उमेदवारी अर्ज भरायला अवघे दोन दिवस उरलेले असल्याने सर्वच पक्षांकडून जागा वाटप जलद गतीने सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधील वाद संपत नसल्याने त्यांचं जागा वाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. दरम्यान, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी स्वंतत्र लढणार असल्याने त्यांनीही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. मनसेने काल (२७ ऑक्टोबर) सहावी यादी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही आठवी यादी जाहीर केली आहे. या यादीतून त्यांनी वरळीतून आदित्य ठाकरे आणि माहिममधून अमित ठाकरे यांच्याविरोधात त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्रातील राजकाणारणात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी विविध प्रयोग करून स्वबळावर आपले आदराचे वेगळे स्थान निर्माण केले. सामाजिक अभियांत्रिकीचा त्यांचा ‘अकोला पॅटर्न’ संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या छोट्या-मोठ्या समाजाची एकत्रित मोट वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केला. वंचितची वैचारिक प्रणाली संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, समाजवादी, पुरोगामी आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित आघाडीला मोठा जनाधार लाभला. त्यांचे उमेदवार विजयी झाले नसले तरी घेतलेल्या मतांच्या टक्केवारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारणात बरेच परिवर्तन घडले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समविचारी म्हणून काँग्रेस आघाडीसोबत जाण्याच्या दृष्टीने वंचित व त्यांच्यात चर्चेच्या फैरी झडल्या. मात्र, जागा वाटप व इतर मुद्द्यांवरून एकमत न झाल्याने वंचित पुन्हा एकदा स्वबळावर लढली. या निवडणुकीत वंचित आघाडीला अपेक्षित मते मिळाली नाही. २०१९ च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मतांचा टक्का घसरला. वंचितची परंपरागत दलित व मुस्लिमांची मतपेढी मविआसह विशेषत: काँग्रेसकडे वळल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितने काँग्रेसला काही जागांवर पाठिंबा दिल्यावरही अकोल्यात ॲड. प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला. ॲड.आंबेडकरांच्या पराभवासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याची भावना वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे वंचितमध्ये काँग्रेसविरोधात तीव्र रोषाची भावना आहे.
The Vanchit Bahujan Aaghadi is pleased to declare its eighth list of candidates for the Maharashtra Assembly elections. #MaharashtraAssembly2024 #VoteForVBA #VoteForGasCylinder pic.twitter.com/l4i5Dh4u36
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 27, 2024
b
ं
हेही वाचा >> ‘वंचित’च्या राजकारणाचे बदलते सूर? काँग्रेससह मविआ प्रथम लक्ष्य; संविधान व आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी
वंचितची आठवी यादी जाहीर
विधानसभा मतदारसंघ | उमेदवार |
जळगाव ग्रामीण | प्रवीण जगन्नाथ सपकाळे |
अमळनेर | विवेकानंद वसंतराव पाटील |
एरंडोल | गौतम मधुकर पवार |
बुलढाणा | प्रशांत उत्तम वाघोदे |
जळगाव जामोद | डॉ प्रविण पाटील |
अकोट | दीपक बोडके |
अमरावती | राहुल मेश्राम |
तिरोरा | अतुल मुरलीधर गजभिये |
राळेगाव | किरण जयपाल कुमरे |
उमरखेड | तात्याराव मारोतराव हनुमंते |
हिंगोली | जावेद बाबु सय्यद |
फुलंब्री | महेश कल्याणराव निनाळे |
औरंगाबाद पूर्व | अफसर खान यासीन खान |
गंगापुर | अनिल अशोक चंडालिया |
वैजापूर | किशोर भीमराव जेजुरकर |
नांदगाव | आनंद सुरेश शिनगारे |
भिवंडी ग्रामीण | प्रदिप दयानंद हरणे |
अंबरनाथ | सुधीर पितांबर बागुल |
कल्याण पुर्व | विशाल विष्णु पावशे |
डोंबिवली | सोनिया इंगोले |
कल्याण ग्रामीण | विकास इंगळे |
बेलापूर | सुनील प्रभु भोले |
मागाठाणे | दिपक हनवते |
मुलुंड | प्रदिप महादेव शिरसाठ |
भांडूप पश्चिम | स्नेहल सोहनी |
विलेपार्ले | संतोष गणपत अमुलगे |
चांदिवली | दत्ता निकम |
कुर्ला | स्वप्नील जवळगेकर |
बांद्रा पश्चिम | आकीफ दाफेदार |
माहीम | आरिफ उस्मान मिठाईवाला |
भायखळा | फहाद मुजाहिद खान |
कोथरूड | योगेश दीपक राजापुरकर |
खडकवासला | संजय जयराम धिवर |
श्रीरामपुर | अण्णासाहेब आप्पाजी मोहन |
निलंगा | मंजू निंबाळकर |
माढा | मोहन नागनाथ हळणवर |
मोहळ | अतुल मुकुंद वाघमारे |
सातारा | बबन गणपती करडे |
चंदगड | अर्जुन मारुती दुंडगेकर |
करवीर | दयानंद मारुती कांबळे |
इचलकरंजी | शमशुद्दिन हिदायतुल्ला मोमीन |
तासगाव कवठे महाकाळ | युवराज चंद्रकांत घागरे |
बातमी अपडेट होत आहे