Maharashtra Lok Sabha Election Exit Polls 2024 Today, 01 June : लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा संपत आला असून थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे समोर येतील. याप्रमाणे राज्यात काय परिस्थिती असेल, याची माहिती घेऊया. राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये भाजपा (२८), शिवसेना (एकनाथ शिंदे) (१५) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) (४) आणि रासप (१) असे पक्ष एकत्र आहेत. तर महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव ठाकरे) (२१), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) (१०) आणि काँग्रेस (१७) पक्ष निवडणूक लढवत आहे. कंसातील आकडे किती मतदारसंघात ते निवडणूक लढवत आहेत, हे दर्शवितात. यापैकी कुणाला किती जागा मिळतील, याचा अंदाज एक्झिट पोलमधून येत आहे.

Live Updates

Maharashtra Exit Poll 2024 Live, 01 June 2024 | एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे चित्र कसे असेल याची सर्व माहिती एका क्लिकवर जाणून घ्या.

22:44 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 : बारामतीकरांचा कौल लेकीला की सुनेला?

बारामतीमध्ये सुनेत्रा पवार पिछाडीवर असल्याचे एक्झिट पोलद्वारे सांगितले जात आहे. वाचा सविस्तर वृत्त

22:06 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 : महाराष्ट्रात भाकर फिरणार? काय सांगतात एक्झिट पोलचे अंदाज

बहुसंख्य एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे की, भाजपाचं ४०० पारचं स्वप्न भंगणार आहे. वाचा सविस्तर बातमी

22:05 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024: महाराष्ट्रात भाजपाचं ४५+ चं स्वप्न भंगणार

एबीपी ‘सी व्होटर्सचा’ हा सर्व्हे लक्षात घेतला तर महाराष्ट्रातलं भाजपा आणि महायुतीचं ४५ प्लसचं स्वप्न भंगताना दिसतं आहे. या सर्व्हेतल्या संख्या लक्षात घेतल्या तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊनही भाजपाला फारसा फायदा झालेला दिसत नाही. वाचा सविस्तर बातमी

22:02 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 : सांगलीत ‘मशाल’ नव्हे तर ‘विशाल’, एबीपी सी व्होटर्सच्या सर्व्हेतला अंदाज

सांगलीत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी जाहीर केली होती. त्यावरुन काँग्रेसची नाराजी निर्माण झाली होती. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. वाचा सविस्तर बातमी

21:29 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 : असली-नकलीच्या राजकराणाला महाराष्ट्राची जनता कंटाळली? काय सांगतात एक्झिट पोल

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन वर्षांपूर्वी पडलेली फूट, त्यानंतर एकमेकांवर केले गेलेले असली-नकलीचे आरोप, सत्तेसाठी नेत्यांनी मारलेल्या उड्या, भाजपाने एकेकाळी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांनाच पक्षात घेतल्यामुळे पसरलेली नाराजी, या सर्वांचा परिणाम एकूणच मतदानावर झाला असावा, असा कयास एक्झिट पोल पाहून बांधला जात आहे. महायुतीला २०१९ च्या निवडणुकीत ४१ जागा मिळाल्या होत्या. मात्र या निवडणुकीत एकाही एक्झिट पोलने त्यांना ४० पेक्षा अधिक जागा दाखविलेल्या नाहीत.

20:11 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : कोणत्या एक्झिट पोलने किती जागा दिल्या? महायुतीचं स्वप्न भंगलं?

लोकसभा निवडणुकीत महायुती ४५ हून अधिक जागांवर जिंकतील, असे सांगण्यात येत होते. मात्र आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये एकाही एक्झिट पोलने महायुतीला ४५ हून अधिक जागा दाखवलेल्या नाहीत.

इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स

महायुती - ३४

मविआ - १३

अपक्ष - १

न्यूज २४ चाणक्य

महायुती - ३३

मविआ - १५

रिपब्लिक भारत-मॅट्रीझ

महायुती - ३० ते ३५

मविआ - १३ ते १९

रिपब्लिक PMARQ

महायुती - २९

मविआ - १९

टीव्ही ९ पोलस्ट्राट

महायुती - २२

मविआ - २६

एबीपी-सी व्होटर

महायुती - २४

मविआ - २३

19:49 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : न्यूज २४ चाणक्य एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीच्या ३३ तर मविआच्या १५ जागा

सातव्या टप्प्याचे मतदान संपुष्टात येताच देशभरात एक्झिट पोलचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. न्यूज २४ चाणक्याच्या अंदाजानुसार हायुतीच्या ३३ तर मविआच्या १५ जागा निवडून येऊ शकतात, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

19:33 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : देशाचा कौल काय सांगतो? एनडीए वि. इंडिया आघाडी कोण बाजी मारणार?

लोकसभेत सातव्या टप्प्याचे मतदान पूर्ण होताच देशभरातील ५४३ जागांवर कोण आघाडी मिळविणार याचे एक्झिट पोलचे अंदाज येण्यास सुरुवात झाली आहे. दक्षिणेतील राज्यात भाजपाने चंचूप्रवेश केल्याचे दिसून येत आहे.

19:31 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : दोन एक्झिट पोलकडून महायुतीला आघाडी, तर मविआला एवढ्या जागा

रिपब्लिक भारत-मॅट्रीझ (Republic Bharat-Matrize exit polls) यांनी राज्यात एनडीएच्या ३० ते ३५ जागा आणि महाविकास आघाडीच्या १३ ते १९ जागा जिंकून येतील असा अंदाज वर्तविला आहे. तर रिपब्लिक PMARQ एक्झिट पोलने महायुतीला २९ तर मविआला १९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे.

19:16 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : साताऱ्यात उदयनराजेंना पुन्हा धक्का; एक्झिट पोलनुसार शिंदे आघाडीवर

टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, साताऱ्यात पुन्हा एकदा धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे. २०१९ साली पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव झाला होता. यंदाही एक्झिट पोलनुसार उदयनराजे पिछाडीवर दाखवत आहेत. तर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

19:14 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार अजित पवार गटाला शून्य जागा

टीव्ही ९ पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार महायुतीमधील भाजपाला १८ जागा, शिवसेनेला ४ जागा आणि राष्ट्रवादीला शून्य जागा दाखवली आहे.

19:09 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : 'बाप बापच असतो', सुषमा अंधारेंची टीका

टीव्ही ९ आणि एपीबी सी व्होटरच्या आकडेवारीनुसार शिवसेना उबाठा गटाला शिंदे गटापेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यावरून उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी 'बाप बापच असतो', अशी टीका विरोधकांवर केली आहे.

19:03 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : महायुतीला किती जागा मिळणार?

एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, भाजपाला २८ पैकी १७, शिवसेना शिंदे गटाला १५ पैकी ६ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाट्याला ४ पैकी १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा एकूण ४८ पैकी २४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

19:00 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : महाविकास आघाडीला किती जागा?

एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात शिवसेना उबाठा गटाला २१ पैकी ९ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १० पैकी ६ जागा, तर काँग्रेसला १७ पैकी ८ जागांना विजय मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशा एकूण २३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

18:56 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : टीव्ही ९ एक्झिट पोलनुसार रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर

टीव्ही ९ - पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर दिसत आहेत. नारायण राणे यांनी पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत पाऊल ठेवले आहे. दोन वेळा खासदार राहिलेल्या शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत यांच्याशी त्यांची थेट लढत आहे.

18:52 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : मविआ २३ आणि महायुती २४, तर अजित पवारांना... कोणाला किती जागा?

एबीपी-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपप्रणित एनडीएला २४ जागांवर आघाडी मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला २३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अजित पवार गटाला एक जागा मिळू शकते.

18:44 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : २०१९ मध्ये महायुतीने किती जागा जिंकल्या?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला महाराष्ट्रात ४१ जागांवर विजय मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने ४ ठिकाणी विजय मिळविला होता. तर काँग्रेसने १, एमआयएम १ आणि राष्ट्रवादी पुरस्कृत अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा अपक्ष निवडून आल्या होत्या.

18:40 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : महाविकास आघाडी किती जागांवर निवडणूक लढवत आहे?

महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीचेही जागावाटप रखडले होते. शिवसेना २१, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० तर काँग्रेस १७ ठिकाणी निवडणूक लढवत आहे.

18:04 (IST) 1 Jun 2024
Maharashtra Exit Poll 2024 Live : महायुतीचे जागावापट कसे आहे?

महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजपाच्या वाट्याला २८, शिवसेना शिंदे गटाला १५ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ४ जागा आल्या आहेत. तसेच एका ठिकाणी रासप निवडणूक लढवित आहे.

17:34 (IST) 1 Jun 2024
इंडिया आघाडी २९५ जागा जिंकणार, मल्लिकार्जून खरगेंचा विश्वास

इंडिया आघाडी देशभरात २९५ पेक्षा जास्त जागा मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आज इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर दिली.

https://twitter.com/INCIndia/status/1796871040099823892

What is Exit Poll How are Exit Polls Conducted in Marathi

एक्झिट पोल म्हणजे काय (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

Story img Loader