Maharashtra Assembly Election BJP 3rd Candidate List: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं तिसरी यादी जाहीर केली आहे. पहिली यादी ९९ उमेदवारांची, दुसरी यादी २२ उमेदवारांची यापाठोपाठ भाजपानं आज तिसरी यादी २५ उमेदवारांची जाहीर केली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून १४६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मोर्शी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपानंही या मतदारसंघातून उमेश यावलकर यांना उमेदवारी दिली आहे.

तीन विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलं!

भाजपांन आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीमध्ये तीन विद्यमान आमदारांची तिकिटं कापल्याचं दिसून येत आहे. त्यात आर्णीतून संदीप दुर्वै यांच्याऐवजी राजू तोडसाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूर मध्यमधून विकास कुंभारे यांच्याऐवजी प्रवीण दटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आर्वीतून दादाराव केचे यांच्याऐवजी सुमीर वानखेडे यांना तिकीट देण्यात आलं आहे.

वाचा आज जाहीर झालेल्या भाजपा उमेदवारांची संपूर्ण यादी

क्र.मतदारसंघ क्रमांकमतदारसंघ नावउमेदवार नाव
३२मुर्तिजापूर (SC)हरिश पिंपळे
३५कारंजासई डहाके
३९तेओसाराजेश वानखडे
४३मोर्शीउमेश यावलकर
४४आर्वीसुमित वानखेडे
४८कटोलचरणसिंग ठाकूर
४९सावनेरआशीष देशमुख
५५नागपूर मध्यप्रवीण दटके
५६नागपूर पश्चिमसुधाकर कोहले
१०५७नागपूर उत्तर (SC)मिलिंद माने
११६२साकोलीअविनाश ब्राह्मणकर
१२७१चंद्रपूर (SC)किशोर जोरगेवार
१३८०आर्णी (ST)राजू तोडसाम
१४८२उमरखेड (SC)किसन वानखेडे
१५९०देगलूर (SC)जितेश अंतापूरकर
१६१२८डहाणू (ST)विनोद मेढा
१७१३३वसईस्नेहा दुबे
१८१५२बोरीवलीसंजय उपाध्याय
१९१६४वर्सोवाडॉ. भारती लव्हेकर
२०१७०घाटकोपर पूर्वपराग शाह
२१२३१आष्टीसुरेश धस
२२२३५लातूर शहरडॉ. अर्चना पाटील चाकूरकर
२३२५४माळशिरस (SC)राम सातपुते
२४२५९कराड उत्तरमनोज घोरपडे
२५२८५पळुस-कडेगावसंग्राम देशमुख
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तिसरी उमेदवार यादी

भारतीय जनता पक्षानं तिसरी यादी जाहीर केल्यानंतर आता महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून मोर्शी विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र भुयार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरदेखील भारतीय जनता पक्षानं आपल्या उमेदवार यादीमध्ये मोर्शीतून उमेश यावलकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Maharashtra BJP Candidate List 2024 : भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर! नाशिकचा वाद मिटवला, पडळकरांनाही तिकीट; वाचा सर्व १२१ शिलेदारांची नावं

प्रकाश मेहता, गोपाळ शेट्टींना उमेदवारी नाकारली

घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहता उमेदवारीसाठी इच्छुक होते असं सांगितलं जात आहे. मात्र, त्यांना तिकीट नाकारून भाजपानं पुन्हा पराग शाह यांनाच उमेदवारी दिली आहे. तसेच, बोरीवलीमधून गोपाळ शेट्टी उमेदवारीसाठी इच्छुक असताना संजय उपाध्याय यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अर्चना पाटील चाकूरकर यांना लातूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.