Maharashtra Assembly Election MNS 7th Candidate List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातवी यादी जाहीर केली असून या यादीतून त्यांनी १८ जणांना उमेदवारी दिली आहे. मनसेने आतापर्यंत १२८ जणांना उमेदवारी देऊ केली आहे. यामध्ये अनेक हायवोल्टेज मतदारसंघांचाही समावेश आहे. त्यामुळे या निवडणुकीत मनसे काय जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानिमित्ताने सर्वच पक्षांनी उमेदवारी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत होत असताना मनसेनेही सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत मनसेने ११० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. टप्प्याटप्प्याने उमेदवार जाहीर केले जात असून २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

दरम्यान, मनसेसाठी माहिम विधानसभा मतदारसंघ प्रचंड प्रतिष्ठेचा मतदारसंघ राहणार आहे. कारण या मतदारसंघातून राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांबरोबर अमित ठाकरेंची लढत असणार आहे. अमित ठाकरेंनी २८ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा अर्ज भरला.

हेही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात

मनसेने आज जाहीर केलेली सातवी यादी

विधानसभा मतदारसंघउमेदवार
बाळापूरमंगेश गजानन गाडगे
मुर्तिजापूरभिकाजी श्रावण अवचर
वाशिमगजानन निवृती वैरागडे
हिंगणघाटसतीश लक्ष्मणराव चौधरी
उमरखेडराजेंद्र वामन नजरधने
औरंगाबाद मध्यसुहास अनंत दाशरथे
नांदगावअकबर शमीम सोनावाला
इगतपुरीकाशिनाथ दगडू मेंगाळ
डहाणूविजय देवजी वाढिया
बोईसरशैलेश दशरथ भुतकडे
भिवंडी पूर्वमनोज वामन गुळवी
कर्जत खालापूरजगन्नाथ परशुराम पाटील
उरणसत्यवान पंढरीनाथ भगत
इंदापूरअमोल शिवाजी देवकाते
पुरंदरउमेश नारायण जगताप
श्रीरामपूरराजू नाथा कापसे
पारनेरअविनाश मुरलीधर पवार
खानापूरराजेश रामचंद्र जाधव

मनसेची पहिली आणि दुसरी यादी

मनसेची तिसरी यादी

मनसेची चौथी यादी

मनसेची पाचवी यादी

मनसेची सहावी यादी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रोज उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. अर्ज भरण्याकरता आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेले असताना मनसे अजून किती उमेदवार जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.