Maharashtra Assembly Election 2024 Shivsena vs Shivsena : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. यावेळी निवडणुकीच्या रिंगणात अनेक पक्ष व हजारो उमेदवार आहेत. उद्या (शनिवार, २३ नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. दरम्यान, खरी शिवसेना कोणाची? खरी राष्ट्रवादी कोणाची? या प्रश्नांची उत्तरं देखील मिळतील. एकनाथ शिंदेंबरोबर जास्त आमदार असल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला नवं नाव आणि नवं निवडणूक चिन्ह घेऊन ही निवडणूक लढवावी लागली. मात्र, आता निवडणुकीत मतदार कोणत्या शिवसेनेची निवड करणार? जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना म्हणून कोणाला मान्यता मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुंबई महानगर प्रदेशात १९ जागांवर आणि एकट्या मुंबईत १२ मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा थेट सामना होणार आहे. मराठवाडा आणि कोकणात आठ, विदर्भात सहा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी चार जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल. मतदारांच्या नजरेतील बाळासाहेबांचा खरा वारसदार कोण? याचा निकाल या माध्यमातून लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा