Maharashtra Lok Sabha Election Result Vote Counting Live Updates : देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून आज ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली आहे.दरम्यान, या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असला तरी त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले होते. या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आलं होतं. मात्र, असे असले तरी महाराष्ट्रातील जनेताच कौल ‘एनडीए’ला की ‘इंडिया’ला याचं उत्तर प्रत्यक्ष निकालानंतरच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या ४८ जागांचे निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचता येणार आहे.
Maharashtra Lok Sabha Election Result, 0४ June 2024 : लोकसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? जाणून घ्या…
Solapur Lok Sabha Election Result Live Updates : काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे विजयी, भाजपाच्या राम सातपुते यांचा केला पराभव,
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election Result Live Updates : भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांचा विजय, विनायक राऊत पराभूत
Amravati Lok Sabha Election Result Live Updates : अमरावतीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव..
Sangli Lok Sabha Election Result Live Updates : सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी, अधिकृत घोषणा बाकी
Aurangabad Lok Sabha Election Result Live Updates : शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे ७६ हजार ४७२ मतांनी आघाडीवर,
Amravati Lok Sabha Election Result Live Updates : अमरावती काँग्रेसचे बळवंत वानखडे १० हजार १०३ मतांनी आघाडीवर, नवनीत राणा पिछाडीवर
ठाण्यात नरेश मस्के यांना १ लाखापेक्षा जास्त आघाडी आहे. त्यासाठी ठाण्याच्या जनतेचे मी आभार मानतो. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या ठाण्यात महायुकीचा भगवा विजयाच्या रुपाने डौलाने फडकतो आहे. सर्वाधारण कार्यकर्त्याला आम्ही ठाण्यातून उमेदवारी होती. ठाण्यातील विकासाला जनतेने मतदान केलं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ठाण्यात झालेला विकास आणि केलेलं काम, राज्यसरकारने केलेलं काम, मोदींचं दहा वर्षांचं काम याची पोचपावती या विजयात मतदारांनी दिली आहे. ठाणेकरांनी त्यांची (ठाकरे गटाची) जागा त्यांना दाखवली आहे. ठाणेकरांनी त्यांचा कार्यक्रम केला आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही अभिनंदन करतो. कारण ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. लवकरच एनडीएचं मोदींच्या सरकार बनेल, असेही ते म्हणाले.
मावळ लोकसभा
21 वी फेरी-
श्रीरंग बारणे (महायुती) – 621985
संजोग वाघेरे (महाविकास आघाडी)- 525051
नाशिक लोकसभा मतदारसंघ
राजाभाऊ वाजे -४९६७७४
महायुतीचे हेमंत गोडसे – ३५१७०२
मुंबई-दक्षिण-मध्य लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : अनिल देसाई यांचा ५३ हजार ३८४ मतांनी विजय
भिवंडीतील Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates :राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे ६७ हजार ५५० मतांनी आघाडीवर
Akola Lok Sabha Election Result Live Updates : भाजपाचे अनुप धोत्रे २० हजार २६८ मतांनी आघाडीवर, अभय पाटील पिछाडीवर
Ahmadnagar Lok Sabha Election Result Live Updates : शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके ६८२४ मतांनी आघाडीवर, सुजय विखे पिछाडीवर
संदिपान भुमरे यांना – 260031 मते
इम्तियाज जलील – 216239 मते
चंद्रकांत खैरे – 162010 मते
Buldhana Lok Sabha Election Result Live Updates : २२ व्या फेरी अखेर प्रतापराव जाधव २५ हजार १३७ मतांनी आघाडीवर, आघाडीचे खेडेकर दुसऱ्या स्थानी
बारामतीत सुप्रिया सुळे यांना जवळपास ७० हजारांच्या वर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या विजय निश्चित मानला जातो आहे. सुप्रिय सुळे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झालेली नाही. दरम्यान, वरून आता रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे. बच्चा बडा हो गया! काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झाली आहे. पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही, तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झाली आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे यांचा विजय हा शरद पवार यांच्या विचारांचा, सुप्रिया सुळे यांच्या कष्टाचा, मविआचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे. या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन! अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
Solapur Lok Sabha Election Result Live Updates : १३ व्या फेरीनंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ३६ हजार ७६१ मतांची आघाडीवर
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बरेच कष्ट घेतले. महाराष्ट्रात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देशपातळीवरचं चित्रही आशादायक आहे. आज अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मर्यादित १० जागा लढवल्या पण आम्ही जवळपास ७ जागांवर आघाडीवर आहोत. म्हणजे आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
आजच्या निकालाने देशपातळीवर चित्र आशादायक आहे. यापूर्वी भाजपाला उत्तर प्रदेशात किंवा हिंदी भाषिक प्रदेशात जे यश मिळत होतं, ते खूप जास्त होतं, यंदा त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. त्यामुळे त्यांना यंदा मर्यादित जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीने हिंदी भाषिक प्रदेशात विशेष लक्ष दिलं, त्यामुळे आज उत्तरेकडचा निकाल बदलला आहे, असेही ते म्हणाले.
गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात दहाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या डॉ. नामदेव किरसान यांनी तब्बल ५३२८९ मतांची आघाडी घेतली आहे. यामुळे मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांची चिंता वाढल असून आणखी मतमोजणीच्या १६ फेऱ्या शिल्लक असल्याने भाजपचे अशोक नेते आघाडी घेतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची विजयी घोडदौड सुरू आहे. जवळपास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विरोधी उमेदवाराला त्यांची जागा मावळच्या मतदारांनी दाखवून दिली, असा टोला यावेळी बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना लगावला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे देशात आणि राज्यात चित्र आता स्पष्ट झालं आहे. भाजपाप्रणित एनडीएचा केंद्रात तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असं असलं तरी दावा केलेले बहुमत भाजपाला मिळालेलं नाही. INDIA आघाडीला राज्यासह देशभरात चांगल्या जागा मिळाल्या आहेत. या निकालाबद्दल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे विश्लेषण…
Beed Lok Sabha Election Result Live Updates : बीडमध्ये चुरशीची लढत; भाजपाच्या पंकजा मुंडे २८४८ मतांनी आघाडीवर
औरंगाबाद- लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शिवसेनेचे संदिपान भुमरे २६ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
Wardha Lok Sabha Election Result Live Updates : शरद पवार गटाचे अमर काळे २८ हजार ८४६ मतांनी आघाडीवर, भाजपाचे रामदास तडस पिछाडीवर
रायगड लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : सुनील तटकरे विजयाच्या उंबरठ्यावर, ६५ हजारांची आघाडी
Lok Sabha Election Result Live Updates : जळगाव भाजपाच्या स्मिता वाघ विजयाच्या उंबरठ्यावर
पालघर
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live Updates : नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी यांची निर्णायक आघाडी
संदिपान भुमरे यांना – 145436 मते
इम्तियाज जलील – 128693 मते
चंद्रकांत खैरे – 94658 मते
प्रणिती शिंदे-दोन लाख ७० हजार ६४९
राम सातपुते (भाजप)-दोन लाख ५६ हजार ६८३
एकूण मोजलेली मते
पाच लाख ४४ हजार १५५
महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील लोकसभेच्या ५४३ मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे. त्याचे आज निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताची भविष्यातील दिशा निश्चित करतील. यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडली असून ४८ मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळाली.