महाराष्ट्र निवडणुकीत तुम्हीही मतदानासाठी पात्र आहात? मग ‘हे’ तीन अ‍ॅप तुमच्याकडे असलेच पाहिजेत; निवडणूक आयोगानं दिली माहिती!

महाराष्ट्र निवडणूक आयोगानं आज राज्यातील विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. यावेळी मतदारांसाठीच्या मोबाईल अ‍ॅपबाबतही सविस्तर माहिती दिली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date_ Maharashtra Assembly Election 2024 Date (1)
मतदारांसाठीचे 'हे' महत्त्वाचे अ‍ॅप तुमच्याकडे आहेत का? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

केंद्रीय निवडणूक आयोगानं आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार २० नोव्हेंबर रोजी मतदान व २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या वेळापत्रकापासून मतदारांसाठीच्या सुविधांपर्यंत सर्व तपशील केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितला. त्यामध्ये मतदारांसाठीच्या तीन मोबाईल अ‍ॅपचा उल्लेख राजीव कुमार यांनी केला.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्येही मतदारांच्या सोयीसाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचं निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं. त्यात त्यांनी VHA, cVigil व KYC या तीन मोबाईल अ‍ॅपबाबत माहिती दिली. या तीन मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने मतदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत, त्यांच्या उमेदवारांबाबत व गैरप्रकारांबाबतही माहिती मिळू शकेल.

The arrested accused, Gurmail Singh and Dharmaraj Kashyap, were presented before a holiday court on Sunday and remanded in police custody
Baba Siddique Shot Dead : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून कोणाच्या हत्येचा कट? पोलिसांना भीती; न्यायालयात म्हणाले…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
cabinet meeting
मंत्रिमंडळाकडून घोषणांचा सपाटा; महिनाभरात १६५ निर्णय, निधीबाबत प्रश्नचिन्ह
Cabinet Meeting Decision :
Cabinet Meeting Decision : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडणुकीस मुदतवाढ, शाळांना २० टक्के वाढीव अनुदान; राज्य सरकारचे मोठे निर्णय
analysis of maharashtra assembly elections in marathi
 ‘मावळतीचे मोजमाप : ते आहेत का आपला आवाज?
bjp flag
भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठ्यांचा खेळ !
pimpri chinchwad NCP is on the verge of a split
पिंपरी-चिंचवड ‘राष्ट्रवादी’ फुटीच्या उंबरठ्यावर?
When will the Nanded Lok Sabha by election be held
नांदेडची पोटनिवडणूक कधी ?

१. VHA – वोटर हेल्पलाईन अ‍ॅप

निवडणूक आयोगानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये या अ‍ॅपसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार मतदारांना नाव नोंदणीसाठी ऑनलाईन फॉर्म भरणे, मतदार यादी आपलं नाव तपासणे, मतदान केंद्राबाबतचा तपशील माहिती करून घेणे, आपल्या मतदान परिसराच्या बीएलओ किंवा ईआरओ पदाधिकाऱ्याशी संपर्क साधणे आणि ई-मतदान ओळखपत्र डाऊनलोड करणे अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.

२. cVigil

लोकसभा निवडणुकीवेळीही निवडणूक आयोगानं सी-व्हिजिल या मोबाईल अ‍ॅपचा वापर केला होता. यासंदर्भात यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती दिली. “याबाबत आम्ही फार उत्सुक आहोत. लोकसभा निवडणुकीदरम्यान आम्ही १० हजार कोटींची रोकड जप्त केली. नुकत्याच झालेल्या जम्मू-काश्मीर व हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्येही आम्ही मोठी रक्कम जप्त केली. आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्र व झारखंडमध्येही सजग नागरिक आम्हाला या अ‍ॅपवर त्यांच्या भागात घडणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराबाबत माहिती देतील. आम्ही तिथे ९० मिनिटांच्या हात पोहोचू”, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

३. KYC – तुमच्या उमेदवाराला जाणून घ्या

निवडणूक आयोगानं या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून उमेदवारांची सर्व माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन केलं आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाप्रमाणेच केवायसी अ‍ॅपवरही उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र मतदारांना पाहता येईल. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना त्यांची माहिती वर्तमानपत्रामध्ये तीन वेळा द्यावी लागेल, प्रत्येक मतदाराला उमेदवाराबाबतची माहिती मिळवण्याचा अधिकार आहे, असं निवडणूक आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं.

४. सुविधा पोर्टल

दरम्यान, मतदारांप्रमाणेच उमेदवारांच्या सोयीसाठी निवडणूक आयोगाकडून सुविधा पोर्टलची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यावर उमेदवारांना उमेदवारी अर्ज व प्रतिज्ञापत्र भरता येईल. तसेच, बैठका, सभा अशा गोष्टींसाठी उमेदवारांना या पोर्टलवरच ऑनलाईन पद्धतीने परवानगी घेता येईल. त्यामुळे ज्याचा आधी अर्ज येईल, त्या उमेदवाराला आधी परवानगी मिळेल, अशा पद्धतीने न्याय्य प्रक्रिया राबवली जाईल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly election schedule what is cvigil app voter helpline pmw

First published on: 15-10-2024 at 18:35 IST

संबंधित बातम्या