Maharashtra Lok Sabha Election Result Vote Counting Live Updates : देशात नुकताच १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली असून आज ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. यंदा महाराष्ट्रातील ४८ जागांवर चुरशीची लढत बघायला मिळाली आहे.दरम्यान, या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असला तरी त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले होते. या अंदाजानुसार महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजुने असल्याचे दिसून आलं होतं. मात्र, असे असले तरी महाराष्ट्रातील जनेताच कौल ‘एनडीए’ला की ‘इंडिया’ला याचं उत्तर प्रत्यक्ष निकालानंतरच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या ४८ जागांचे निकाल तुम्हाला एक क्लिकवर वाचता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Lok Sabha Election Result, 0४ June 2024 : लोकसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी? जाणून घ्या…

08:08 (IST) 4 Jun 2024
Mumbai North Lok Sabha Election Result Live Updates : मुंबई-उत्तर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : पहिला कल हाती

Mumbai North Lok Sabha Election Result Live Updates : मुंबई-उत्तर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : पहिला कल हाती आला असून भाजपाचे उमेदवार पियुष गोयल आघाडीवर आहेत.

08:02 (IST) 4 Jun 2024
Palghar Lok Sabha Election Result Live Updates : पालघर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : मतमोजणीला सुरुवात

Palghar Lok Sabha Election Result Live Updates : पाघरमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली असून आधी पोस्टल बॅलेटमधील मोजली जाणार आहेत. त्यानंतर ईव्हीएम मशीन उघडल्या जातील.

07:52 (IST) 4 Jun 2024
Nashik Lok Sabha Election Result Live Updates : नाशिक लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : शिंदे गटापुढे होते कडवे आव्हान

Nashik Lok Sabha Election Result Live Updates : सहजसाध्य असताना सेनापती ठरविण्यातच बहुतांश वेळ घालविल्याने लढाई अवघड वळणावर येऊन ठेपल्यावर हातघाईवर यावे, तशी काहीशी अवस्था नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची झाली होती. सलग दोनदा विजयश्री मिळविणारे शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे हे उमेदवारी मिळण्यात कालापव्यय झाल्याने प्रचारात रात्रंदिवस एक करीत असले तरी, मित्रपक्षांकडून हवे तसे सहकार्य मिळत नसल्याची त्यांच्यापुढे अडचण आहे. हीच गोष्ट नेमकी महाविकास आघाडीकडील ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडत असल्याने लढतीला वेगळाच रंग आला होता.

07:47 (IST) 4 Jun 2024
Nandurbar Lok Sabha Election Result Live Updates : नंदुरबार लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : कोण मारणार बाजी?

Nandurbar Lok Sabha Election Result Live Updates : पक्षातंर्गत तसेच महायुतीतील घटक पक्षांचा विरोध असतानाही नंदुरबार मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा भाजपाची उमेदवारी मिळालेल्या डाॅ. हिना गावित यांच्यासमोर यावेळी प्रबळ आव्हान उभे होते. मागील निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांची राजकारणरहित प्रतिमा आणि शिंदे गटाकडून त्यांना मिळणारी साथ, यामुळे भाजपची नौका हेलकावे खात असताना डॉ. विजयकुमार गावित यांनी सर्वसूत्रे हाती घेत मुलीच्या प्रचाराचा धुराळा उडवून दिल्याने लढतीमध्ये चुरस निर्माण झाली होती.

07:45 (IST) 4 Jun 2024
Nanded Lok Sabha Election Result Live Updates : नांदेड लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : निवडणूक चिखलीकरांची आणि नेतृत्व कसोटी अशोक चव्हाण यांची!

Nanded Lok Sabha Election Result Live Updates : नांदेड लोकसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीत राजकीय चित्र पालटले होते. काँग्रेसकडून अशोक चव्हाण विरुद्ध इतर सारे ही २५ वर्षांची मालिका अचानक खंडित झाली होती. सहा महिने आधी काँग्रेस पक्षासाठी भक्कम तयारी करणारे चव्हाण निवडणुकीच्या तोंडावर पक्ष सोडून भाजपात गेले, या पक्षातर्फे राज्यसभा खासदार झाले आणि आता मागील निवडणुकीत ज्यांनी त्यांचा पराभव केला, त्या प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा निवडून आणण्याची आव्हानात्मक जबाबदारी त्यांच्यावर आली होती.

07:42 (IST) 4 Jun 2024
Nagpur Lok Sabha Election Result Live Updates : नागपूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : गडकरी हॅट्रिक साधणार की परिवर्तन होणार?

Nagpur Lok Sabha Election Result Live Updates : नितीन गडकरी सध्या हॅट्रिक साधण्याच्या निर्णायक काळात आहे. २०१४,२०१९ ची निवडणूक जिंकली, २०२४ ची निवडणूक जिंकली तर ते नागपूरमध्ये हॅट्र्क साधणारे दुसरे नेते ठरतील. त्यामुळे सर्वांचेच लक्ष सध्या आजच्या मतमोजणीकडे आहे. गडकरी हॅट्रिक साधणार की परिवर्तन होणार या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे.

07:36 (IST) 4 Jun 2024
Mumbai North East Lok Sabha Election Result Live Updates :मुंबई-उत्तर-पूर्व लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट :

Mumbai North East Lok Sabha Election Result Live Updates : मुलुंड ते शिवाजीनगर-मानखुर्द पसरलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात मराठी- गुजराती हा भाषिक तर हिंदू-मुस्लीम या धार्मिक वादातून पूर्णपणे भाषिक आणि धार्मिक वळणावर गेलेल्या या लढतीत ध्रुवीकरणाचा कोणाला फायदा होतो यावरच निकाल ठरणार आहे. धारावी प्रकल्पग्रस्तांच्या मुलुंडमधील पुनर्वसनाच्या मुद्द्यावर भाजपला सतत स्पष्टीकरण द्यावे लागत असून, भाजपच्या बालेकिल्ल्यात हा विषय गंभीर बनल्याने ही लढत सोपी नव्हती.

07:34 (IST) 4 Jun 2024
Mumbai North Central Lok Sabha Election Result Live Updates :मुंबई-उत्तर-मध्य लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट :

Mumbai North Central Lok Sabha Election Result Live Updates : उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ मुंबईतील सहा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मराठी आणि मुस्लीम मतदारांचा म्हणून ओळखला जातो. येथे मराठी ३४ टक्के आणि मुस्लीम २४ टक्के मतदार आहेत. या वेळी पाचव्या टप्प्याचे मुंबईतील मतदान सर्वत्र संथ पार पडले. या मतदारसंघात ५१.४२ टक्के मतदान नोंदवले गेले. वर्षा गायकवाड या महिला उमेदवार असूनही येथे महिलांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचे दिसले.

07:31 (IST) 4 Jun 2024
Mumbai South Lok Sabha Election Result Live Updates : मुंबई-दक्षिण लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट :

Mumbai South Lok Sabha Election Result Live Updates : शिवसेनेची स्थापना झाली त्या दादरचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात चुरशीची लढत होती. शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवनचा समावेश असलेला हा परिसर ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेचा ठरला होता. धारावी, अणुशक्तीनगर, चेंबूर, वडाळा सर्वाधिक कष्टकरी वर्ग निकाल ठरविणार आहे.

07:29 (IST) 4 Jun 2024
Maval Lok Sabha Election Result Live Updates : मावळ लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : मावळमध्ये कोण मारणार बाजी?

Maval Lok Sabha Election Result Live Updates : निर्मितीपासून शिवसेनेला साथ देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या वेळी दोन्ही शिवसेनेतच लढत होती. शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजोग वाघेरे निवडणुकीच्या रिंगणात होते. प्रारंभी महायुतीसाठी सोपी वाटणारी निवडणूक वाघेरे यांच्यामुळे चुरशीची झाली. या मतदारसंघातील सहापैकी भाजपाचे तीन, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे.

07:27 (IST) 4 Jun 2024
Madha Lok Sabha Election Result Live Updates : माढा लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : मोहिते-पाटील आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला

Madha Lok Sabha Election Result Live Updates : ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबियांनी भाजपाच्या विरोधात बंड पुकारल्याने माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली होती.. ‘सोपी वाटणारी निवडणूक अवघड झाली’ या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे भाजपसाठी ही निवडणूक अवघड बनल्याचे चित्र दिसत होते. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापूर जिल्ह्यात लागोपाठ दोन दिवस सभा घ्याव्या लागल्या होत्या. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपामधील या चुरशीच्या निवडणुकीत माढ्याची जागा कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान उभे ठाकले होते.

07:12 (IST) 4 Jun 2024
Latur Lok Sabha Election Result Live Updates : लातूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : अमित देशमुखांच्या राजकीय कौशल्याची कसोटी, भाजपसाठी गड राखण्याचे आव्हान

Latur Lok Sabha Election Result Live Updates : लातूर हा काँग्रेसचा पारंपारिक गड भाजपाने गेल्या दोन निवडणुकांमध्ये सर केला असला तरी यंदा जातीय समीकरणाची किनार लाभलेल्या या निवडणुकीत भाजपसाठी हा गड राखण्याचे मोठे आव्हान होते. जातीय मतपेढीचा परिणाम वाढवा, लिंगायत मतांचा जोर काँग्रेसच्या बाजूने व्हावा या काँग्रेसच्या व्यूहरचनेला भाजपची मंडळी प्रत्युत्तर देत होती. शिवराज पाटील चाकुरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांना भाजपने प्रवेश दिला. त्यामुळे जातीय मतपेढीचे गणित आम्हीही मांडू असे उत्तर देण्यात आले होते.

07:09 (IST) 4 Jun 2024
Kolhapur Lok Sabha Election Result Live Updates : कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : राजा विरुद्ध प्रजा स्वरुप प्राप्त झालेल्या लढतीत कोण सरस ठरणार ?

Kolhapur Lok Sabha Election Result Live Updates : १५ वर्षांपूर्वी सदाशिवराव मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे पुत्र युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. आता छत्रपती शाहू महाराज व संजय मंडलिक यांच्यात लढत होत असताना पराभवाची परतफेड होणार की पराभवाची मालिका पुढे सुरू राहणार याची उत्सुकता चुरशीच्या लढतीने निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या गादीचा मुद्दा महायुतीकडून तापिवण्यात आल्याने मतदार गदीचा मान राखतात का, याची उत्सुकता आहे.

07:03 (IST) 4 Jun 2024
Kalyan Lok Sabha Election Result Live Updates : कल्याण लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : कल्याणमध्ये कोण मारणार बाजी

Kalyan Lok Sabha Election Result Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे रिंगणात असल्याने साऱ्यांचे लक्ष वेधलेल्या कल्याण मतदारसंघातील लढत अगदीच एकतर्फी होते की चुरशीची होते याचीच उत्सुकता होती. भाजपची नाराजी असली तरी मोदी हे खणखणीत नाणे शिंदे यांच्यासाठी जमेची बाजू ठरली होती.

06:57 (IST) 4 Jun 2024
Jalna Lok Sabha Election Result Live Updates : जालना लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : कोण मारणार बाजी?

Jalna Lok Sabha Election Result Live Updates : जालना लोकसभा मतदारसंघात गेल्या सलग पाच निवडणुकांत विजयी झालेले भाजपचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची यावेळी काँग्रेसचे कल्याण काळे यांच्याशी झाली. मराठा आरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाचे केंद्रबिंदू जालना जिल्हा असल्याने याचा दानवे यांना किती फटका बसतो याचा भाजपकडून अंदाज घेण्यात येत होता. या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा सदस्यांपैकी पाच महायुतीचे आहेत. त्यापैकी तीन भाजपाचे तर दोन शिवसेनेचे (शिंदे) असून ते दोघेही (संदीपान भूमरे आणि अब्दुल सत्तार) राज्यात मंत्री आहेत. यामुळे दानवे यांचे पाठबळ वाढले, तरी कल्याण काळे मात्र त्यांच्याशी पूर्ण ताकदीनिशी लढा देत होते.

06:53 (IST) 4 Jun 2024
Jalgaon Lok Sabha Election Result Live Updates : जळगाव लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : भाजपसाठी एकतर्फी वाटणारी लढत चुरशीची

Jalgaon Lok Sabha Election Result Live Updates : सतत भाजपला साथ देणारा अशी ओळख असलेल्या जळगाव लोकसभा मतदारसंघात यावेळी मात्र प्रारंभी भाजपसाठी सहजसोपी वाटणारी निवडणूक शिवसेना ठाकरे गटाने करण पवार-पाटील यांना उमेदवारी दिल्याने अवघड झाली आहे. मराठा समाजबहुल मतदारसंघ असल्याने आघाडी आणि महायुती या दोघांनी मराठा समाजाचे उमेदवार दिले असल्याने ओबीसी मतदारांवर जय-पराजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

06:49 (IST) 4 Jun 2024
Hingoli Lok Sabha Election Result Live Updates : हिंगोली लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : उमेदवार बदलल्याने शिंदे गटाची कसोटी

Hingoli Lok Sabha Election Result Live Updates : विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी बदलून नवा उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्याने हिंगोली मतदारसंघात शिवसेनेच्या शिंदे गटाची कसोटी लागली होती. शिंदे आणि ठाकरे या शिवसेनेच्या दोन गटांमध्येच चुरशीची लढत झाली. मागील चार दशकांमध्ये एकदा निवडून दिलेल्या उमेदवाराला सलग दुसऱ्यांदा विजयाची संधी न देण्याची एक खास परंपराही हिंगाेली मतदारसंघाने यंदाही जपली आहे, हे विशेष !

06:46 (IST) 4 Jun 2024
Hatkanangle Lok Sabha Election Result Live Updates : हातकणंगले लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : हातकणंगले; पंचरंगी लढतीत कमालीची चुरस

Hatkanangle Lok Sabha Election Result Live Updates : हातकणंगले मतदारसंघात तगड्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निकालाबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, वंचितचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. सी. पाटील, शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्यातील लढतीत कोण कोणाची किती मते खेचतात हे निकालाला कलाटणी देणारी ठरू शकते. अखेरच्या टप्प्यातील बड्या नेत्यांच्या सभांमुळे कुंपणावरील मतदार कोणाकडे वळणार हे परिणामकारक ठरेल.

06:45 (IST) 4 Jun 2024
Gadchiroli Chimur Lok Sabha Election Result Live Updates : गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : भाजपला ‘हॅटट्रिक’चा विश्वास तर काँग्रेसला विरोधी लाटेचा आधार!

Gadchiroli Chimur Lok Sabha Election Result Live Updates : क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली. तरी कुणाचे पारडे जड याचा अंदाज वर्तवणे कठीण झाल्याने येथे चुरशीची लढत असल्याचे चित्र होते. भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते तिसऱ्यांदा विजयी होणार असा दावा करीत असले तरी सत्ताविरोधी वातावरणामुळे आम्हीच जिंकणार असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात होते.

06:42 (IST) 4 Jun 2024
Dindori Lok Sabha Election Result Live Updates : दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : दिंडोरी, कांदा प्रश्न कोणाला रडवणार ?

Dindori Lok Sabha Election Result Live Updates : देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या दिंडोरीत महायुतीच्या उमेदवार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्याशी होणारी लढत अनेक कारणांमुळे चुरशीची ठरत आहे. कांदा निर्यातबंदी, पक्षांतर्गत नाराजी आणि मित्रपक्षांमधील धुसफूस, यामुळे केंद्रीय राज्यमंत्र्याला मैदानात उतरवूनही भाजपसमोर ही जागा राखण्याचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. माकपला माघार घेण्यास लावत राष्ट्रवादी शरद पवार गटाने मत विभाजनाचा धोका दूर केला.

06:40 (IST) 4 Jun 2024
Dhule Lok Sabha Election Result Live Updates : धुळे लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : धुळे; विरोधी मतांचे विभाजन टळल्याने भाजपपुढे आव्हान

Dhule Lok Sabha Election Result Live Updates : महायुतीचा उमेदवार जाहीर होऊन जवळपास महिनाभराने उमेदवारी मिळूनही महाविकास आघाडीच्या डाॅ. शोभा बच्छाव या धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत अचानक लढतीत आल्या होत्या. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरणे, एमआयएमने उमेदवार उभा न करणे, या दोन कारणांमुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होणार असून विरोधी मत विभाजनाचा धोका टळल्याने महायुतीचे उमेदवार डाॅ. सुभाष भामरे यांचा मार्ग मात्र खडतर झाला होता.

06:30 (IST) 4 Jun 2024
Chandrapur Lok Sabha Election Result Live Updates : चंद्रपूर लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट :

Chandrapur Lok Sabha Election Result Live Updates : गेल्या वेळी राज्यात काँग्रेसने एकमेव जिंकलेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपाने सारी ताकद पणाला लावली होती. यासाठीच भाजपने वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना रिंगणात उतरविले होते. काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोकर यांच्या पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देऊन सहानुभूती तसेच कुणबी समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण करण्यावर भर दिला होता.

05:06 (IST) 4 Jun 2024
Buldhana Lok Sabha Election Result Live Updates : बुलढाणा लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : बुलढाणा – ‘खुद्दार’ विरुद्ध ‘गद्दार’ लढतीत कोणाचे पारडे जड ठरणार ?

Buldhana Lok Sabha Election Result Live Updates : वरकरणी युतीविरुद्ध आघाडी अशी वाटणारी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत अपक्ष रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी झाली. वंचित, बसपा अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्यासह एकूण २१ उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे महायुती विरोधातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात होणाऱ्या या लढतीला ‘गद्दार’ विरुद्ध ‘खुद्दार’ असा रंग देण्यात आला.

04:01 (IST) 4 Jun 2024
Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates : भिवंडी लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या पथ्यावर?

Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates : महाविकास आघाडीतील घटक पक्षात असलेली नाराजी, जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज आणि नेहमीप्रमाणे विरोधी पक्षाकडून उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी सोपी ठरेल हा सुरुवातीचा अंदाज निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मात्र पूर्णपणे चुकीचा ठरल्याचे चित्र या मतदारसंघात होते. शहापूर, मुरबाड भागातील कुणबी मतदारांच्या ध्रुवीकरणाच्या चर्चेमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली. शिवाय मुरबाडचे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या समर्थकांमध्ये असलेली नाराजी पाटील यांना किती अडचणीची ठरते यावर येथील निकालाचे भवितव्य अवलंबून आहे.

02:37 (IST) 4 Jun 2024
Bhandara Gondiya Lok Sabha Election Result Live Updates : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : भंडारा – गोंदिया; भाजप आणि काँग्रेसमधील लढतीत कोण बाजी मारणार ?

Bhandara Gondiya Lok Sabha Election Result Live Updates: भंडारा-गोंदिया हा ‘दिग्गजांना पराभूत’ करणारा मतदारसंघ, अशी ओळख असून येथील राजकीय समीकरणे प्रत्येक वेळी बदलतात. यावेळी भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पातळीवरील पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच या मतदारसंघात लढत होती. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची साथ मिळाल्याने भाजपाचे गणित यंदा अधिक सोपे झाल्याचे मानण्यात येते होते. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदारसंघात मतदान असून प्रचार शिगेला पोहचला होता. यावेळी एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. भाजपाचे सुनील मेंढे महायुतीचे उमेदवार होते. तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे रिंगणात होते.

01:43 (IST) 4 Jun 2024
Beed Lok Sabha Election Result Live Updates : बीड लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : बीड; जातीय ध्रुवीकरणाचा फायदा कोणाला ?

Beed Lok Sabha Election Result Live Updates : आरक्षण मागणी आंदोलनानंतर मराठा जातीचे ध्रुवीकरण त्यातून निर्माण होणारा रोष गेवराई, बीड आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघात जोरावर होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून एकवटलेला ओबीसी मतदार दुसऱ्या बाजूला, असे निवडणुकीतील पारंपरिक जातीय प्रारुप या वेळी बीड लोकसभा मतदारसंघात पुन्हा रंगले होते. त्यात पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीची लढत होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्दयांवर कमी आणि जात केंद्रीत अधिक अशीच होत होती.

00:48 (IST) 4 Jun 2024
Baramati Lok Sabha Election Result Live Updates : बारामती लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : बारामती, काका-पुतण्याच्या लढाईत कोण वरचढ ठरणार ?

Baramati Lok Sabha Election Result Live Updates : देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या नणंद-भावजयमध्ये सरळ लढत होत असली, तरी खरी लढाई माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये होती. एकीकडे शरद पवार यांच्याविषयी सहानभूतीची लाट, तर दुसरीकडे अजित पवारांच्या विकासकामांच्या उपकाराखाली दबलेला मतदार अशा द्विधा मनस्थितीतील बारामतीच्या मतदारांपुढे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ असा प्रश्न पडला होता. प्रचारात अजित पवारांबरोबर; पण मनाने शरद पवारांबरोबर असलेल्या मतदारांपुढे कोणाच्या पारड्यात मते टाकायची, हाच यक्षप्रश्न पडला होता. दरम्यान, बारामतीत जनतेचा कौल कुणाला? हे चित्र उद्या स्पष्ट होणार आहे.

23:03 (IST) 3 Jun 2024
Aurangabad M Lok Sabha Election Result Live Updates : औरंगाबाद- म लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : औरंगाबाद; तिरंगी लढतीचा खैरे, जलील की भूमरे यांना फायदा ?

Aurangabad M Lok Sabha Election Result Live Updates उद्धव ठाकरे यांच्याविषयी असणारी सहानुभूतीची लाट टिकेल का, एमआयएमचा कट्टर धार्मिक चेहरा खरा की धर्मनिरपेक्षतेची नवी झुल खरी, वंचितची ताकद उरलीय की विरली, याच बरोबर हिंदू-मुस्लिम व मराठा-ओबीसी हे विभाजन यातील कोणते इंजिन चालेल हे ठरविणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा तिरंगी लढत होत आहे. तिरंगी लढतीत कोणाला कसे मतदान होते यावर निकालाचे गणित ठरणार आहे.

23:00 (IST) 3 Jun 2024
Amravati Lok Sabha Election Result Live Updates :अमरावती लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : अमरावतीत तिरंगी लढत

Amravati Lok Sabha Election Result Live Updates : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपा, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात चुरशीची लढत होती. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी गेली पाच वर्षे केंद्र सरकारला दिलेला पाठिंबा, भाजपामध्ये नाट्यमय प्रवेश, लगेच उमेदवारी आणि जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला दिलासा, यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या राणांना जनतेच्या न्यायालयात अग्निदिव्य पार करावे लागणार आहे. गेल्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतपेढीचा आधार त्यांना मिळाला होता. यंदाही त्यांनी भाजपच्या परंपरागत मतांखेरीज विविध जात समूहांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांना जोरदार प्रयत्न करावे लागले होते. दरम्यान, उद्या जनतेचा कौल कुणाला असेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.

20:58 (IST) 3 Jun 2024
Akola Lok Sabha Election Result Live Updates – अकोला लोकसभा निवडणूक निकाल लाइव्ह अपडेट : अकोल्यात चुरशीची तिरंगी लढत

Akola Lok Sabha Election Result Live Updates – अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप, वंचित व काँग्रेसमध्ये काट्याची लढत आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये धार्मिक रंग चढल्याने भाजपने एकतर्फी वर्चस्व राखले होते. यावेळेस मात्र प्रमुख तीन उमेदवारांमधील मतविभाजनाचे गणित निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. वंचित व काँग्रेसपुढे इतिहास बदलण्याचे, तर भाजपपुढे वर्चस्व राखण्याचे आव्हान आहे. या मतदारसंघात भाजपाने अनुप धोत्रे, काँग्रेसने अभय पाटलांना उमेदवारी दिली आहे. तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढत आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल २०२४

महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील लोकसभेच्या ५४३ मतदारसंघासाठी निवडणूक पार पडली आहे. त्याचे आज निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल भारताची भविष्यातील दिशा निश्चित करतील. यंदा महाराष्ट्रात पाच टप्प्यात ही निवडणूक पार पडली असून ४८ मतदारसंघात चुरशीची लढत बघायला मिळाली.