Shivsena Eknath Shinde Candidates List Update : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने २० जणांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये त्यांनी मिलिंद देवरा, संजय निरुपम, निलेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर, आता त्यांच्याविरोधात मिलिंद देवरा रिंगणात उतरले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी पहिल्या यादीतून ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तर, आता दुसऱ्या यादीतून २० जणांची नावे जाहीर केली आहेत. एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत ६५ जणांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान, महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार याबाबत स्पष्टता झालेली नसल्याने एकनाथ शिंदेंकडून अजून किती जागा जाहीर केल्या जातील हे गुलदस्त्यात आहे.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येत आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 27, 2024
सर्व उमेदवारांना विजयी शुभेच्छा.@Shivsenaofc #शिवसेना… pic.twitter.com/YfRdhV0U6K
एकनाथ शिंदे यांची दुसरी यादी जाहीर
विधानसभा मतदारसंघ | उमेदवार |
अक्कलकुआ | आमश्या फलजी पाडवी |
बाळापुर | बळीराम भगवान शिरसकर |
रिसोड | भावना पुंडलीकराव गवळी |
हदगाव | संभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर |
नांदेड दक्षिण | आनंद शंकर तिडके पाटील (बोंडारकर) |
परभणी | आनंद शेशराव भरोसे |
पालघर | राजेंद्र घेड्या गावित |
बोईसर (अज) | विलास सुकुर तरे |
भिवंडी ग्रामिण (अज) | शांताराम तुकाराम मोरे |
भिवंडी पूर्व | संतोष मंजय्या शेट्टी |
कल्याण पश्चिम | विश्वनाथ आत्माराम भोईर |
अंबरनाथ (अजा) | डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर |
विक्रोळी | श्रीमती सुवर्णा सहदेव करंजे |
दिंडोशी | संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम |
अंधेरी पूर्व | मूरजी कांनजी पटेल |
चेंबूर | तुकाराम रामकृष्ण काते |
वरळी | मिलिंद मुरली देवरा |
पुरंदर | विजय सोपानराव शिवतारे |
कुडाळ | निलेश नारायण राणे</td> |
कोल्हापूर उत्तर | राजेश विनायक क्षिरसागर |
काँग्रेसमधून आलेल्या संजय निरुपमांना संधी
लोकसभा निवडणुकीच्या वेळी संजय निरुपम यांनी काँग्रेसला रामराम ठोकला अन् एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. परंतु, विधानसभा निवडणुकीत त्यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसमधून आलेल्या संजय निरुपम यांना दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली असून ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू येथील दोन टर्म आमदार आहेत. तसंच, या निवडणुकीतही ते संजय निरुपम यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत.
हेही वाचा >> MNS Candidates List : मनसेची सहावी यादी जाहीर; मुंबई-ठाण्यातील महत्त्वाच्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा!
आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा
वरळी विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे पहिल्यांदा वरळी विधानसभेतून निवडून आले. आता त्यांच्याविरोधात काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या मिलिंद देवरा यांच्याविरोधात सामना करावा लागणार आहे. मिलिंद देवरा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. परंतु, आदित्य ठाकरेंविरोधात तगडा उमेदवार देण्याकरता त्यांना पुन्हा विधानसभेतून निवडणूक लढवण्यास सज्ज करण्यात करण्यात आले आहे.
कुडाळसाठी शिंदेंनी आयात केला उमेदवार
कुडाळ विधानसभा निवडणुकीसाठी निलेश राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निलेश राणे हे भाजपाचे नेते आहेत. परंतु, कुडाळ विधानसभा मतदारसंघ शिंदेंकडे गेल्याने निलेश राणे समन्वयाने एकनाथ शिंदे यांच्या शिवेसना पक्षात गेले. कुडाळमध्ये वैभव नाईक दोन टर्मचे आमदार आहेत. त्यामुळे येथेही शिवसेने विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
म