NCP Ajit Pawar vs NCP Sharad Pawar Exit Poll Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चालू असलेला रणसंग्राम सध्या शेवटाकडे आला आहे. आज राज्यभर मतदान पार पडलं असून मताची टक्केवारी सत्ताधाऱ्यांसाठी दिलासादायक तर विरोधकांसाठी चिंता वाढवणारी ठरली आहे. मतदानाची टक्केवारी वाढली तर बदलाचा संकेत मानला जातो. मात्र, यंदा मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. त्यातच विरोधकांसाठी एग्झिट पोल्सचे आकडेही दिलासा देऊ शकले नाहीत. जवळपास सर्वच एग्झिट पोल्समध्ये महायुतीला विजयी कल दिला आहे. पण पक्षफुटीनंतर राज्यात काय चित्र आहे? याबाबतही एग्झिट पोल्समधून अंदाज बांधले जात आहेत.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये उभी फूट पडल्यामुळे राज्यात विचित्र अशी राजकीय स्थिती निर्माण झाली. या दोन्ही पक्षांचे गट सत्ताधारी बाजूलाही होते आणि विरोधी बाजूलाही. गेल्या वर्षी अजित पवारांसंह राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार सत्ताधारी बाजूला गेले. त्यामुळे ही पक्षासोबतच पवार कुटुंबातही फूट पडल्याचं मानलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीचं चित्र काय?
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला. अजित पवार गटाला ४ जागा मिळाल्या होत्या. पण त्यात फक्त एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला. त्याउलट शरद पवार गटाला १० जागांपैकी ८ जागांवर विजय मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणूक निकालाचीच पुनरावृत्ती होईल असं मानलं जात असताना आता मतदानोत्तर चाचणी अर्थात Exit Polls आलेल्या आकड्यांवरून तर्क-वितर्क लावले जात आहेत.
काय आहे एग्झिट पोल्सचा अंदाज?
महाराष्ट्रात समोर आलेल्या वेगवेगळ्या एग्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.
इलेक्टोरल एज पोलनुसार…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ४६
मॅट्रिझ एग्झिट पोलनुसार…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १७ ते २६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ३५ ते ४३
चाणक्य पोलनुसार…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – २२+
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ४०+
पोलडायरी पोलनुसार…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – १८ ते २८
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – २५ ते ३९
रिपब्लिक एग्झिट पोलनुसार…
महायुती – १३७ ते १५७
मविआ – १२६ ते १४६
इतर – २ ते ८
इलेक्टोरल एज पोलनुसार…
महायुती – ११८
महाविकास आघाडी – १५०
इतर – २०
F