Maharashtra Assembly Election 2024 Date Announced: राज्यात निवडणुका तर लागल्या, पण ईव्हीएम घोटाळ्याच्या आरोपांचं काय? निवडणूक आयोगानं दिलं उत्तर, म्हणे…

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Schedule: मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत विरोधकांकडून अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत. त्यावर केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date_ Maharashtra Assembly Election 2024 Date
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ECI on Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रात अखेर विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक आयोगानं जाहीर केलं आहे. त्यानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रासोबतच केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी झारखंड राज्याचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून झारखंडमध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पण झारखंडची मतमोजणी मात्र महाराष्ट्रासोबतच म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. पण या सर्व पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप चर्चेत असून त्यावरही राजीव कुमार यांनी उत्तर दिलं आहे.

लोकसभा निवडणूक निकालांनतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे वेध राजकीय पक्षांबरोबरच तमाम जनतेलाही लागले होते. त्यानुसार आज केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या हरियाणा व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांनंतर काही पक्षांकडून ईव्हीएमबाबत आक्षेप नोंदवण्यात आले होते. ईव्हीएम मशीनमधील बॅटरीबाबतही संशय व्यक्त करण्यात आला होता. आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत घोषणा करताना निवडणूक आयुक्तांनी ईव्हीएमबाबतच्या आक्षेपांनाही उत्तर दिलं आहे.

Wayanad and Nanded Lok Sabha bypolls 2024 date
Lok Sabha bypolls: वायनाड आणि नांदेडमध्ये पोटनिवडणूक जाहीर; प्रियांका गांधी लोकसभेत एंट्री घेणार, काँग्रेस नांदेडचा गड राखणार?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान उपाशी, अंत्यदर्शनाचा भावुक करणारा Video
eknath shinde raj thackeray (2)
Raj Thackeray : मनसेला विधानसभेसाठी महायुतीची साद? शिंदेंच्या शिवसेनेचे नेते म्हणाले, “राज ठाकरेंमध्ये आम्हाला बाळासाहेब दिसतात”
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date| Maharashtra Assembly Election 2024 Date
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, ९ कोटी मतदार ठरवणार महाराष्ट्राचं भवितव्य!
Election Commission of India holds a press conference in Delhi. Dates for Assembly elections in Jharkhand and Maharashtra
Maharashtra Assembly Election 2024 Date Announced : ठरलं! महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर, नोव्हेंबर महिन्यातल्या ‘या’ तारखेला निवडणूक, तर निकाल ‘या’ तारखेला
Dhananjay Powar
“गेली ३२ वर्षे वडिलांबरोबर अबोला…”, धनंजय पोवार म्हणाला, “माझ्या हातून…”
Canada police allegations
India-Canada Row: कॅनडाचा जळफळाट, लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेत भारतावर केले धक्कादायक आरोप

काय म्हणाले निवडणूक आयुक्त?

पत्रकार परिषदेमध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना ईव्हीएममधील घोटाळ्याबाबतच्या आरोपांबाबत विचारणा केली असता त्यावर त्यांनी या तक्रारी निरर्थक असल्याचं नमूद केलं. “अजून किती वेळा आम्ही या सगळ्या गोष्टी सांगायच्या?” असा उद्विग्न सवालही त्यांनी उपस्थितांना केल्या.

पेजर आणि ईव्हीएममधला फरक!

“मी अनेकदा सांगून झालंय. आज पुन्हा सांगतो. मी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगेन. लोक मला विचारतात की पेजरनंही स्फोट घडवून आणला जाऊ शकतो तर मग ईव्हीएम हॅक का करू शकत नाही? अरे बाबा पेजर कनेक्टेड असतात, ईव्हीएम कनेक्टेड नसतात”, असं ते म्हणाले.

“ईव्हीएमची पहिल्या पातळीवरची तपासणी म्हणजेच FLC (First Level Checking) मतदानाच्या ५ ते ६ महिन्यांपूर्वी होते. आमच्याकडे ईव्हीएमबाबत २० तक्रारी आल्या आहेत. प्रत्येक तक्रारीचं आम्ही तथ्यांच्या आधारे स्वतंत्र उत्तर देऊ. यात कोणतीही शंका नाही. आम्ही प्रत्येक उमेदवाराला माहिती देऊ. जर उमेदवार आमच्याकडे माहिती मागत आहे, तर ती देणं हे आमचं काम आहे. प्रत्येक उमेदवाराला आम्ही लेखी उत्तर देऊ”, असं ते म्हणाले.

“फर्स्ट लेव्हल चेकिंग, रँडमायझेशन, सेकंड रँडमायझेशन, स्टोरेजमध्ये ठेवणं, स्टोरेजमधून बाहेर काढणं, कमिशनिंग करणं, त्यानंतर पुन्हा स्टोरेजमध्ये ठेवणं, त्यानंतर मतदानाच्या प्रक्रियेसाठी नेणं, मतदान केंद्रावर पोहोचवणं, तिथे दिवसभर मतदान करून घेणं, त्यानंतर सील करणं, पुन्हा स्टोरेजमध्ये ठेवणं, पुन्हा मोजणीच्या वेळी बाहेर काढणं, पुन्हा दिवसभर दाखवणं या प्रत्येक वेळी राजकीय पक्ष वा उमेदवाराचे प्रतिनिधी उपस्थित असतात”, असं ते म्हणाले.

बॅटरीबाबत संशय, आयुक्तांचं उत्तर!

दरम्यान, यावेळी निवडणूक आयुक्तांनी मतदान यंत्रामध्ये टाकण्यात येणाऱ्या बॅटरीबाबतही स्पष्टीकरण दिलं. “मशीनमध्ये कमिशनिंग होतं तेव्हा त्यात बॅटरी टाकली जाते. मतदानाच्या ५ ते ६ दिवस आधी कमिशनिंग होतं. त्या दिवशी मशीनमध्ये निवडणूक चिन्हं टाकली जातात. त्याच दिवशी मशीनमध्ये नवीन बॅटरी टाकली जाते. सील केल्यानंतर त्या बॅटरीवरही उमेदवारांच्या सह्या होतात. कमिशनिंगनंतर उमेदवारांच्या समोर स्ट्राँगरूममध्ये त्या मशीन जातात. डबल लॉक लागतं. तीन स्तरांची सुरक्षाअसते. निरीक्षक असतात. मोजणीच्या दिवशी मशीन बाहेर काढल्या जातात तिथेही ही प्रक्रिया पुन्हा होते. त्या सगळ्या प्रक्रियेचं चित्रीकरण होतं. त्यानंतर स्थानिक निवडणूक अधिकारी सोबत असतात. तिथेही उमेदवारांचे प्रतिनिधी सोबत असतात. त्या मशीनचे क्रमांकही सगळ्यांना दिले जातात”, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

Maharashtra Assembly Election 2024 Date Announced : महाराष्ट्र विधानसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात; वाचा निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक!

“मतदान झाल्यानंतर पुन्हा उमेदवारांच्या प्रतिनिधींना ते दाखवलं जातं. किती गोष्टी दाखवायचं अजून? आणखी कुठल्या प्रक्रियेमध्ये इतक्या पातळ्यांवर इतरांना सहभागी करून घेतलं जातं हे दाखवा”, असंही राजीव कुमार म्हणाले. “यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास ती दाखल करण्याची तरतूद आहे. प्रत्येक स्तरावर अशी तक्रार तुम्ही करू शकता. पण असं आजपर्यंत झालं नाही”, असंही ते म्हणाले.

“बॅटरी एकदाच वापरता येते”

मतदान यंत्रांमधील बॅटरी एकदाच वापरता येते, असं निवडणूक आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं. “ही बॅटरी एकदाच वापरता येण्यासारखी आहे. एकदा टाकली की ५ ते ७ दिवस चालते. ईव्हीएमच्या बॅटरीमध्ये आम्ही एक सोय केली आहे. बॅटरी चालू झाल्यानंतर किती टक्के आहे आणि किती प्रमाणात वापरली जाते या दोन गोष्टी तिथे दिसतात. त्यामुळे ७.४ ते ८ व्होल्टेजदरम्यान वापर असेल, तर ती सामान्य परिस्थिती आहे. कमिशनिंगवेळी मॉक पोल होतं. मतदान केंद्रावरही मॉक पोल होतं. मतदानाची संख्या कमी-जास्त असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बॅटरीची टक्केवारी वेगवेगळी दिसू शकते. जिथे व्होल्टेज ७.४ च्या खाली येईल, तेव्हा तिथे अलर्ट यायला सुरुवात होईल. ५.८ वर व्होल्टेज येईल तेव्हा बॅटरी अलर्ट देईल की आता हे बंद होऊ शकेल, बॅटरी बदला”, असंही निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly election dates evm issue battery glitch commissioner responds pmw

First published on: 15-10-2024 at 16:51 IST

संबंधित बातम्या