Maharashtra BJP 2nd Candidate List For Assembly Election 2024 : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण २२ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश होता. दोन्ही याद्या मिळून भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. आज भाजपाने जाहीर केलेल्या यादीत राम भदाणे यांना धुळे ग्रामीण मधून तर श्याम खोडे यांना वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सत्यजीत देशमुखांना शिराळा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकरांना जत मतदारसंघातून उणेदवारी देण्यात आली आहे. यासह नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघावरून मोठी रस्सीखेच चालू होती, त्यावर भाजपाने तोडगा काढला आहे. पक्षाने देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य या मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आहे.

याआधी भाजपाने ९९ उमेदवार जाहीर केले होते. यामध्ये भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम, अतुल भातखळकर यांना कांदिवली पूर्व, राम कदम यांना घाटकोपर पश्चिम, मीहिर कोटेचा यांना मुलूंड, गणेश नाईक यांना ऐरोली, रविंद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

Maharashtra assembly election 2024 BJP releases third list of 25 candidates
BJP 3rd Candidate List: भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; ३ विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
assembly electio
भाजपकडून विद्यमान आमदारांनाच संधी, आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर
NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार
Congress Candidates List Nana Patole
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, कोल्हापूरचा उमेदवार बदलला! आतापर्यंत ‘इतके’ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!

हे ही वाचा >> मतविभाजनाचा फटका बसलेले पांडव पुन्हा मतेंशी भिडणार

दुसऱ्या यादीतील सर्व २२ उमेदवारांची नावे

क्रमतदारसंघउमेदवाराचं नाव
1धुळे ग्रामीणराम भदाणे
2मलकापूरचैनसुख संचेती
3अकोटप्रकाश भारसाकळे
4अकोला पश्चिमविजय अग्रवाल
5वाशिमश्याम खोडे
6मेळघाडकेवलराम काळे
7गडचिरोलीमिलिंद नरोटे
8राजुरादेवराम भोंगळे
9ब्रह्मपुरीकृष्णलाल सहारे
10वरोराकरण संजय देवतळे
11नाशिक मध्यदेवयानी फरांदे
12विक्रमगडहरिश्चंद्र भोये
13उल्हासनगरकुमार ऐलानी
14पेणरावींद्र पाटील
15खडकवासलाभीमराव तपकीर
16पुणे छावणीसुनील कांबळे
17कसबा पेठहेमंत रासणे
18लातूर ग्रामीणरमेश कराड</td>
19सोलापूर शहर मध्यदेवेंद्र कोठे
20पंढरपूरसमाधान औताडे
21शिराळासत्यजीत देशमुख
22जतगोपीचंद पडळकर

हे ही वाचा >> परतूरमध्ये काँग्रेसला धक्का; मतदार संघ शिवसेनेकडे

भाजपा उमेदवारांची पहिली यादी (सर्व ९९ नेत्यांची नावं)

मतदारसंघाचे नावउमेदवार
१) नागपूर दक्षिण पश्‍चिमदेवेंद्र फडणवीस
२) कामठीचंद्ररशेखर बावनकुळे
३) शहादा (आजजा)– राजेश पाडवी
४) नंदुरबार (अजजा)विजयकुमार गावीत
५) धुळे शहरअनुप अग्रवाल
६) शिंदखेडाजयकुमार रावल
७) शिरपूर (अजजा)काशिराम पावरा
८) रावेरअमोल जावळे
९) भुसावळ (अजा)संजय सावकारे
१०) जळगांव शहर– सुरेश भोळे
११) चाळीसगावमंगेश चव्हाण
१२) जामनेरगिरीश महाजन
१३) चिखलीश्वेता महाले
१४) खामगांवआकाश फुंडकर
१५) जळगांव (जामोद)डॉ. संजय कुटे
16) अकोला पूर्वरणधीर सावरकर
१७) धामणगांव रेल्वेप्रताप अडसद
१८) अचलपूरप्रवीण तायडे
१९) देवळीराजेश बकाने
२०) हिंगणघाटसमीर कुणावार
२१) वर्धाडॉ. पंकज भोयर
२२) हिंगणासमीर मेघे
२३) नागपूर-दक्षिणमोहन मते
२४) नागपूर-पूर्वकृष्णा खोपडे
२५) तिरोडाविजय रहांगडाले
२६) गोंदियाविनोद अग्रवाल
२७) आमगाव (अजजा)संजय पुराम
२८) आरमोरी (अजजा)कृष्णा गजबे
२९) बल्लारपूरसुधीर मुनगंटीवार
३०) चिमूरबंटी भांगडिया
३१) वणीसंजीवरेड्डी बोडकुरवार
३२) राळेगांवअशोक उइके
३३) यवतमाळमदन येरावार
३४) किनवटभीमराव केराम
३५) भोकरश्रीजया चव्हाण
३६) नायगांवराजेश पवार
३७) मुखेडतुषार राठोड
३८) हिंगोलीतानाजी मुटकुळे
३९) जिंतूरमेघना बोर्डीकर
४०) परतूरबबनराव लोणीकर
४१) बदनापूर (अजा)नारायण कुचे
४२) भोकरदनसंतोष दानवे
४३) फुलंब्रीअनुराधा चव्हाण
४४) औरंगाबाद पूर्वअतुल सावे
४५) गंगापूरप्रशांत बंब
४६) बागलान (अजजा)दिलीप बोरसे
४७) चंदवडडॉ. राहुल अहेर
४८) नाशिक पूर्वअॅड. राहुल ढिकाले
४९) नाशिक पश्चिमसीमा हिरे
५०) नालासोपाराराजन नाईक
५१) भिवंडी पश्चिममहेश चौघुले
५२) मुरबाडकिसन कथोरे
५३) कल्याण पूर्वसुलभा गायकवाड
५४) डोंबिवलीरवींद्र चव्हाण
५५) ठाणेसंजय केळकर
५६) ऐरोलीगणेश नाईक
५७) बेलापूरमंदा म्हात्रे
५८) दहिसरमनिषा चौधरी
५९) मुलुंडमिहिर कोटेचा
६०) कांदिवली पूर्वअतुल भातखळकर
६१) चारकोपयोगेश सागर
६२) मलाड पश्चिमविनोद शेलार
६३) गोरेगावविद्या ठाकूर
६४) अंधेरी पश्चिमअमित साटम
६५) विले पार्लेपराग अळवणी
६६) घाटकोपर पश्चिमराम कदम
६७) वांद्रे पश्चिमअॅड. आशिष शेलार
६८) सायन कोळीवाडाआर. तमिल सेल्वन
६९) वडाळाकालिदास कोळंबकर
७०) मलबार हिलमंगलप्रभात लोढा
७१) कोलाबाअ‍ॅड. राहुल नार्वेकर
७२) पनवेलप्रशांत ठाकूर
७३) उरणमहेश बाल्दी
७४) दौंडअ‍ॅड. राहुल कुल
७५) चिंचवडशंकर जगताप
७६) भोसरीमहेश लांगडे
७७) शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे
७८) कोथरूडचंद्रकांत पाटील
७९) पर्वतीमाधुरी मिसाळ
८०) शिर्डीराधाकृष्ण विखे पाटील
८१) शेवगांवमोनिका राजळे
८२) राहुरीशिवाजीराव कार्डिले
८३) श्रीगोंदाप्रतिभा पाचपुते
८४) कर्जत जामखेडराम शिंदे
८५) केज (अजा)नमिता मुंदडा
८६) निलंगासंभाजी पाटील निलंगेकर
८७) औसाअभिमन्यू पवार
८८) तुळजापूरराणा जगजीतसिंह पाटील
८९) सोलापूर शहर उत्तरविजयकुमार देशमुख
९०) अक्कलकोटसचिन कल्याणशेट्टी
९१) सोलापूर दक्षिणसुभाष देशमुख
९२) माणजयकुमार गोरे
९३) कराड दक्षिणअतुल भोसले
९४) साताराशिवेंद्रराजे भोसले
९५) कणकवलीनितेश राणे
९६) कोल्हापूर दक्षिणअमल महाडिक
९७) इचलकरंजीराहुल आवाडे
९८) मिरजसुरेश खाडे
९९) सांगलीसुधीर गाडगीळ

Story img Loader