सांगली : Sangli Assembly Election 2024संपूर्ण देशात एकमेव अपक्ष निवडून आलेले सांगलीचे खासदार नेमके कुणाचे असा प्रश्‍न सध्या अख्ख्या मतदार संघाला पडला आहे. काँग्रेसकडून वसंतदादा घराण्याची सातत्याने फसवणूक होत असल्याचा आरोप करत जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा तथा वसंतदादा पाटील यांच्या नात सून जयश्री पाटील यांच्या बंडखोरीला पाठबळ देण्याचे त्यांनी जाहीर केले. यातून महाविकास आघाडीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांची उमेदवारी अडचणीत आली आहे.

सहा महिन्यापुर्वी मविआच्या उमेदवाराविरूध्द काँग्रेसचे बंड म्हणत खासदार पाटील यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष लढवली. यावेळी त्यांना जतमध्ये भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, कवठेमहांकाळचे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी उघड साथ केली तर पडद्याआड राहून माजी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांनी आम्ही सांगलीचे वाघ आहोत अशी डरकाळी फोडत कुमक पोहच केली.भाजप अंतर्गत माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर नाराज असलेल्यांची मदत तर झालीच पण आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तासगावमध्ये मदत झाली. याचा परिणाम भाजपची लोकसभेतील हॅटट्रिक हुकली.

Umarkhed, Digras, Ralegaon, Sanjay Rathod,
उमरखेडमध्ये दोन माजी आमदारांचे नवख्यांना आव्हान; दिग्रस, राळेगावमध्ये आज-माजी मंत्र्यांची शक्ती पणाला
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
maha vikas aghadi face rebels Challenges in yavatmal district
बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
BJP Rajesh Khatgavkar vs Congress Minal Patil Naigaon Assembly Constituency
Naigaon Assembly Constituency : जुन्या भागीदारांचे राजकीय वारस आमने-सामने !
Jalgaon City Constituency Assembly Election 2024 Rebellion to MVA Mahayuti in Jalgaon district due to non candidacy
जळगाव जिल्ह्यात मविआ, महायुतीला बंडखोरीचा फटका
Ajit Pawar met rebel Nana Kate, Ajit Pawar latest news,
बंडखोर नाना काटेंची अजित पवारांनी घेतली भेट; महायुतीमधील बंडखोरी रोखण्याचे प्रयत्न सुरू

हेही वाचा >>> Chhatrapati Sambhajinagar Assembly Constituency: जरांगे यांच्या ‘मराठा- मुस्लिम व दलित’ मतपेढीसाठी ओवेसी  यांची सहमती

आता विधानसभेची राजकीय मांडणी वेगळीच दर्शवत आहे. सांगलीत अपक्ष असलेल्या जयश्री पाटील यांना पाठिंबा देत असताना वसंतदादा घराण्यावर अन्याय झाल्याचे दिसले, मात्र, ज्या मिरज मतदार संघाने २५ हजाराचे मताधिक्य दिले, त्याठिकाणी तोळामासाही नसलेल्या शिवसेना उमेदवार दिल्याने मविआने ही निवडणुक रामभरोसे सोडल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही खासदार पाटील यांना या ठिकाणी मदत करणार्‍यांवर अन्याय होत असल्याचे दिसत नाही. महापालिकेत एक नगरसेवक, ग्रामंपचायतीत एक सदस्य अथवा एकही सहकारी संस्था हाती नसताना मिरजेची निवडणुक आणि तीही विद्यमान पालकमंत्री सुरेश खाडे या सलग तीन वेळा निवडून आलेल्या उमेदवाराविरूध्द म्हणजे शिवसेनेचे धाडसच म्हणावे लागेल. या ठिकाणी खासदारांना स्पष्ट भूमिका घेतली नाही. मात्र, तासगावमध्ये मविआचे उमेदवार रोहिेत पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा विश्‍वास देत असताना काही दिवसापुर्वी ‘नको अंजनी, नको चिंचणी’ असे म्हणत असलेल्या घोरपडे यांना अनुकूल भूमिका घेतली होती. आता मात्र, केवळ आठ दिवसात या भूमिकेत बदल केला. तिकडे खानापूरात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांना अनुकूलता दर्शवली आहे. तर मविआचे वैभव पाटील यांच्याशी त्यांचे सूत अद्याप जुळलेले नाहीत. यामुळे खासदार नेमके महाविकास आघाडीचे की कुणाचे असा प्रश्‍न पडला आहे.

हेही वाचा >>> निवडणूक उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निर्णय योग्यच; आयोगाचा उच्च न्यायालयात दावा, याचिका फेटाळली

सांगलीत दादा घराण्याची फसवणूक होत असल्याचे सांगत आम्ही काँग्रेसचाच विचार पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक वेळा नेतृत्व दादा घराण्याकडेच होते.मग अन्याय झाला हे लोकांना पटणार आहे का? दादा घराण्यात स्व. विष्णुअण्णा पाटील, स्व. मदन पाटील यांचा झालेला पराभवामागे कोणत्या शक्ती कार्यरत होत्या. स्व. मदन पाटील यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव असो व जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पराभव असो यामागे कोण होते याचे उत्तर सांगलीकरांना ज्ञात आहे. आता खासदारांना बंडखोरांच्या मागे ताकद दाखविल्याविना पर्याय उरलेला दिसत नाही. लोकसभा निवडणुकीत खासदारांना सांगली विधानसभा मतदार संघामध्ये १९ हजार ९९२ मतांची आघाडी मिळाली होती. या मतांच्या हिशोबावर विधानसभेची गणिते मांडली जात आहेत. बंडखोरीच्या प्रचाराची सुत्रे माजी केंद्रिय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांच्या हाती आहेत. त्यांना कंेंद्रात मंत्रीपद मिळाले होते. याचा जिल्ह्याला नेमका काय लाभ झाला याचे उत्तर शोधले तर हाती काहीच येत नाही. सांगलीची शांघाय व्हायचे राहू दे, रस्ते, वीज, मुबलक पाणी या नागरी सुविधा तर व्यवस्थित मिळतात का याचे उत्तरही नकारार्थीच आहे.

सांगलीत आता भाजप, काँग्रेस आणि बंडखोर काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. बंडखोराच्या तंबूत गर्दी वाढती आहे. माजी खासदार प्रतिक पाटील यांनी तर प्रचार सभेत कार्यकर्त्यांना दम देताना सांगितले जर काम केले नाही तर महापालिका निवडणुकीच्या तिकिट वाटपात माझ्याशी गाठ आहे. यामुळे सांगलीत ज्या ज्या वेळी दादा घराणे एकसंघपणे सांगलीकरांना सामोरे जाते त्या त्या वेळी इतिहास घडतो हाच इतिहास पुन्हा घडविण्यासाठी दादा घराणे सज्ज झाले आहे. जनता जनार्दन नेमका काय विचार करते आहे हे निकालानंतरच कळणार आहे.