Baramati Election Result Updates Ajit Pawar vs Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी (शरद पवार)चे उमेदवार युगेंद्र पवार यांच्याविरोधात आघाडी घेतली आहे. अजित पवार महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक बारामती मतदारसंघातून लढवत आहेत आणि पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्यात आपल्या पुतण्याविरुद्ध विजय मिळवून आठव्यांदा विजयी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मतमोजणीतील अजित पवारांनी घेतलेली आघाडी पाहता, आता बारामतीत त्यांच्या समर्थकांनी निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांनी बारामतीत विजयी जल्लोष साजरा केला आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“एकच वादा अजित दादा” बारामतील विजायाच्या आधीच उधळला गुलाल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व बारामती विधानसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांच्या समर्थकांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला आहे. ‘बारामतीचा एकच दादा अजितदादा अजितदादा’, ‘एकच वादा अजितदादा’, ‘अजितदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा देत त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन जोरदार जल्लोष केला. त्यामुळे बारामतीत निकालाआधीच अजित पवारांच्या विजयाचा उत्सव गुलाल उधळून आणि घोषणाबाजी करीत साजरा केला जात आहे.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अजित पवार १५,३८२ मतांनी आघाडीवर आहेत; तर महायुतीने राज्यात १४५ जागांचा बहुमताचा आकडा पार केला आहे.
#WATCH | Baramati, Maharashtra: Supporters of Maharashtra Deputy CM & NCP Candidate from Baramati Assembly Ajit Pawar burst crackers as Ajit Pawar is leading with 15,382 votes ss per the official EC trends.
— ANI (@ANI) November 23, 2024
Mahayuti has crossed the majority mark of 145 seats in the state. (BJP… pic.twitter.com/sPTHWCva8p
अजित पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. यामुळे बारामतीत ( Baramati ) पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशी लढत दिसणार आहे.
अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर एकदा खासदार, आतापर्यंत सातवेळा आमदार आणि तब्बल पाचवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. आता महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामधील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अजित पवारांचं नाव प्रामुख्याने येतं. खरं तर खासदार, आमदार, मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अशी अनेक महत्वाची पदे अजित पवारांनी भूषवले आहेत. मात्र, तरीही २०२४ ची विधानसभा निवडणूक अजित पवारांसाठी महत्वाची मानली जाते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर त्यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली गेली.
बारामती विधानसभा मतदारसंघात (Baramati Assembly Election 2024) अजित पवार सध्या विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे महायुतीच्या फॉर्मुल्यानुसार ती जागा अजित पवारांकडेच राहिली . त्यामुळे महायुतीकडून अजित पवार यांनी निवडणूक लढवली. दुसरीकडे महाविकास आघाडीतही बारामतीची जागा ही शरद पवार गटाकडे राहिली. त्यामुळे अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी सख्या काका-पुतण्याची लढाई अतिशय अटीतटीची पाहायला मिळाली.