Maharashtra Lok Sabha Election Result Vote Counting Live Updates : देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून आज ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली आहे.दरम्यान, या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असला तरी त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले होते. या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आलं होतं. मात्र, असे असले तरी महाराष्ट्रातील जनेताच कौल ‘एनडीए’ला की ‘इंडिया’ला याचं उत्तर प्रत्यक्ष निकालानंतरच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या ४८ जागांचे निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचता येणार आहे.

Live Updates

Maharashtra Lok Sabha Election Result, 0४ June 2024 : लोकसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? जाणून घ्या…

12:29 (IST) 4 Jun 2024
Aurangabad M Lok Sabha Election Result Live Updates : पाचव्या फेरीनंतर संदिपान भुमरे यांना १९४९ मतांची आघाडी.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात

संदिपान भुमरे यांना – 86586 मते

इम्तियाज जलील – 84637 मते

चंद्रकांत खैरे – 58270 मते

12:26 (IST) 4 Jun 2024
मोदींनी ज्यांना लहान भाऊ म्हटले ते महादेव जानकर १८ हजार मतांनी पिछाडीवर

पंतप्रधान मोदींनी परभणीत महादेव जानकर यांच्यासाठी सभा घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी महादेव जानकर हे माझे लहान भाऊ आहेत, असा उल्लेख त्यांनी केला होता. मोदींच्या सभेचा कोणताही फायदा जानकरांना झाला नसल्याची चर्चा आहे. महादेव जानकर हे परभणीमधून १८ हजार २१० मतांनी पिछाडीवर आहेत.

12:25 (IST) 4 Jun 2024
अमरावती लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : चौथ्या फेरीनंतर भाजपाच्या नवनीत राणा आघाडीवर

अमरावती जिल्हा- चौथी फेरी

श्रीमती नवनित राणा ( भारतीय जनता पाटी) : 114428

श्री. बळवंत वानखडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) : 114245

श्री. दिनेश बूब (प्रहार जनशक्ती पार्टी) : 17182

श्री. आनंदराज आंबेडकर (रिपब्लिकन सेना) : 2772

12:23 (IST) 4 Jun 2024
Madha Lok Sabha Election Result Live Updates : सातवी फेरी धैर्यशील मोहिते पाटील २४,४०८ मतांनी आघाडीवर

Madha Lok Sabha Election Result Live Updates : सातवी फेरी धैर्यशील मोहिते पाटील २४,४०८ मतांनी आघाडीव

12:18 (IST) 4 Jun 2024
Shirur Lok Sabha Election Result Live Updates : ११ व्या फेरीनंतर डॉ. अमोल कोल्हे ५३ हजार ९४९ मतांनी आघाडीवर

शिरूर ११ वी फेरी –

डॉ. अमोल कोल्हे – २९९८९३

शिवाजीराव आढळराव पाटील – २४५९४४

12:12 (IST) 4 Jun 2024
maharashtra Lok Sabha Election Result Live Updates : विदर्भातील १० जागे पैकी ७ जागेवर महाविकास आघाडी तर, ३ जागांवर महायुती आघाडीवर

नागपूर – भाजपा

रामटेक – काँग्रेस</p>

भंडारा गोंदिया – भाजपा

गडचिरोली – काँग्रेस

चंद्रपूर – काँग्रेस

बुलढाणा – शिवसेना शिंदे

अकोला – काँग्रेस

अमरावती – काँग्रेस

वर्धा – राष्ट्रवादी शरद पवार</p>

यवतमाळ – शिवसेना उबाठा

12:10 (IST) 4 Jun 2024
जळगाव : ईव्हीएम यंत्रात घोळ; श्रीराम पाटील यांचा आरोप

जळगाव : निवडणूक होऊन प्रदीर्घ काळ उलटूनही मतमोजणी यंत्रांमधील बॅटरी ही ९० टक्के चार्ज असल्याची बाब संशयास्पद असल्याचे नमूद करत रावेर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांनी ईव्हीएम यंत्रावरच आक्षेप घेतल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे रावेरची मतमोजणी थांबविण्यात आली आहे.

श्रीराम पाटील म्हणाले यांनी, मतमोजणी यंत्रातील बॅटरी ही ९९ टक्के कशी असू शकते, दिवसभर यंत्रात मतदान झाले. एवढे असूनही मतदान यंत्रातील फक्त एक टक्का चार्ज कसे कमी होऊ शकते? असे प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे रावेर मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी थांबली आहे.

12:08 (IST) 4 Jun 2024
Nagpur Lok Sabha Election Result Live Updates : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ३५ हजार मतांनी आघाडीवर

Nagpur Lok Sabha Election Result Live Updates : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ३५ हजार मतांनी आघाडीवर

12:00 (IST) 4 Jun 2024
सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंना ३८८४ मतांची आघाडी

सोलापूर

चौथी फेरी

काँग्रेसच्या प्रणिती शिंदे-

एक लाख १२ हजार ३७० (आघाडी-३८८४)

भाजपचे राम सातपुते-

एक लाख ८ हजार ४८६

एकूण मोजलेली मते-

दोन लाख २७ हजार २७१

11:58 (IST) 4 Jun 2024
Thane Lok Sabha Election Result Live Updates : ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के ७०९६३ मतांनी आघाडीवर

ठाणे लोकसभा

नरेश म्हस्के – 207275

राजन विचारे – 140499

म्हस्के आघाडी – 66776

11:57 (IST) 4 Jun 2024
Kolhapur Lok Sabha Election Result Live Updates : कोल्हापूर सहाव्या फेरी अखेर श्रीमंत शाहू महाराज ३८ हजार ३६ मतांनी आघाडीवर

Kolhapur Lok Sabha Election Result Live Updates : कोल्हापूर सहाव्या फेरी अखेर श्रीमंत शाहू महाराज ३८ हजार ३६ मतांनी आघाडीवर

11:51 (IST) 4 Jun 2024
सांगली लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : नवव्या फेरीनंतर विशाल पाटील यांना ३९ हजार ४८० मतांची आघाडी

सांगली लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : नवव्या फेरीनंतर विशाल पाटील यांना ३९ हजार ४८० मतांची आघाडी

11:49 (IST) 4 Jun 2024
Baramati Lok Sabha Election Result Live Updates : सहाव्या फेरीअखेर सुप्रिया सुळे २६ हजार मतांनी आघाडीवर

Baramati Lok Sabha Election Result Live Updates : सहाव्या फेरीअखेर सुप्रिया सुळे २६ हजार मतांनी आघाडीवर

सविस्तर वाचा –

11:47 (IST) 4 Jun 2024
Thane Lok Sabha Election Result Live Updates : ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के ६२२४६ मतांनी आघाडीवर

Thane Lok Sabha Election Result Live Updates : ठाण्यातील शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के ६२२४६ मतांनी आघाडीवर

11:46 (IST) 4 Jun 2024
Jalgaon Lok Sabha Election Result Live Updates : भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ ७१ हजार ४३८ मतांनी आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर जळगाव मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील- पवार यांच्यापेक्षा 71,438 मतांनी आघाडीवर…

जळगाव लोकसभा मतदारसंघ

पाचवी फेरी

स्मिता वाघ- 1,50,076 (महायुती, भाजप)

करण पाटील-पवार- 78,638 (महाविकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट)

11:44 (IST) 4 Jun 2024
धुळे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : डॉ.सुभाष भामरे ११ हजार ७७१ मतांनी

तिसऱ्या फेरीत महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांना 28999 तर महायुतीचे उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांना 40770 मते मिळाली आहेत. या फेरीत 11 हजार 771मतांनी डॉ. भामरे हे आघाडीवर आहेत.

11:42 (IST) 4 Jun 2024
सांगली लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : आठव्या फेरी अखेर विशाल पाटील ३३ हजार ४८६ मतांनी आघाडीवर

सांगली लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : आठव्या फेरी अखेर विशाल पाटील ३३ हजार ४८६ मतांनी आघाडीवर

11:42 (IST) 4 Jun 2024
सातारा लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे १६ हजार ४९२ मतांनी आघाडीवर

सातारा लोकसभा

16492 मतांनी शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर

उदयनराजे 99866

शशिकांत शिंदे 116358

11:40 (IST) 4 Jun 2024
Madha Lok Sabha Election Result Live Updates : मोहिते पाटील १९ हजार ६१९ मतांनी आघाडीवर

माढा – मोहिते पाटील यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी सहाव्या फेरी अखेर कायम ठेवली.

सहाव्या फेरी अखेर मोहिते पाटील १९६१९ मताधिक्यांनी आघाडीवर आहे.

11:37 (IST) 4 Jun 2024
रावेर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे ७४ हजार ९१२ मतांनी आघाडीवर

तिसर्‍या फेरीअखेर रावेर मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यापेक्षा 74,912 मतांनी आघाडीवर…

रावेर मतदारसंघात

रावेर लोकसभा मतदारसंघ

तिसरी फेरी

रक्षा खडसे – 1,71,587 (महायुती, भाजप)

श्रीराम पाटील – 96,675 (महाविकास आघाडी, राष्ट्रवादी शरद पवार गट)

11:36 (IST) 4 Jun 2024
Jalgaon Lok Sabha Election Result Live Updates : भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ ४१ हजार ६१२ मतांनी आघाडीवर…

तिसर्‍या फेरीअखेर जळगाव मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील- पवार यांच्यापेक्षा 41,612 मतांनी आघाडीवर…

जळगाव लोकसभा मतदारसंघ

तिसरी फेरी

स्मिता वाघ- 88,593 (महायुती, भाजप)

करण पाटील- पवार- 46,981 (महाविकास आघाडी, शिवसेना ठाकरे गट)

11:28 (IST) 4 Jun 2024
अहमदनगर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : भाजपाचे सुजय विखे पाटील २८२९ मतांनी आघाडीवर

नगर लोकसभा मतदारसंघ

पहिल्या फेरी अखेर

भाजप सुजय विखे- २७४६६

शरद पवार गट नीलेश लंके- २४६३७

11:27 (IST) 4 Jun 2024
Chandrapur Lok Sabha Election Result Live Updates : काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ५० हजार ७८७ मतांनी आघाडीवर

चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा

प्रतिभा धानोरकर १ लाख १८ हजार ७७४

सुधीर मुनगंटीवार ६७ हजार ९८७

11:26 (IST) 4 Jun 2024
औरंगाबाद- लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना २२८ मतांनी आघाडीवर

लाेकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना २२८ मतांची आघाडी घेतली. भुमरे यांना ५०९४६ तर इम्तियाज जलील यांना ५०७१८ मते मिळाली. चंद्रकांत खैरे यांना ३५ हजार ५०६ मते मिळाली. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ४८५ मते मोजण्यात आली आहेत.

11:25 (IST) 4 Jun 2024
नंदुरबार लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : काँग्रेसचे गोवाल पाडवी चौथ्या फेरीनंतर ६९२१४ मतांनी आघाडीवर

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ चौथ्या फेरी अंती

भाजपा उमेदवार – डॉ हिना गावित -74702

कॉग्रेस उमेदवार – अँड गोवाल पाडवी -143916

11:24 (IST) 4 Jun 2024
Dindori Lok Sabha Election Result Live Updates : महाविकास आघाडीचे भास्कर भगरे १३१०७ मतांनी आघाडीवर

दिंडोरी मतदारसंघ ( पाचवी फेरी अखेर) –

महाविकास आघाडीचे भास्कर भगरे १२०५७२

महायुतीच्या उमेदवार – भारती पवार १०७४६२

11:21 (IST) 4 Jun 2024
Nashik Lok Sabha Election Result Live Updates : महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे ३६४३८ हजार मतांनी आघाडीवर

नाशिक लोकसभा

राजाभाऊ वाजे – ११५८१२

महायुतीचे हेमंत गोडसे – ७९३५४

11:20 (IST) 4 Jun 2024
जळगाव, रावेरमध्ये भाजपच्या उमेदवारांची दुसर्‍या फेरीअखेरीतही आघाडी

जळगाव : लोकसभेच्या जळगाव व रावेर या मतदारसंघातील महायुतीच्या भाजपच्या उमेदवारांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली असून, दुसर्‍या फेरीतही आघाडी कायम ठेवत त्यात मताधिक्क्य वाढत असल्याचे दिसून येत आहे.

दुसर्‍या फेरीअखेर जळगाव मतदारसंघात महायुतीच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना वाघ यांना आतापर्यंत १ लाख ४ हजार ८४० मते, तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील-पवार यांना ५८ हजार ४५० मते मिळाली आहेत आणि रावेरमध्ये महायुतीच्या भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसेंना एक लाख २७ हजार ५६८ मते, तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांना ६६ हजार ५४२ मते मिळाली आहेत.

11:19 (IST) 4 Jun 2024
सातारा लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे २० हजार मतांनी आघाडीवर

सातारा लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे २० हजार मतांनी आघाडीवर

11:15 (IST) 4 Jun 2024
जळगावात महायुतीत जल्लोष अन् विरोधकांत अनुत्साह

जळगाव : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, टपाली व पहिल्या फेरीचा निकालातील आकडेवारी समोर आली आहे. त्यात जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघांत महायुतीच्या भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जल्लोष, तर महाविकास आघाडीत अनुत्साहाचे वातावरण दिसून आले. मात्र, अजूनही मतमोजणीच्या फेर्‍या बाकी आहेत.

लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात १४ व रावेर मतदारसंघात २९ उमेदवार आखाड्यात आहेत. दोन्ही मतदारसंघांत अनेक मनोरंजक राजकीय घडामोडी घडत वार-पलटवारांत जिल्हा राज्यात चर्चेचा विषय ठरला. दोन्ही मतदारसंघांत सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात चुरशीची झाली. यंदा मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाल्यामुळे त्याचा फायदा कोणाला होणार, याचीही चर्चा सुरू झाली होती.

 

लोकसभा निवडणुकीचा निकाल २०२४

महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील लोकसभेच्या ५४३ मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे. त्याचे आज निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताची भविष्यातील दिशा निश्चित करतील. यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडली असून ४८ मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळाली.