Ajit Pawar NCP Vidhan Sabha Election 2024 Candidates 2024 List: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी आज जाहीर केली आहे. विशेष म्हणजे आजच पाच जणांना पक्षात प्रवेश देऊन लगेचच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय होणार? याची चर्चा होती. त्यावरूनही आता पडदा उठला आहे. नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हीला अणुशक्ती नगर विधानसभेसाठी तिकीट जाहीर झाले आहे. तर झिशान सिद्दिकालाही आज पक्षप्रवेश देऊन वांद्रे पूर्व येथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अजित पवार गटात आज झिशान सिद्दिकी, निशिकांत पाटील, संजयकाका पाटील, सना मलिक आणि प्रताप पाटील चिखलीकर यांना पक्षप्रवेश देण्यात आला. पक्षप्रवेश होताच त्यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली.

Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fifth list of 5 candidates
Sharad Pawar NCP 5th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढा मतदारसंघात दिली ‘या’ नेत्याला उमेदवारी
NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार
NCP Candidate List
NCP Candidate 3rd List : मोठी बातमी! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली उमेदवारी?
Sharad Pawar and Uddhav Thackeray candidate list for vidhan sabha Election
Sharad Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर; शिवसेना उबाठा गटाच्या विरोधात दिला उमेदवार, वाद होण्याची शक्यता?
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
1इस्लामपूरनिशिकांत पाटील
2तासगाव-कवठे महांकाळसंजयकाका पाटील
3अणुशक्ती नगरसना मलिक
4वांद्रे पूर्वझिशान सिद्दिकी
5वडगाव शेरीसुनील टिंगरे
6शिरूरज्ञानेश्वर कटक
7लोहाप्रताप पाटील-चिखलीकर

भाजपाच्या दोन माजी खासदारांना पक्षप्रवेश

पुर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मध्यंतरी दोन टर्म भाजपाकडून सांगलीचे खासदार राहिलेल्या संजय काका पाटील यांनी आज पक्षप्रवेश घेताच त्यांना तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली आहे. ते दिवंगत आर. आर. पाटील यांचे पारंपरिक विरोधक मानले जातात. या मतदासंघात आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटीलशी त्यांचा सामना होणार आहे. रोहित पाटील अवघ्या २५ वर्षांचा असून त्याची ही पहिलीच निवडणूक आहे. तसेच भाजपाचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे.

तसेच नवाब मलिक यांच्या मुलीलाही उमेदवारी दिली गेली आहे. दाऊदशी संबंधित व्यक्तीशी जमिनीचे व्यवहार केल्यामुळे नवाब मलिक ईडीच्या कारागृहात होते. त्यांची जामिनावर सुटका झालेली आहे. भाजपाने त्यांना याआधीही कडाडून विरोध केला होता. त्यांच्याजागी मुलीला उमेदवारी देण्यात आली आहे.

हे वाचा >> Zeeshan Siddique: मविआनं तिकीट नाकारलं, झिशान सिद्दिकी आता अजित पवार गटातून आदित्य ठाकरेंच्या भावाला टक्कर देणार

पुणे पोर्श अपघात प्रकरणातील सुनील टिंगरेंना उमेदवारी

पुणे पोर्श अपघात प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव घेतले गेले होते. त्यांनी अपघाताच्या दिवशी पोलीस ठाणे गाठून अल्पवयीन आरोपीला सोडविण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला गेला. मध्यंतरी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वडगाव शेरीमध्ये आक्रमक प्रचार करत दोन जीव घेणाऱ्यांना मदत करणाऱ्यांना निवडणुकीत पाडा, असा थेट हल्ला टिंगरेंवर केला होता.

हे ही वाचा >> Sharad Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची पहिली यादी जाहीर; बारामतीमध्ये अजित पवार वि. युगेंद्र पवार लढत निश्चित, रोहिणी खडसेही मैदानात

जयंत पाटील यांना निशिकांत भोसले पाटील यांचे आव्हान

इस्लामपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनीही आज अजित पवार गटात पक्षप्रवेश केला. त्याना इस्लामपूरमधून उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातत्याने निवडून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जयंत पाटील हे अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सातत्याने टीका करत आले आहेत. त्यामुळे यावेळी जयंत पाटील यांना मतदारसंघातच आव्हान देण्याची खेळी केल्याचे बोलले जात आहे.

Story img Loader