2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक यंदा विलक्षण घडामोडींमुळे चर्चेत राहिली. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन पक्षांचं फुटलेल्या दोन गटांमुळे सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही बाजूंना अस्तित्व जाणवत होतं. पण दुसरीकडे लोकसभा निवडणूक निकालांमध्ये हे दोन्ही पक्ष बाजूला राहून भाजपा व काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्षच क्रमांक एक आणि दोनचे पक्ष ठरले. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचा परिणाम विधानसभा निवडणूक निकालांवर होण्याचे अंदाज वर्तवले जात असताना काँग्रेस या निवडणुकीत आघाडी घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण एग्झिट पोलमधून मात्र चित्र वेगळंच दिसत असल्यामुळे निकालांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात १३ जागा जिंकत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. महाराष्ट्रात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकांमध्ये तेवढ्या विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसचं वर्चस्व राहील, असं मानलं जात होतं. पण एग्झिट पोलमध्ये मात्र, याच्या बरोबर उलट चित्र दिसून येत आहे. बहुतांश एग्झिट पोलमध्ये महायुतीला विजयी आघाडी मिळेल, असे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. पण आघाडी म्हणून महायुती जरी आघाडीवर असली, तरी पक्षनिहाय तुलनेमध्ये त्यांचं एग्झिट पोलनुसार असणारं स्थान चर्चेचा विषय ठरलं आहे.

akola Congress MP Imran Pratapgarhi criticized corrupt Mahayuti government
महाराष्ट्रामध्ये महायुतीचे महाभ्रष्ट सरकार, काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगढी यांची खरमरीत टीका
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
maharashtra assembly polls 2024 state economy in decline during bjp rule says chidambaram
भाजपच्या सत्ताकाळात महाराष्ट्राची पीछेहाट; माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
panvel maha vikas aghadi
पनवेल: महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी येणारे नेते गोंधळात
Supriya Sule Badlapur, Subhash Pawar Prachar,
सुभाष पवार जायंट किलर ठरणार, सुप्रिया सुळे यांचा दावा, बदलापुरात सभेत भाजपावर टीका
those claiming hindus in danger denying reservation to marathas says manoj jarange patil
‘हिंदू खतरे में’ म्हणणाऱ्यांचे मराठ्यांकडे दुर्लक्ष; मनोज जरांगे यांची महायुतीवर टीका
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024 Exit Poll Live: रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १५०+ जागा मिळणार

काय सांगतात एग्झिट पोल?

इलेक्टोरल एज पोलनुसार…

भाजपा – ७८
काँग्रेस – ६०

मॅट्रिझ एग्झिट पोलनुसार…

भाजपा – ८९ ते १०१
काँग्रेस – ३९ ते ४७

चाणक्य पोलनुसार…

भाजपा – ९०+
काँग्रेस – ६३+

पोलडायरी पोलनुसार…

भाजपा – ७७ ते १०८
काँग्रेस – २८ ते ४७

आघाडीनिहाय एग्झिट पोल

PMARQ एग्झिट पोल्सनुसार…

महायुती – १३७ ते १५७

महाविकास आघाडी – १२६ ते १४६

इतर – २ ते ८ जागा

पोलडायरीचा एग्झिट पोल आला समोर…

महायुती – १२२ ते १८६

महाविकास आघाडी – ६९ ते १२१

इतर – १२ ते २९

पीपल्स पोल्स एग्झिट पोल्सच्या आकड्यांनुसार…

महायुती – १७५ ते १९५ जागा

महाविकास आघाडी – ८५ ते ११२ जागा

इतर पक्षांना ७ ते १२ जागा मिळतील

चाणक्य स्टॅटेजीजचा एग्झिट पोल

महायुती – १५२ ते १६०

महाविकास आघाडी – १३० ते १३८

इतर – ६ ते ८

यंदाही एग्झिट पोल खोटे ठरणार?

महाराष्ट्रातृ महायुतीचं सरकार पुन्हा येणार असा अंदाज सध्या एग्झिट पोलच्या बहुतेक सर्व अंदाजांवरून वर्तवला जात आहे. पण लोकसभा निवडणुकीवेळ एग्झिट पोलमध्ये सत्ताधारी एनडीएला मोठा विजय मिळेल असा अंदाज सर्व एग्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. पण भाजपाला २४० तर एनडीएला एकूण मिळून २९३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांचे एग्झिट पोलही खोटे ठरले होते. त्यामुळे यंदाही तेच होणार की एग्झिट पोल खरे ठरणार? अशी चर्चा सध्या चालू आहे.