Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. विधानसभा निवडणुकीचं मतदान संध्याकाळी सहा वाजता संपलं आहे. रात्री ९ च्या दरम्यान आलेल्या टक्केवारीनुसार राज्यात ५९ टक्के मतदान झालं आहे. याबाबतची संपूर्ण टक्केवारी गुरुवारी सकाळी समोर येईल. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होता. १० पैकी सहा एक्झिट पोल्सनी ( Maharashtra Exit Poll 2024 ) महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. या निवडणुकीत आणखी एक फॅक्टर महत्त्वाचा ठरला तो म्हणजे राज ठाकरेंचा. राज ठाकरे किंगमेकर ठरतील का? कुणी काय अंदाज वर्तवला? जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महाराष्ट्रातली निवडणूक वेगळी आणि चर्चेतली

महाराष्ट्रात पार पडलेली निवडणूक वेगळी ठरली आहे. कारण यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना आहे. इतके दिवस जे चार प्रमुख पक्ष होते त्यातल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले आहेत. आता एक्झिट पोल्सच्या ( Maharashtra Exit Poll 2024 ) अंदाजानुसार महायुतीची सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नेमकं काय घडतं ते २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. २०१९ ला महायुती विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असा सामना झाला होता. मात्र निकालानंतर सगळंच चित्र बदललं होतं. त्यावेळी निकालाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी सगळे पर्याय खुले आहेत सांगितलं. त्यानंतर पहाटेचा शपथविधी, महाविकास आघाडीचा प्रयोग, २०२२ चं एकनाथ शिंदेंचं बंड, २०२३ चं अजित पवारांनी महायुतीत येणं या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राने पाहिल्या आहेतच. लोकसभेला या सगळ्या प्रयोगांचा भाजपाला फटकाही बसला होता. यावेळी राज ठाकरेंनी भाजपा आणि महायुतीलाच साथ दिली आहे. राज ठाकरे फॅक्टर चालणार का? काय अंदाज ( Maharashtra Exit Poll 2024 ) आहेत आपण जाणून घेऊ.

हे पण वाचा- Maharashtra Exit Poll 2024 : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे की अजित पवार? मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती कुणाला? काय सांगतो ‘हा’ एक्झिट पोल?

राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा

निवडणुकीत राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा देत १५० हून अधिक जागा लढवल्या. तसंच ते संपूर्ण ताकदीने प्रचारात उतरलेले पाहण्यास मिळाले. त्यांनी त्यांच्या सभांमधून सातत्याने उद्धव ठाकरे हे कसे महायुतीपासून मुख्यमंत्रीपदासाठी वेगळे झाले हे सांगितलं तसंच शरद पवारांनी जातीयवाद कसा वाढवला याचीही उदाहरणं दिली. आता हा सगळा करीश्मा चालणार का? हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.

राज ठाकरेंना कुठल्या एक्झिट पोलने किती जागा दिल्या?

सगळ्याच प्रमुख एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार राज ठाकरेंना फार यश मिळणार नाही अशीच शक्यता आहे. दैनिक भास्करच्या पोलनुसार ( Maharashtra Exit Poll 2024 ) मनसेला २ ते ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. इलेक्ट्रोल एजच्या पोलनुसार मनसे, वंचित, एमआयएम आणि अपक्ष मिळून २० जागांचा अंदाज आहे. तर चाणक्यच्या पोलनुसार ( Maharashtra Exit Poll 2024 ) मनसे आणि वंचितच्या उमेदवारांना ६ ते ८ जागा मिळतील असा अंदाज आहे. राज ठाकरेंनी एक घोषणा एका मुलाखतीत केली होती की मनसेच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन होईल. मात्र एक्झिट पोल्सच्या अंदाजात तरी तसं होताना दिसत नाहीये. आता २३ तारखेला काय होईल याची उत्सुकता कायम आहे. तूर्तास तरी राज ठाकरे किंग मेकर होणार नाहीत अशीच शक्यता या एक्झिट पोल्सनी ( Maharashtra Exit Poll 2024 ) वर्तवली आहे.