Maharashtra Assembly Elections 2024 Exit Poll Results Comparison With 2029 Polls : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील) बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले. या दोन्ही राज्यातील निवडणुकींचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था व खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज (Exit Poll) जाहीर केले आहेत. प्रमुख १० संस्थांचे अंदाज (निवडणूक निकालाचे एक्झिट पोल) पाहिले तर त्यापैकी सहा अंदाज हे महायुतीच्या बाजूने आहेत, तर चार संस्थांच्या मते राज्यात महाविकास आघाडीला बहुमत मिळू शकतं. मात्र हे एक्झिट पोल किती बरोबर ठरणार याबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. २०१९ च्या निवडणुकीचे किती एक्झिट पोल बरोबर ठरले होते असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी ही राज्यातील सर्वात मोठी पार्टी (पक्ष) म्हणून समोर आली होती. भाजपाने १०५ जागांवर विजय मिळवला होता, तर शिवसेनेने (संयुक्त) ५६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (संयुक्त) पक्षाला ५४ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला होता. मात्र, या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधी सादर केलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजपा-शिवसेना युतीला २०३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता; तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ८० ते ९० जागा मिळतील असं म्हटलं होतं. परंतु, भाजपा-शिवसेना युतीला केवळ १६१ जागा जिंकता आल्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला ९८ जागा मिळाल्या.

हे ही वाचा >> कथित ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आवाज, सुप्रिया सुळे यांनी आरोप फेटाळले; आरोप करणाऱ्यांना नोटीस

न्यूज १८- आयपीएसओएसचा एक्झिट पोल सर्वात हास्यास्पद ठरला होता. त्यांनी अंदाज वर्तवला होता की, एनडीएला २४३ व आघाडीला केवळ ४१ जागा मिळतील; तर इंडिया-टुडे अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल हा अचूकतेच्या जवळ जाणारा होता. इंडिया-टुडे अ‍ॅक्सिस माय इंडियाने म्हटलं होतं की, एनडीएला १६६ तर काँग्रेस-राष्ट्रवादीला ९० पेक्षा जास्त जागा मिळतील. रिपब्लिक-जन की बात या संस्थेने सर्वेक्षणानंतर २१६ ते २३० जागांवर एनडीएचे उमेदवार विजयी होतील आणि ५२ ते ५९ जागांवर यूपीएच्या उमेदवारांना विजय मिळेल असा अंदाज वर्तवला होता. तर टाइम्स नाऊच्या एक्झिट पोलमध्ये २३० जागा या एनडीएला मिळतील आणि ४८ जागा या यूपीएला मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. एबीपी न्यूज-सी व्होटरने २०४ जागा या एनडीएला आणि ६९ जागा यूपीएला मिळतील असं म्हटलं होतं, हे दोन्ही अंदाज चुकले होते.

हे ही वाचा >> राज्यात मतविभागणीचे ‘हरियाणा प्रारूप’?

झारखंडच्या निवडणुकीच्या निकालाबाबतचे एक्झिट पोल अचूक होते का?

झारखंडच्या बाबतीतही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळाली होती. २०१९ च्या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने ८१ पैकी ३० जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने १६, भाजपाने २५, झारखंड विकास मोर्चाने ३ व ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनने २ जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्राप्रमाणे झारखंडमध्येदेखील इंडिया-टुडे अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल अचूकतेच्या जवळ जाणारा होता. त्यांनी भाजपा २२ जागा जिंकेल असं म्हटलं होतं, तर यूपीएला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. टाईम्स नाऊच्या सर्वेक्षणानुसार जेएमएमच्या नेतृत्वाखालील युतीला ५० जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एबीपी-व्होटरने जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार, झारखंडमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यांच्या एक्झिट पोलनुसार यूपीएला ३५ जागा, तर भाजपाला ३२ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. हा अंदाजदेखील काहीसा अचूकतेच्या जवळ जाणारा होता.

२०२४ मध्ये १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाबाबत यंदा जाहीर केलेल्या १० पैकी सहा एक्झिट पोल्सनी महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. तर एका तीन एक्झिट पोल महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. एक एक्झिट पोल (Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024) म्हणतोय की त्रिशंकू अवस्था होईल.

एक्झिट पोलमहायुतीमहाविकास आघाडी
इलेक्ट्रोल एज एक्झिट पोलमहायुती -११८ जागामहाविकास आघाडी १५० जागा
पोल डायरी एक्झिट पोलमहायुती -१२२ ते १८६महाविकास आघाडी- ६९ ते १२१
चाणक्य एक्झिट पोलमहायुती १५२ ते १६० जागामहाविकास आघाडी -१३० ते १३८ जागा
मॅट्रिझचा एक्झिट पोलमहायुती १५० ते १७० जागामहाविकास आघाडी – ११० ते १३० जागा
पी मार्क्यू एक्झिट पोलमहायुती-१३७ ते १५७ जागामहाविकास आघाडी- १२६ ते १४६ जागा
रिपब्लिक एक्झिट पोलमहायुती- १३७ ते १५७ जागामहाविकास आघाडी १२६ ते १४६ जागा
SAS एक्झिट पोलमहायुती – १२७ ते १३५ जागामहाविकास आघाडी- १४७ ते १५५ जागा
पिपल्स पल्स एक्झिट पोलमहायुती १७५ ते १९५ जागामहाविकास आघाडी-८५ ते ११२ जागा
भास्कर रिपोर्टर्स पोलमहायुती- १२५ ते १४० जागामहाविकास आघाडी १३५ ते १५० जागा
लोकशाही महारुद्रमहायुती-१२८ ते १४२ जागामहाविकास आघाडी- १२५ ते १४० जागा