Maharashtra Elections 2024 Exit Poll Result Date Time : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला (बुधवार) पार पडणार आहे. ही निवडणूक आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. कारण यावेळी सहा प्रमुख पक्ष मैदानात आहेत. तसंच हा सामना थेट महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा आहे. या निवडणुकीत काय होणार? मतदान किती टक्के होणार? जनता कुणाला झुकतं माप देणार? या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं २३ नोव्हेंबरला मिळणार आहेत. मात्र त्याआधीचा एक महत्त्वाचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? याचा अंदाज म्हणजे एक्झिट पोल ( Maharashtra Exit Poll ). एक्झिट पोल ( Maharashtra Exit Poll )कधी येणार? तारीख आणि वेळ काय? हे आपण जाणून घेणार आहेत. तसंच मतदान किती वाजल्यापासून सुरु होणार हे पण जाणून घेऊ.

मतदान कधी होणार?

महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला सकाळी सकाळी ७ वाजता मतदान सुरु होणार आहे तर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान केलं जाईल. या निवडणुकीकडे सगळ्या राज्याचे डोळे लागले आहेत. तसंच एक्झिट पोल काय येतो? त्याचा अंदाज नेमका काय असेल? कुणाच्या बाजूने असेल हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. आम्ही तुम्हाला या बातमीतून सांगत आहोत एक्झिट पोल ( Maharashtra Exit Poll ) कुठे कसा आणि कधी बघाल?

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Collective transportation of voters to voting center in vehicles will be crime
सावधान! केंद्रावर मतदारांची ने-आण करणे गुन्हा, शेवटच्या ४८ तासांतही प्रचार, पण…
Supriya Sule On Mahayuti
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “भाजपमध्ये फिफ्टी-फिफ्टी मतभेद, फडणवीस एक सांगतात तर…”, सुप्रिया सुळेंची खोचक टिप्पणी!
maharashtra vidhan sabha election 2024
विधानसभा निवडणुकीत चंद्रपुरात भाजपला गटबाजीचे ग्रहण
Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024 : राज्यातल्या निवडणुका कोणत्या मुद्यांभोवती फिरत आहेत?
maharashtra assembly election 2024 polarization of buddhist vs hindu dalit votes in umred nagpur constituency
उमरेडमध्ये बौद्ध विरुद्ध हिंदू दलित मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या पथ्यावर ?
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!

एक्झिट पोलची तारीख काय असेल?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीचा एक्झिट पोल २० नोव्हेंबर २०२४ या दिवशी येईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार एक्झिट पोल्स हे निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतरच जाहीर केले जातात. त्याच्या आधी कुठल्याही प्रकारे निकालाचे अंदाज किंवा एक्झिट पोल देता येत नाहीत. त्यामुळे मतदान संपल्यानंतर म्हणजेच २० नोव्हेंबरला संध्याकाळी ६ नंतर एक्झिट पोल्स जाहीर होतील. विविध न्यूज चॅनल्स आणि एजन्सी या एक्झिट पोल्स जाहीर करत असतात. विशिष्ट प्रकारे सर्व्हे करुन हे एक्झिट पोल्स जाहीर केले जात असतात. आता या पोल्समध्ये काय अंदाज समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. २० नोव्हेंबरच्या संध्याकाळी ६ नंतर हे पोल्स ( Maharashtra Exit Poll ) येण्यास सुरुवात होईल.

कुठले एक्झिट पोल्स जाहीर होतील?

मतदान संपलं की महत्त्वाचे चॅनल्स उदाहरणार्थ इंडिया टुडे, एनडीटीव्ही, रिपब्लिक टीव्ही, टाइम्स नाऊ यांचे एक्झिट पोल्स येण्यास सुरुवात होईल. तसंच सी व्होटर्स, पिपल्स पल्स, अॅक्सिस इंडिया या एजन्सींचेही पोल्स येतील.

एक्झिट पोल्स म्हणजे नेमकं काय?

एक्झिट पोल्स हे विशिष्ट प्रकारच्या सर्व्हेंवर अवलंबून असतात. कुठल्या मतदारसंघात कसा कल आहे? लोकांना काय वाटतं? याबाबतचा अंदाज घेऊन हे पोल्स जाहीर केले जातात. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला निकाल आहे. या दरम्यान २० नोव्हेंबरला हे एक्झिट पोल्स जाहीर होतील. यासाठीचा सर्व्हे थेट मुलाखती घेऊन, टेलिफोनवरुन बोलून किंवा ऑनलाइन प्रश्नावलीला मिळालेल्या उत्तरांमधून काढलेल्या निष्कर्षांवर आधारित असतो.

निवडणुकीचा निकाल कधी लागणार आहे?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. निवडणूक झाल्यानंतर जोपर्यंत मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक निकाल प्रक्रिया पार पडली असं म्हणता येत नाही. २३ नोव्हेंबरला नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल यात शंकाच नाही.