Maharashtra Politics Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रात महायुतीला २३९ जागांचं रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण? हे निश्चित व्हायचं आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अद्याप असं काही म्हणणं समोर आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी लाडकी बहीण आणि बटेंगे तो कटेंगे या घोषणेमुळे मतं गेली म्हटलं आहे. तर संजय राऊत यांनीही महायुतीवर टीका केली आहे. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? यासह महत्त्वाच्या बातम्या

12:58 (IST) 25 Nov 2024

जळगाव जिल्ह्यात ११७ उमेदवारांची अनामत जप्त

जळगाव : जिल्ह्यातील ११ मतदारसंघात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुमारे १३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी ११७ उमेदवारांची अनामत जप्त झाली.

सविस्तर वाचा…

12:52 (IST) 25 Nov 2024

धक्कादायक! मद्यधुंद पोलीसाने बैलगाडीसह शेतकऱ्याला चिरडले ; दोन बैल आणि शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू गावकऱ्यांची पोलिसाला मारहाण

भंडारा : सायंकाळच्या सुमारास शेताकडून आपल्या बैलगाडीने घराकडे जात असलेल्या एका शेतकऱ्याला बैलगाडीसह एका मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने चिरडले. या घटनेत शेतकऱ्यासह दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला.

सविस्तर वाचा…

12:38 (IST) 25 Nov 2024

चंद्रकांतदादांनी विरोध करूनही त्यांच्याच मतदारसंघात दिलजीत दोसांझचा कार्यक्रम झाला अन् …

कोथरूड येथील काकडे फार्म परिसरात रविवारी दिलजीत दोसांझ यांचा म्युझिक कॉन्सर्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या सूचना असतानाही कोथरूड मध्ये हा कार्यक्रम ‘ निर्विघ्न ‘ पार पडल्याचे समोर आले आहे.

वाचा सविस्तर…

12:36 (IST) 25 Nov 2024

MNS in Thane : ठाणे जिल्ह्यात मनसेला उतरती कळा

ठाणे जिल्ह्यात एकूण १८ विधानसभा मतदार संघ आहे. त्यापैकी १२ मतदार संघात मनसेने उमेदवार उभे केले होते. या निवडणूक निकालानंतर ठाणे जिल्ह्यात मनसेला उतरती कळा लागल्याची चर्चा रंगली आहे.

वाचा सविस्तर…

12:27 (IST) 25 Nov 2024

विजय महायुतीचा, पण चर्चा महाआघाडीच्या पराभवाची…कारण…?

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीच्या विजयाच्या आनंदाच्या चर्चेऐवजी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या पराभवाची चर्चा मतदार, जनसामान्य तथा समाज माध्यमावर अधिक होताना दिसत आहे.

सविस्तर वाचा…

11:56 (IST) 25 Nov 2024

प्रचंड बहुमतानंतरही भाजपमध्ये खदखद…नवनीत राणा, डॉ. बोंडेंच्या हकालपट्टीसाठी…

अमरावती : महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे दर्यापुरातील उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्‍या पराभवासाठी भाजपच्‍या नेत्‍या नवनीत राणा, भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रकाश भारसाकळे हे जबाबदार असल्‍याने भाजपने त्‍यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे राज्‍य कार्यकारिणी सदस्‍य आणि श्रमराज्‍य परिषदेचे अध्‍यक्ष अरविंद नळकांडे यांनी केली आहे.

सविस्तर वाचा…

11:30 (IST) 25 Nov 2024

अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्याला अटक

मुंबई : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करणाऱ्या ७८ वर्षीय व्यक्तीला बोरिवली येथील एमएचबी कॉलनी पोलिसांनी शनिवारी अटक केली.

सविस्तर वाचा…

11:14 (IST) 25 Nov 2024

Vidhan Sabha Election Results : मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही

मुख्यमंत्रिपदाचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही असं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याही युती किंवा आघाडीला जेवढं बहुमत मिळालेलं नाही तेवढं आम्हाला मिळालं आहे. आमची जबाबदारी नक्कीच वाढली आहे. आम्ही योग्य तो निर्णय लवकरच घेऊ असंही अजित पवार यांनी माध्यमांना सांगितलं.

महायुतीचाच ‘महाविकास’ मंत्र (संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रात महायुतीला २३९ जागांचं रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण? हे निश्चित व्हायचं आहे. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अद्याप असं काही म्हणणं समोर आलेलं नाही.