Sharad Pawar NCP Vidhan Sabha Election 2024 Candidates List: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पुन्हा एकदा दिसणार आहे. तर मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे युवा नेते महेबुब शेख यांना बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उरलेल्या मतदारांची यादी मुंबईत जाऊन जाहीर केली जाईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले. काही जागांवर अद्यापही चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांची नावे मुंबईतच जाहीर केले जाईल, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले की, तीनही पक्षांनी प्रत्येकी ८५ जागांवर एकमत केले आहे. उरलेल्या जागांवर मित्रपक्षांशी चर्चा करून त्याही जागा लवकरच जाहीर केल्या जातील. तीनही पक्ष २७५ जागा लढविणार असून उरलेल्या जागा मित्रपक्षांना देण्यात येतील. तसेच मुंबईतील अणुशक्ती नगर हा नवाब मलिकांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, हा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली

इस्लामपूरजयंत पाटील
काटोलअनिल देशमुख
घनसावंगीराजेश टोपे
कराड उत्तरबाळासाहेब पाटील
मुंब्रा कळवाजितेंद्र आव्हाड
कोरेगावशशिकांत शिंदे
वसमतजयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीणगुलाबराव देवकर
इंदापूरहर्षवर्धन पाटील
१०राहुरीप्राजक्त तनपुरे
११शिरूरअशोक पवार
१२शिराळामानसिंगराव नाईक
१३विक्रमगडसुनील भुसारा
१४कर्जत जामखेडरोहित पवार
१५अहमदपूरविनायकराव पाटील
१६सिंदखेडराजाडॉ. राजेंद्र शिंगणे
१७उदगीरसुधाकर भालेराव
१८भोकरदनचंद्रकांत दानवे
१९तुमसरचरण वाघमारे
२०किनवटप्रदीप नाईक
२१जिंतूरविजय भांबळे
२२केजपृथ्वीराज साठे
२३बेलापूरसंदीप नाईक
२४वडगाव शेरीबापूसाहेब पठारे
२५जामनेरदिलीप खोडपे
२६मुक्ताईनगररोहिणी खडसे
२७मुर्तिजापूरसम्राट डोंगरदिवे
२८नागपूर पूर्वदुनेश्वर पेठे
२९तिरोडारविकांत बोपचे
३०अहेरीभाग्यश्री आत्राम
३१बदनापूररुपकुमार चौधरी
३२मुरबाडसुभाष पवार
३३घाटकोपर पूर्वराखी जाधव
३४आंबेगावदेवदत्त निकम
३५बारामतीयुगेंद्र पवार
३६कोपरगावसंदीप वर्पे
३७शेवगावप्रताप ढाकणे
३८पारनेररानी लंके
३९आष्टीमहेबुब शेख
४०करमाळानारायण पाटील
४१सोलापूर उत्तरमहेश कोठे
४२चिपळूनप्रशांत यादव
४३कागलसमरजीत घाटगे
४४तासगाव-कवठे महांकाळरोहित पाटील
४५हडपसरप्रशांत जगताप

पुढील दोन दिवसांत महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा जाहीर केला जाईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

Story img Loader