परदेशी
35धाराशिवअजित पिंगळेकैलास पाटील
36उमरगाज्ञानराज चौगुलेप्रवीण स्वामी
37कळमनुरीसंतोष बांगरसंतोष टारफे
38चोपडाचंद्रकांत सोनवणेप्रभाकर सोनवणे
39नांदगावसुहास कांदेगणेश धात्रक पाचोरा
40मालेगाव बाह्यदादा भुसेअद्वय हिरे
41बार्शीराजेंद्र राऊतदिलीप सोपल
42सांगोलाशहाजी पाटीलदीपक साळुंखे
43राधानगरीप्रकाश आबिटकरके.पी पाटील पाटण
44नेवासाविठ्ठलराव लंघेशंकरराव गडाख
45बुलढाणासंजय गायकवाडजयश्री शेळके
46मेहकरसंजय रायमूलकरसिद्धार्थ खरात
47बाळापूरबळीराम शिरसकरनितीन देशमुख
48रामटेकआशीष जैस्वालविशाल बरबटे
49दर्यापूरअभिजीत अडसूळगजानन लवटे
50पाटणशंभूराज देसाईहर्षद कदम
51पाचोरा किशोर पाटीलवैशाली सूर्यवंशी

Story img Loader