Election Commission Press Conference, Maharashtra Assembly Election Dates: लोकसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरधून पैशांच्या बॅगा नेण्यात आल्या, असा आरोप विरोधकांनी केला होता. याबाबत आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्रकार परिषेदत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, सर्वांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सर्वांच्याच हेलिकॉप्टरची तपासणी करण्यासाठी जराही मागेपुढे पाहू नये, असेही सांगितले गेले आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, त्यांची बदली करण्यात यावी, असेही निर्देश दिले असल्याचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका कधी होणार, याचीही माहिती त्यांनी दिली.

हे वाचा >> Maharashtra Election 2024 : “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख…”, निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काय सांगितलं?

देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
one nation one election
मोठी बातमी! केंद्रीय मंत्रिमंडळाची ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटविण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे मत काय आहे? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राजीव कुमार म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांना विद्यमान पदावर तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांची तात्काळ बदली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मग ते कोणत्याही विभागाचे अधिकारी असले तरीही त्यांना हटविण्यात यावे.

मात्र कोणत्याही पक्षाच्या वैयक्तिक तक्रारीला आम्ही ग्राह्य धरत नाहीत. आमच्याकडे लेखी तक्रारी आल्या आहेत. पण आचारसंहिता अद्याप लागू झालेली नाही. जेव्हा आचारसंहिता लागू होईल, तेव्हा आम्ही अशा तक्रारी आल्या तर त्यावर त्या वेळी निर्णय घेऊ.

राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हाबद्दल काय म्हणाले?

निवडणूक आयोगाने राजकीय चिन्हांबाबत आधीच निर्णय दिलेले आहेत. ज्या पक्षांचे दोन गट आहेत, त्यांना आम्ही त्यांच्या विनंतीनुसार इतर चिन्ह दिले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांच्या चिन्हाबाबत आताच काही सांगू शकत नाही, असे राजीव कुमार म्हणाले.

महाराष्ट्रात निवडणुका कधी होणार?

विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुका २६ नोव्हेंबर पूर्वीच पार पडतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले. मात्र त्यांनी यावेळी निश्चित तारीख सांगितली नाही.

याशिवाय राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील मतदारांची माहिती दिली. महाराष्ट्रात एकूण ९.५९ कोटी मतदार आहेत. ज्यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ४.५९ कोटी आणि महिला मतदारांची संख्या ४.६४ कोटी आहे. १८ ते १९ वयोगटातील प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या १९.४८ लाख असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader