Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates : अठराव्या लोकसभेचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपाने ४०० पार असा नारा दिल्यानंतर महाराष्ट्रातून ४५ हून अधिक जागा मिळतील, असे सांगतिले जात होते. मात्र प्रत्यक्षात महायुतीची चांगलीच पिछेहाट झाल्याचे निकालावरून दिसत आहे. तर महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगले यश मिळवले आहे. भाजपाचा गड असलेल्या विदर्भात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. याठिकाणी भाजपाच्या केवळ दोन खासदारांचा विजय झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राच्या विभागीय रचनेनुसार त्या त्या ठिकाणी कोण जिंकले यावर एक नजर टाकू.

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : नितीश कुमार, तेजस्वी यादव एकाच विमानातून दिल्लीकडे रवाना; एनडीएचं काय होणार?

मुंबई – ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघ

मुंबई उत्तर

पियुष गोयल (भाजप) – विजयी – मतदान 678451
भूषण पाटील (काँग्रेस) – पराभव – मतदान 321455

मुंबई उत्तर पश्चिम

रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान 452644
अमोल किर्तीकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभव – मतदान 452596

मुंबई उत्तर पूर्व

संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 450937
मिहीर कोटेचा (भाजप) – पराभूत – मतदान 421076

मुंबई उत्तर मध्य

वर्षा गायकवाड (काँग्रेस) – विजयी – मतदान 445545
उज्ज्वल निकम (भाजप) – पराभूत – मतदान 429031

मुंबई दक्षिण मध्य

अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 395138
राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – 341754

मुंबई दक्षिण

अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 395655
यामिनी जाधव (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान 342982

Maharashtra Lok Sabha Election Result : उबाठाचा मुंबईत भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय; मनसेच्या नेत्याची टीका

ठाणे जिल्हा

पालघर

हेमंत सावरा (भाजप) – विजयी – मतदान 601244
भारती कामडी (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान 417938

भिवंडी

सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार) – विजयी – मतदान 499464
कपिल पाटील (भाजप) – पराभूत – मतदान 433343

कल्याण

श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान 589636
वैशाली दरेकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान 380492

ठाणे

नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान 734231
राजन विचारे (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान 517220

उत्तर महाराष्ट्र

नंदूरबार

गोवाल पाडवी (काँग्रेस) – विजयी – मतदान 745998
हिना गावित (भाजप) – पराभूत – मतदान 586878 

धुळे

शोभा बच्छाव (काँग्रेस) – विजयी – मतदान 583866 
सुभाष भामरे (भाजप) – पराभूत – मतदान 580035

जळगाव

स्मिता वाघ (भाजप) – विजयी – मतदान – 674428
करण पवार (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान 422834

दिंडोरी

भास्कर भगरे (NCP शरद पवार) – विजयी – मतदान 577339
भारती पवार (भाजप) – पराभूत – मतदान 464140

नाशिक

राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 616729
हेमंत गोडसे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान 454728

अहमदनगर

निलेश लंके (NCP शरद पवार) – विजयी – मतदान 624797
सुजय विखे (भाजप) – पराभूत – मतदान 595868

शिर्डी

भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 476900
सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान 426371

रावेर

रक्षा खडसे (भाजप) – विजयी – मतदान 630879
श्रीराम पाटील (NCP शरद पवार) – पराभूत – मतदान 358696

विदर्भ

बुलढाणा

प्रताप जाधव (शिवसेना शिंदे गट) – विजयी – 349867
नरेंद्र खेडेकर (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान 320388

अकोला

अनुप धोत्रे (भाजप) – विजयी – मतदान 457030
अभय पाटील (काँग्रेस) – पराभूत – मतदान 416404
प्रकाश आंबेडकर (वंचित) – पराभूत – मतदान 276747

अमरावती

बळवंत वानखेडे (काँग्रेस) – विजयी – मतदान 526271
नवनीत राणा (भाजप) – पराभूत – मतदान 506540 
दिनेश बूब (प्रहार) – तिसऱ्या स्थानी – मतदान 85300

वर्धा

अमर काळे (NCP शरद पवार) – विजयी – मतदान 533106
रामदास तडस (भाजप) – पराभूत – मतदान 451458

रामटेक

श्यामकुमार बर्वे (काँग्रेस) – विजयी – मतदान 613025 
राजू पारवे (शिवसेना शिंदे गट) – पराभूत 536257

नागपूर

नितीन गडकरी (भाजप) – विजयी – मतदान 655027
विकास ठाकरे (काँग्रेस) – पराभूत – मतदान 517424

भंडारा-गोंदिया

प्रशांत पडोळे (काँग्रेस) – विजयी – मतदान 536257
सुनील मेंढे (भाजप) – पराभूत – मतदान 550033

गडचिरोली चिमूर

नामदेव किरसान (काँग्रेस) – विजयी – मतदान 617792
अशोक नेते (भाजप) – पराभूत – मतदान 476096

चंद्रपूर

प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) – विजयी – मतदान 718410
सुधीर मुनगंटीवार (भाजप) – पराभूत – मतदान – 458004

यवतमाळ वाशिम

संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 594807
राजश्री पाटील (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान 500334

मराठवाडा

हिंगोली

नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 492535 
बाबूराव कदम (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान 383933

नांदेड

वसंतराव चव्हाण (काँग्रेस) – विजयी – मतदान – 528894
प्रतापराव चिखलीकर (भाजप) – पराभूत – मतदान – 469452

परभणी

संजय (बंडू) जाधव (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 601343
महादेव जानकर (रासप) – पराभूत – मतदान 467282

जालना

कल्याण काळे (काँग्रेस) – विजयी – मतदान 607897
रावसाहेब दानवे (भाजप) – पराभूत – मतदान 497939

छत्रपती संभाजीनगर

संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान 476130
इम्तियाज जलील (MIM) – पराभूत – मतदान 341480
चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट) – तिसऱ्या स्थानी – मतदान 293450 

धाराशिव

ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट) – विजयी – मतदान 748752
अर्चना पाटील (NCP अजित पवार) – पराभूत – मतदान 418906

लातूर

शिवाजी काळगे (काँग्रेस) – विजयी – मतदान 609021
सुधाकर श्रृंगारे (भाजप) – पराभूत – मतदान 547140 

बीड

बजरंग सोनावणे (NCP शरद पवार) – विजयी – 683950
पंकजा मुंडे (भाजप) – पिछाडीवर – पराभूत – 677397

कोकण

रायगड

सुनील तटकरे (NCP अजित पवार) – विजयी – मतदान 508352
अनंत गीते (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान 425568

मावळ

श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान 692832
संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान 596217

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

नारायण राणे (भाजप) – विजयी – मतदान 448514
विनायक राऊत (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान – 400656

पुणे

मुरलीधर मोहोळ (भाजप) – विजयी – मतदान 584728 
रवींद्र धंगेकर (काँग्रेस) – पराभूत – मतदान 461690
वसंत मोरे (वंचित) – तिसऱ्या स्थानी – मतदान 32012

बारामती

सुप्रिया सुळे (NCP शरद पवार) – विजयी – 732312 
सुनेत्रा पवार (NCP अजित पवार) – पराभूत – 573979

शिरूर

अमोल कोल्हे – (NCP शरद पवार) – विजयी – मतदान 698692
शिवाजीराव आढळराव (NCP अजित पवार) – पराभूत – मतदान 557741

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर

प्रणिती शिंदे (काँग्रेस) – विजयी – मतदान 620225
राम सातपुते (भाजप) – पराभूत – मतदान 546028

माढा

धैर्यशील मोहिते-पाटील (NCP शरद पवार) – विजयी – मतदान 622213
रणजीतसिंह निंबाळकर (भाजप) – पराभूत – मतदान 501376

सांगली

विशाल पाटील (अपक्ष) – विजयी – 571666
संजयकाका पाटील (भाजप) – पराभूत – 471613
चंद्रहार पाटील (शिवसेना ठाकरे गट) – तिसऱ्या स्थानी 60860

सातारा

उदयनराजे भोसले (भाजप) – विजयी – मतदान 571134
शशिकांत शिंदे (NCP शरद पवार) – पराभूत – मतदान 538363

कोल्हापूर

शाहू महाराज छत्रपती (काँग्रेस) – विजयी – मतदान 754522
संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट) – पराभूत – मतदान 599558

हातकणंगले

धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट) – विजयी – मतदान 520190
सत्यजीत पाटील (शिवसेना ठाकरे गट) – पराभूत – मतदान 506764
राजू शेट्टी (शेतकरी स्वाभिमानी पक्ष) – तिसऱ्या स्थानी – मतदान 179850

कोणत्या पक्षाने किती जागा जिंकल्या?

महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसने १३, शिवसेना ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ८ जागांवर मिळविला आहे. महाविकास आघाडीने जिंकलेल्या जागांची बेरीज ३० होते, तर सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसा पाठिंबा दिल्यास मविआची संख्या ३१ होऊ शकते.

दुसरीकडे महायुतीच्या जागा घटल्या आहेत. भाजपाला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेना शिंदे गट ७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळविता आला. महायुतीची बेरीज १७ होते.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra lok sabha election result candidates won in 48 constituencies how many votes for whom kvg
Show comments