महाराष्ट्रात २०२२ साली झालेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींमुळे तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंनी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर नवीन सरकार स्थापन केलं. शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांनी एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी करत भाजपाशी युती केली. त्यामुळे शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट तयार झाले. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आणि ४० आमदारांसह अजित पवार युतीसोबत सरकारमध्ये सामील झाले. तिथेही शरद पवार गट व अजित पवार गट असे दोन गट तयार झाले.महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलं आहे. २८८ मतदारसंघांमध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा हा थेट सामना असेल. राज्यातील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीकडे २०० हून अधिक मतदारसंघ अर्थात आमदार आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असं चित्र सध्या दिसत आहे.
Maharashtra Assembly Constituency List 2024 – Detailed Results and Information
Explore detailed results for all 288 constituencies in Maharashtra across 36 districts and 6 regions, including the 2019 Maharashtra Election results. Discover information on the winning and runner-up candidates, their party affiliations, and other critical data. Stay updated on the Maharashtra political landscape with a comprehensive list of Maharashtra Vidhan Sabha constituencies.
This page is your go-to resource for constituency-specific election results, historical insights, and candidate details.