Shivsena Eknath Shinde 3rd Candidates List Announced : शिवसेनेने (एकनाथ शिंदे) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या १५ उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. ही शिंदेंच्या शिवसेनेची तिसरी यादी आहे. या यादीद्वारे शिवसेनेने भाजपाच्या शायना एन. सी. यांना मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. शायना एनसी या वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत होत्या. मात्र, त्यांना वरळीतून उमेदवारी मिळू शकली नाही. मात्र, आता त्यांना शिवसेनेने (शिंदे) मुंबादेवीमधून उमेदवारी दिली आहे. शायना एनसी या लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश करतील.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंदखेडराजा मतदारसंघातून शशिकांत खेडेकर यांना, तर कन्नड मतदारसंघातून संजना जाधव यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
baramati shrinivas pawar ajit pawar yugendra pawar
Shrinivas Pawar : “आमच्या आईला राजकारणावर बोलणं आवडत नाही, तिने…”, अजित पवारांचा ‘तो’ दावा थोरल्या भावाने फेटाळला!
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Maharashtra assembly election 2024 Ajit Pawar NCP releases fourth list of 2 candidates
Ajit Pawar NCP 4th Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा >> “मी बारामतीतून निवडणूक लढणार नव्हतो, पण…”, अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी नौटंकी…”

शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची तिसरी यादी

क्र.मतदारसंघउमेदवाराचे नाव
1सिंदखेडराजाशशिकांत खेडेकर
2घनसावंगीहिकम उढाण
3कन्नडसंजना जाधव
4कल्याण ग्रामीणराजेश मोरे
5भांडूप (पश्चिम)अशोक मोरे
6मुंबादेवीशायना एनसी
7संगमनेरअमोल खताळ
8श्रीरामपूरभाऊसाहेब कांबळे
9नेवासाविठ्ठलराव लंघे-पाटील
10धाराशिवअजित पिंगळे
11करमाळादिग्विजय बागल
12बार्शीविठ्ठ्ल राऊत
13गुहागरराजेश बेंडल

हे ही वाचा >> Shrinivas Pawar : “आमच्या आईला राजकारणावर बोलणं आवडत नाही, तिने…”, अजित पवारांचा ‘तो’ दावा थोरल्या भावाने फेटाळला!

शिवसेनेच्या (शिंदे) सहयोगी पक्षाचे उमेदवार

(या उमेदवारांना शिवसेनेच्या कोट्यातून मतदारसंघ मिळाले आहेत)

क्र.उमेदवारशिवसेनेचा (शिंदे) सहयोगी पक्षमतदारसंघ
14अशोकराव मानेजनसुराज्य पक्षहातकणंगले
15राजेंद्र येड्रावकरराजर्षी शाहूविकास आघाडीशिरोळ

शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवारांची दुसरी यादी

विधानसभा मतदारसंघउमेदवार
अक्कलकुआआमश्या फलजी पाडवी
बाळापुरबळीराम भगवान शिरसकर
रिसोडभावना पुंडलीकराव गवळी
हदगावसंभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर
नांदेड दक्षिणआनंद शंकर तिडके पाटील (बोंडारकर)
परभणीआनंद शेशराव भरोसे
पालघरराजेंद्र घेड्या गावित
बोईसर (अज)विलास सुकुर तरे
भिवंडी ग्रामिण (अज)शांताराम तुकाराम मोरे
भिवंडी पूर्वसंतोष मंजय्या शेट्टी
कल्याण पश्चिमविश्वनाथ आत्माराम भोईर
अंबरनाथ (अजा)डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर
विक्रोळीश्रीमती सुवर्णा सहदेव करंजे
दिंडोशीसंजय ब्रिजकिशोरलाल निरुपम
अंधेरी पूर्वमूरजी कांनजी पटेल
चेंबूरतुकाराम रामकृष्ण काते
वरळीमिलिंद मुरली देवरा
पुरंदरविजय सोपानराव शिवतारे
कुडाळनिलेश नारायण राणे
कोल्हापूर उत्तरराजेश विनायक क्षिरसागर

हे ही वाचा >> Maharashtra Assembly Election 2024 : कोण आहे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार? ‘या’ १० नेत्यांकडे आहे बक्कळ संपत्ती

शिंदेंचे ८० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पहिल्या यादीतून ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर रविवारी (२७ ऑक्टोबर) त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीद्वारे त्यांनी २० जणांची नावे जाहीर केली. पाठोपाठ आज १५ उमेदवार जाहीर केले आहेत. याचाच अर्थ शिंदे यांनी आता ८० उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार याबाबत स्पष्टता नसली तरी भाजपाने आतापर्यंत १४६ तर, शिवसेनेने ८० उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) ४९ उमेदवार जाहीर केले आहेत.