१५व्या महाराष्ट्र विधानसभेसाठी यंदा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलेलं आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होईल.
सध्याच्या हरयाणा विधानसभेत भाजपाकडे ४० आमदारांचं संख्याबळ आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडे ३० आमदार तर त्यांच्याशी आघाडी केलेल्या जननायक पक्षाचे १० अशा ४० आमदारांचं संख्याबळ विरोधकांकडेही आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांच्या भरंवशावर सध्या भाजपाची हरयाणात सत्ता स्थिर आहे.