Maharashtra Assembly Election 2024 Voting turnout : विधानसभा निवडणुकीत बुधवारी राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढल्याचं चित्र आहे. अखेरच्या काही तासांत मतदानाने जोर पकडल्याचे चित्र राज्याच्या काही भागांत पाहायला मिळालं. गावखेड्यांमधील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मात्र, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर या शहरी भागांमध्ये काहीसा निरुत्साह कायम असल्याचे दिसले. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील काही केंद्रांवर रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान चालू होतं. त्यामुळे मतदानाची जिल्हानिहाय अंतिम आकडेवारी येण्यास विलंब झाला. रात्री ११.४५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.११ टक्के मतदान झालं आहे.

मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र त्याला फारसे यश आले नसल्याचे पाहायला मिळाले. राज्यात सर्वाधिक ८२ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मतदारसंघात झाल आहे. तेथे वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजितसिंह घाटगे यांच्यातच चुरशीची लढत होत आहे. सर्वात कमी ४१ टक्के मतदान हे कल्याण पश्चिम मतदारसंघात झालं आहे. मंत्रालय व विधानभवन ही सत्तेची प्रमुख केंद्रे असलेल्या कुलाबा मतदारसंघांत टक्केवारी वाढवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले असले तरी तिथे ४५ टक्केच मतदान झाले आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
40 thousand seats of public representatives are vacant in state
राज्यात लोकप्रतिनिधींच्या ४० हजार जागा रिक्त
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर

हे ही वाचा >> मोठी बातमी! २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याप्रकरणी गौतम अदाणींवर आरोप

३० वर्षांमधील सर्वाधिक मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झालं आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. १९९५ साली ७१.६९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं नव्हतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झालं होतं. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान वाढलं आहे. ही मतदानाची वाढलेली आकडेवारी निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. दरम्यान, २०१९ मध्ये राज्यात ८.८५ कोटी नोंदणीकृत मतदार होते. त्यात गेल्या पाच वर्षांमध्ये ९.५ टक्के वाढ झाली असून राज्यात आता ९.६९ टक्के मतदार आहेत.

हे ही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll :एक्झिट पोल्सनुसार महायुतीला बहुमत; ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते म्हणतात…

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

अहमदनगर७१.७३ टक्के,
अकोला६४.९८ टक्के,
अमरावती६५.५७ टक्के,
औरंगाबाद६८.८९ टक्के,
बीड६७.७९ टक्के,
भंडारा६९.४२ टक्के,
बुलढाणा७०.३२ टक्के,
चंद्रपूर७१.२७ टक्के,
धुळे६४.७० टक्के,
गडचिरोली७३.६८ टक्के,
गोंदिया६९.५३ टक्के
हिंगोली७१.१० टक्के
जळगाव६४.४२ टक्के
जालना७२.३० टक्के
कोल्हापूर७६.२५ टक्के
लातूर६६.९२ टक्के
मुंबई शहर५२.०७ टक्के
मुंबई उपनगर५५.७७ टक्के
नागपूर६०.४९ टक्के
नांदेड६४.९२ टक्के
नंदुरबार६९.१५ टक्के
नाशिक६७.५७ टक्के
उस्मानाबाद६४.२७ टक्के
पालघर६५.९५ टक्के
परभणी७०.३८ टक्के
पुणे६१.०५ टक्के
रायगड६७.२३ टक्के
रत्नागिरी६४.५५ टक्के
सांगली७१.८९ टक्के
सातारा७१.७१ टक्के
सिंधुदुर्ग६८.४० टक्के
सोलापूर६७.३६ टक्के
ठाणे५६.०५ टक्के
वर्धा६८.३० टक्के
वाशिम६६.०१ टक्के
यवतमाळ६९.०२ टक्के

Story img Loader