Maharashtra Assembly Election Polling Booth Closing Time : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अत्यंत संथगतीने सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला आता वेग येऊ लागला आहे. दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात फक्त ३२.१८ टक्के मतदानन झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणाकरता मतदान करणं आवश्यक असून मतदानासाठी अनेक कार्यालयांमध्ये सुट्टी तर काही कार्यालयांमध्ये काही वेळेची सवलत देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला बुधवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. सर्वच मतदारसंघात विविध पक्षांचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची लगबग सुरू झाली होती. मात्र काही मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर मतदारांची तुरळक उपस्थिती होती. तर काही मतदारसंघांवर मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसत होता. खासगी कंपन्यांमधील कर्मचारी सकाळी मतदान केंद्रात मतदान करून मार्गस्थ होत होते. मात्र एकूणच मतदानाच्या पहिल्या फेरीत सकाळी १० वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर फारसे मतदार फिरकले नाहीत.

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mumbai This election polling stations increased and started in housing societies to avoid evening crowding
साडेसहाशे गृहनिर्माण संस्थांमध्ये होणार मतदान, मुंबईत प्रथमच मोठ्या स्तरावर प्रयोग, मतदान वाढण्याची अपेक्षा
Collective transportation of voters to voting center in vehicles will be crime
सावधान! केंद्रावर मतदारांची ने-आण करणे गुन्हा, शेवटच्या ४८ तासांतही प्रचार, पण…
ED raids Maharashtra, maharashtra assembly election 2024
निवडणूक गैरप्रकारासाठी १२५ कोटी रुपयांचा वापर, ‘ईडी’ने महाराष्ट्रातील २४ ठिकाणी छापे टाकले
maharashtra assembly election 2024 polarization of buddhist vs hindu dalit votes in umred nagpur constituency
उमरेडमध्ये बौद्ध विरुद्ध हिंदू दलित मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या पथ्यावर ?
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
Chandrapur marathi news
एकदाच मतदान करण्याचा अधिकार…पण, या गावात मात्र दोन वर्षांत चौथ्यांदा…

दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी व्हायला लागली आहे. दुसऱ्या सत्राच्या अंती मतदार बाहेर पडून मतदानाला जात आहेत. परंतु, मतदान केंद्रांवर रांगा लागल्याने मतदारांचा हिरमोड होतोय. त्यातच सूर्य डोक्यावर आग ओकत असल्याने मतदारांनी मतदारांना काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. त्यामुळे ऊन कमी झाल्यावरही मतदार मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करू शकतात.

हेही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live : “मस्ती आली का तुला…”, अंबादास दानवेंकडून शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा शिविगाळ करतानाचा व्हिडीओ जाहीर

किती वाजेपर्यंत करता येणार मतदान?

राज्यातील २८८ मतदारसंघात मतदान सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानासाठी मतदान केंद्र खुले असणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. ९.७ कोटी मतदार ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

प्रमुख पक्षांचे उमेदवार

  • भाजप १४९
  • काँग्रेस १०१
  • शिवसेना( उद्धव ठाकरे) ९५
  • शिवसेना (शिंदे) ८१
  • राष्ट्रवादी (शरद पवार) ८६
  • राष्ट्रवादी (अजित पवार) ५९
  • मनसे १२५
  • वंचित २००
  • अपक्ष २०८६

२०१९ विधानसभा निवडणूक

भाजपा – लढवलेल्या जागा -१६४, विजय – १०५
शिवसेना – लढवलेल्या जागा – १२८, विजय – ५६
राष्ट्रवादी काँग्रेस – लढवलेल्या जागा – १२१, विजय – ५४
काँग्रेस – लढवलेल्या जागा – १४७, विजय – ४४