2024 Rebel Candidates Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील) बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकींचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी मतदान पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था व खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज (Exit Poll) जाहीर केले आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या एकूण एक्झिट पोल्सपैकी प्रमुख १० संस्थांचे अंदाज (निवडणूक निकालाचे एक्झिट पोल) पाहिले तर त्यापैकी सहा अंदाज हे महायुतीच्या बाजूने आहेत, तर तीन संस्थांच्या मते राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतं. एका पोलमध्ये राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अनेक एक्झिट पोल्समध्ये अपक्ष व इतर पक्षांच्या आमदारांची संख्या २० ते ३० च्या आसपास असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचाच अर्थ राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास किंवा महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ पोहोचल्या तर या अपक्षांची व छोट्या पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असेल.

आघाडी व युती बहुमतापर्यंत पोहोचू शकली नाही तर दोन्ही बाजूचे पक्ष अपक्षांना व छोट्या पक्षांना आपल्याबरोबर घेऊन सत्तास्थापन करण्याचा प्रयत्न करतील. या काळात बंडखोरांचा भाव वधारलेला दिसेल. निवडून येण्याची क्षमता असलेल्या अपक्ष उमेदवारांपैकी बहुसंख्य उमेदवार हे वेगवेगळ्या पक्षांमधील बंडखोर आहेत. त्यांच्या पक्षाकडून, युती किंवा आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे या उमेदवारांनी पक्षाविरोधात जाऊन बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राज्यातील सहाही प्रमुख पक्षांचे बंडखोर उमेदवार वेगवेगळ्या मतदारसंघांमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काही मतदारसंघांमध्ये मविआ व महायुतीच्या दोन-दोन उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढती देखील होत आहेत.

Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Loksatta anvyarth Lok Sabha Elections BJP Narendra Modi Chandrababu Naidu Telugu Desam Party
अन्वयार्थ: आहे ‘डबल इंजिन’ तरीही…
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली? (फोटो सौजन्य पीटीआय)
Uttar Pradesh Election : अयोध्येतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजपाने उत्तर प्रदेशात कोणती रणनीती आखली?

हे ही वाचा >> ‘हे’ ४९ मतदारसंघ ठरवणार खरी शिवसेना कोणाची, ठाकरे – शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

राज्यात १५० हून अधिक बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात

राज्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या एकूण उमेदवारांमध्ये तब्बल २,०८६ अपक्ष आहेत. यामध्ये १५० हून अधिक मतदारसंघात बंडखोर रिंगणात आहेत. यापैकी ३५ बंडखोर उमेदवार असे आहेत जे निवडणूक जिंकू शकतात.

क्र.मतदारसंघबंडखोर उमेदवार (पक्ष)
1नांदगावसमीर भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
2अक्कलकुवाहिना गावित (भाजपा)
3कसबाकमल व्यवहारे (काँग्रेस)
4पर्वतीआबा बागुल (काँग्रेस)
5कोपरी – पाचपाखाडीमनोज शिंदे (काँग्रेस)
6कारंजाययाती नाईक
7शिवाजीनगरमनीष आनंद (काँग्रेस)
8इंदापूरप्रवीण माने, (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी)
9पुरंदरदिगंबर दुर्गडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
10मावळबापू भेगडे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
11जुन्नरआशा बुचके – भाजप
12खेड आळंदीअतुल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
13भोरकिरण दगडे पाटील, भाजप
14मीरा रोडगीता जैन
15सिंदखेड राजागायत्री शिंगणे
16बीडज्योती मेटे (रासप)
17सोलापूर शहर मध्यतौफिक शेख
18श्रीवर्धनराजा ठाकूर
19सावनेरअमोल देशमुख (काँग्रेस)
20काटोलयाज्ञवल्क्य जिचकार
21रामटेकचंद्रपाल चौकसे
22उमरेडप्रमोद घरडे
23नागपूर पश्चिमनरेंद्र जिचकार
24सोलापूर शहर उत्तरशोभा बनशेट्टी
25श्रीगोंदाराहुल जगताप (सपा)
26अहेरीअबरीश अत्राम (भाजपा)
27विक्रमगडप्रकाश निकम
28नाशिक मध्यहेमलता पाटील
29मावळबापू भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
30जुन्नरआशा बुचके, भाजप
31जुन्नरशरद सोनवणे, शिवसेना शिंदे गट
32भोरकिरण दगडे पाटील, भाजप
33शिवाजीनगरमनीष आनंद
34बडनेराप्रिती बंड
35पुरंदरसंभाजी झेंडे

हे ही वाचा >> निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “…

बंडखोरांचा मविआ व महायुतीलाही धसका

या ३५ बंडखोरांपैकी किती उमेदवार जिंकतात, या बंडखोरांचा कोणाला फटका बसणार, बंडखोरांमुळे त्यांच्या पक्षाचे (बंडखोरीआधी ते ज्या पक्षात होते) किंवा त्यांच्या मित्रपक्षांचे किती उमेदवार पडतात याकडे सर्वाचं लक्षं लागलं आहे.

Story img Loader