2024 Rebel Candidates Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील) बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकींचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी मतदान पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था व खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज (Exit Poll) जाहीर केले आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या एकूण एक्झिट पोल्सपैकी प्रमुख १० संस्थांचे अंदाज (निवडणूक निकालाचे एक्झिट पोल) पाहिले तर त्यापैकी सहा अंदाज हे महायुतीच्या बाजूने आहेत, तर तीन संस्थांच्या मते राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतं. एका पोलमध्ये राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, अनेक एक्झिट पोल्समध्ये अपक्ष व इतर पक्षांच्या आमदारांची संख्या २० ते ३० च्या आसपास असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचाच अर्थ राज्यात त्रिशंकू स्थिती झाल्यास किंवा महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ पोहोचल्या तर या अपक्षांची व छोट्या पक्षांची भूमिका खूप महत्त्वाची असेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा