Maharashtra Election 2024 केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राचा दौरा केला. यानंतर निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. आगामी निवडणुकाबाबत काय तयारी असणार? हे तुम्हाला सांगतो आहे. आमचा महाराष्ट्र आमचं मतदान हा आमचा नारा आहे. लोकशाहीच्या उत्सवात ( Maharashtra Election 2024 ) लोक आपलं योगदान देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपले मत, आपला हक्क ही आपली जबाबदारी आहे. असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.

राजकीय पक्षांनी तारखेबाबत काय विनंती केली?

आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. स्थानिक पक्ष, राष्ट्रीय पक्ष यांच्याशी भेटीगाठी घेतल्या. पोलीस महासंचालक, आयुक्त तसंच इतरांचीही भेट घेतली. आम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत ते निर्देश दिले. आम्ही बसपा, आप, काँग्रेस, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी, शिवसेना उबाठा, भाजपा अशा सगळ्या पक्षांची भेट घेतली. या पक्षांनी आम्हाला दिवाळीचा मुद्दा सांगितला. तो महोत्सव लक्षात घेऊन निवडणूक ( Maharashtra Election 2024 ) तारीख जाहीर करा अशी विनंती त्यांनी केली. निवडणुकीची तारीख ही सुट्ट्या लक्षात घेऊन ठरवा अशीही विनंती आम्हाला कऱण्यात आली.

What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा…
guhagar assembly constituency marathi news
Guhagar Assembly Constituency: भास्कर जाधवांना महायुतीकडून कोण आव्हान देणार?
Sarpanch Upasarpanch Salary
Sarpanch Salary Hike : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; राज्य सरकारचे २४ मोठे निर्णय
Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing Updates in Marathi
Mumbai High Court on Akshay Shinde Encounter Case : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Raj Thackeray
Raj Thackeray : लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरेंचं भाष्य, “महिलांना अशाप्रकारे पैसे देणं…”

इतरही विनंत्या आम्हाला राजकीय पक्षांनी केल्या-राजीव कुमार

लोकांना मतं देताना कुठलीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्या. जे मतदार फोन घेऊन येतात त्यांना तो सोडून जाताना आणि परत नेताना अडचणी येतात. त्याची व्यवस्था करावी अशीही विनंती करण्यात आली. पैशांचा गैरवापर, मसल पॉवर रोखण्याचीही विनंती केली. वृद्ध लोकांच्या येण्याची-जाण्याची व्यवस्था करावी अशीही विनंती करण्यात आली. पोलिंग एजंट हा स्थानिक असावा अशीही विनंती करण्यात आली. असंही राजीव कुमार यांनी सांगितलं. फेक न्यूजचा प्रचार आणि प्रसार थांबवावा अशीही विनंती आम्हाला सर्व पक्षांनी केली.

२६ नोव्हेंबरच्या आधी पार पडणार निवडणूक

महाराष्ट्र विधानसभेत ( Maharashtra Election 2024 ) एकूण २८८ मतदारसंघ आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची ( Maharashtra Election 2024 ) मुदत २६ नोव्हेंबरला संपते आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक त्याआधीच होईल. महाराष्ट्रात ९.५९ कोटी मतदार आहेत. त्यात पुरुष ४.५९ कोटी मतदार आहेत. तर महिला ४.६४ कोटी आहेत. आम्ही तृतीय पंथीय, वृद्ध मतदार, दिव्यांग यांची विशेष व्यवस्था करणार आहोत. वृद्ध मतदारांना मतदान करण्यासाठी आम्ही मत देण्याची विनंती करतो. त्यांना केंद्रात जाणं शक्य नसेल तर घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाईल. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची संख्याही महाराष्ट्रात चांगली आहे. १९.४८ लाख मतदार हे नवमतदार आहेत. हे तेच मतदार आहेत जे लोकशाहीला पुढे घेऊन जातील असंही राजीव कुमार म्हणाले.