Maharashtra Politics Live Updates महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिल्लीत अमित शाह यांच्यासह महायुतीचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचं समजतं आहे. मात्र अद्याप याबाबत कुणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं. मुंबईत भाजपाची बैठक होईल या बैठकीनंतर इतर चर्चा होऊन निर्णय होईल असं सांगितलं. दुसरीकडे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. जे मिळेल ते त्यांना पदरात पाडून घ्यावं लागणार आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला. यासह सगळ्या राजकीय घडामोडींवर आपली नजर आजच्या ब्लॉगमधून असणार आहे.
Maharashtra Breaking News Live Updates मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित? आज मुंबईत बैठका, राजकीय घडामोडींना वेग
नवी मुंबई : महाग घरे विक्रीविना, घरांच्या किमती कमी करण्याचा सिडकोचा प्रस्ताव
खारघर, सीवूडसारख्या उपनगरात सिडकोने उभारलेली आणि गेल्या दहा वर्षांपासून विक्रिविना पडून असलेली घरे विकली जावीत यासाठी सिडकोने घरांचे दर स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर, डॉ. अतुल भोसले यांच्या मंत्रिपदासाठी अभिषेक
कराड : भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांची नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागावी आणि ‘कराड दक्षिण’चे आमदार डॉ. अतुल भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळावे यासाठी कराडमधील प्रसिध्द श्री रत्नेश्वरास भाजप कार्यकर्त्यांनी अभिषेक घातला. कराडच्या कृष्णाबाई घाटावरील श्री रत्नेश्वर मंदिरातील या अभिषेक विधीस भाजपचे कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, रणजित शिंदे, अजित शिंदे, संजय शहा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलाही उपस्थित होत्या.
नवी मुंबई : पुरेशी रहदारी नसतानाही नवी मुंबईत काही आडवाटेला असलेल्या चौकांच्या परिसरातील रस्त्यांची काँक्रीटीकरणाची कामे हाती घेत वादात सापडलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने पावसाळा संपला तरी बऱ्याचशा चौकांमधील कामे अर्धवट अवस्थेत ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आज हंगामातील सर्वात थंड दिवस बदलापुरात सर्वात कमी ११.९ अंश सेल्सिअसची नोंद
बदलापूर : शुक्रवार हा यंदाच्या हिवाळ्यातील ठाणे जिल्ह्यातील सर्वात थंड दिवस ठरला आहे. शुक्रवारी बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. सकाळच्या सुमारास बदलापुरात ११.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
सावधान ! सरकारी पाहुणे येत आहेत, सरबराईच्या तयारीला लागा …
नागपूर : राज्यात महायुतला प्रचंड बहुमत मिळाल्यावरही त्यांना मागील चार दिवसांपासून मुख्यमंत्री ठरवता आला नाही. दिल्ली-मुंबईत बैठकांवर बैठका सुरू आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाशी आहे. या सर्व धावपळीतही नागपुरात अधिवेशनाच्या तयारीने गती घेतली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांचे बंगले यांची देखभाल दुरुस्ती सुरू झाली आहे. ज्या भागात अधिवेशन होणार आहे त्या सिव्हील लाईन्सकडे जाणारे सर्व रस्ते गुळगुळीत केले जात आहे.
तलाक, तलाक, तलाक… म्हणत पत्नीला घराबाहेर काढले महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ठाणे : भिवंडी येथे तिहेरी तलाकचे प्रकरण उघडकीस आले आहे. एका व्यक्तीने तीन वेळा ‘तलाक’ म्हणत त्याच्या पत्नीला घराबाहेर काढले. या घटनेनंतर महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीच्या आधारे शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वाचा...
सांगली जिल्हा बँकेच्या संचालकांपैकी केवळ एकांना विधानसभेत विजय अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य चार संचालक पराभूत
सांगली : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल केलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच संचालकांपैकी एक संचालक विजयी झाले असून अध्यक्ष, उपाध्यक्षांसह अन्य चार संचालक पराभूत झाले. तर संंचालक अमोल बाबर यांचे बंधू सुहास बाबर हे विजयी झाले. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्यांपैकी बहुसंख्य मातब्बरांचे जिल्हा बँकेशी नाते असल्याचे दिसून येते.
एकनाथ शिंदे टीमच्या 'धोनी'ला पराभवानंतरही मोठे सत्तापद मिळणार, शहाजीबापू पाटील यांचा दावा
सोलापूर :'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटिल..समदं ओक्केमंदी ' या संवादामुळे गाजलेले आणि नुकत्याच झालेल्या सांगोला विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपण पराभूत झालो असलो तरी येत्या दोन महिन्यात महायुती सरकारमध्ये आपणास मोठे पद मिळणार असल्याचा दावा केला आहे.
खळबळजनक! मोठ्या भावाच्या बायकोशी जुळले सूत, कुऱ्हाडीने…
नागपूर : मोठ्या भावाचे लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच दीर आणि वहिनीचे सूत जुळले.तीसुद्धा पतीपेक्षा दिरालाच जवळ करायला लागली. पत्नीशी जवळीक साधताना लहान भावाला बघताच घरात वादाचा भडका उडाला. या वादातून लहान भावाने मित्राच्या मदतीने मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिल्लीत अमित शाह यांच्यासह महायुतीचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचं समजतं आहे.