Maharashtra Assembly Election Ajit Pawar NCP 4th Candidate List : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा कालावधी संपत जात असताना विविध पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्यासाठी घाई केली आहे. महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने आता चौथी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीतून दोघांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे अजित पवारांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण ५१ उमेदवारांना संधी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै २०२३ मध्ये बंडखोरी झाली. अजित पवारांनी पक्षातील ४० आमदारांना आपल्यासोबत घेऊन भारतील जनता पक्षाला समर्थन दिलं. त्यामुळे विरोधी बाकावरून ते थेट उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादींना हवीतशी जादू करून दाखवता आली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर सोडण्यात आलं. त्यामुळे विधानसभेत अजित पवार एकला चलो रे ची भूमिका घेतील असं म्हटलं जात होतं. परंतु, आम्ही महायुतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केल्यानंतर महायुतीत त्यांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis
निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच, भाजपाच्या बावनकुळेंपाठोपाठ शिवसेनेचाही दावा; पडद्यामागे चाललंय काय?
can eknath shinde join hands with sharad pawar
Sanjay Shirsat: निकालानंतर एकनाथ शिंदे शरद पवारांबरोबर जाणार?…
Eknath Shinde
मतदान संपताच अपक्षांचा भाव वधारला, महायुतीकडून जुळवाजुळव सुरू? शिवसेना नेते म्हणाले, “दोन-चार…”
devendra Fadnavis said increased voter turnout in state will benefit from it
मुख्यमंत्रीपद, वाढलेली मतदान टक्केवारीवर, फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले
Hadapsar constituency highest number of voters in Pune recorded lowest turnout
सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या मतदारसंघात झाली ‘ही’ स्थिती! झोपडपट्टी परिसरातील मतदान केंद्रांवर सायंकाळनंतर रांगा
akola election
वाढलेल्या मतांचा टक्का कुणाच्या पथ्यावर? अकोला जिल्ह्यात ७.१८ टक्के मतदान वाढले; पाचही मतदारसंघात दावे प्रतिदावे
Tension among candidates in Kalyan-Dombivli due to increased voting percentage
मतदानाच्या वाढीव टक्क्याने कल्याण-डोंबिवलीतील उमेदवारांमध्ये हुरहुर
maharashtra vidhan sabha election 2024 rohit pawar
कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढणाऱ्या रोहित पवारांकडे आहे ‘एवढी’ संपत्ती
wardha assembly constituency voting percentage increased ladki bahin yojana impact on deoli arvi hinganghat constituency
विक्रमी मतदानामुळे उमेदवारांचा जीव टांगणीला; ‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणाम?

हेही वाचा >> MNS Seventh Candidates List : मनसेची सातवी यादी जाहीर, आतापर्यंत १२८ जणांना उमेदवारी; सर्व शिलेदारांची नावे एका क्लिकवर!

आतापर्यंत अजित पवारांनी पक्षातील ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर, भाजपाने आतापर्यंत १४६ उमेदवार जाहीर केले असून शिंदेंनी सहयोगी मित्र पक्षांसह ८० जागा जाहीर केल्या आहेत. म्हणजेच २७७ जागांचा तिढा सुटला असून उर्वरित १० जागा अद्यापही जाहीर होणे बाकी आहे. त्या कोणाच्या वाट्याला जाता हे पाहावं लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची पहिली यादी (Ajit Pawar NCP Candidates List)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची दुसरी यादी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची तिसरी यादी

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची चौथी यादी

दरम्यान, महायुतीने जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला नव्हता. अनेक जागांवर मतभेद असल्याने त्यांनी थेट स्वंतत्रपणे उमेदवारच जाहीर केले. त्यामुळे उर्वरित १० जागा जाहीर झाल्यानंतरच महायुतीतील फॉर्म्युला स्पष्ट होईल.