Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यातील २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने अद्ययावत मतदार यादी जारी केली आहे. त्यानुसार, राज्यात ९ कोटी ७० लाखांपेक्षाही जास्त नोंदणीकृत मतदार आहेत.

२२ लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आहेत. त्यापैकी ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष, तर ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. याशिवाय ६ हजार १०१ तृतीयपंथी मतदार आहेत. महाराष्ट्रात १८ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण २२ लाख २२ हजार ४०७ मतदार आहेत. याचा अर्थ जवळपास २२ लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करणार आहेत.

how many candidates announced by Mahavikas aghadi Mahayuti
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती, मविआने आतापर्यंत किती उमेदवार जाहीर केले? ‘इतक्या’ जागांवरील तिढा बाकी, उमेदवारी अर्ज भरण्यास ३० तास बाकी!
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
assembly electio
भाजपकडून विद्यमान आमदारांनाच संधी, आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर
polling stations Pune district, Pune district remote areas, Pune, Pune latest news,
पुणे : जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात, ‘मोबाइल नेटवर्क’ही मिळेना
62 percent mlas have criminal cases in Maharashtra
६२ टक्के आमदारांवर गुन्हे, बहुतांश करोडपती
Raj Thackeray MNS Third List
MNS List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, आणखी १३ जणांना तिकिट
BJP Candidate List
BJP Candidate List : झारखंडमध्ये भाजपाची ६६ जणांची पहिली यादी जाहीर; चंपाई सोरेन यांच्यासह ‘या’ नेत्यांना दिली उमेदवारी
Marathwada vidhan sabha
सलग निवडून येणाऱ्या महायुतीतील १५ आमदारांना जनमत रोषाचा फटका ?

हेही वाचा – जनगणना पुढील वर्षी; पुढील लोकसभा निवडणूक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर घेण्याचा विचार

या वयोगटात सर्वाधिक मतदार

आयोगाच्या माहितीनुसार, राज्यात सर्वाधिक मतदार ३० ते ३९ वर्ष वयोगटातील आहेत. त्यांची संख्या २ कोटी १८ लाख १५ हजार २७८ इतकी आहे. याशिवाय ८५ ते १५० वर्ष वयोगटातील १२ लाख ४० हजार ९१९ मतदार आहेत. यापैकी १२० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ११० मतदार आहेत. ज्यात ५६ पुरुष, तर ५४ महिला आहेत.

हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : २८८ मतदारसंघांसाठी ७,९९५ उमेदवारी अर्ज; महायुती, मविआचे ‘इतके’ उमेदवार रिंगणात

निवडणूक आयोगाकडून विशेष उपक्रम

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेतील नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोग विशेष उपक्रम राबवले जात आहेत. तसेच नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून विविध उपक्रम घेतले जात आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तर वयोवृद्ध नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान केलं जाणार आहे.