Sunetra Pawar vs Supriya Sule in Lok Sabha Election 2024 : जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. देशात पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्रातही पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया पार पडेल. एकीकडे राज्यभर पहिल्या टप्प्यातील मतदानाची धामधूम असताना दुसरीकडे अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून महत्त्वाची बातमी येत आहे. या मतदारसंघात पहिल्यांदाच दोन महिला उमेदवार आमने-सामने ठाकल्या आहेत. या दोन्ही महिला एकाच घरातील असून पहिली विद्यमान खासदार आहे, तर दुसरी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे, या मतदारसंघातील उमेदवार एकमेकांचे देणंही लागतात.

बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यामुळे महायुतीत ही जागा अजित पवार गटाकडे आणि महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाकडे गेली. सुप्रिया सुळे येथील विद्यमान खासदार असून शरद पवार गटाकडून त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली. तर, राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या निमित्ताने देशभर नणंद-भावजयीच्या या लढतीचीच चर्चा आहे. एवढंच नव्हे तर सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवारांच्या ३५ लाख देणं लागतात असं नामनिर्देशन फॉर्ममधून स्पष्ट होतंय.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Jitendra awhad daughter Natasha Awhad
Natasha Awhad: “भाजपाला ही निवडणूक जिंकायचीच होती, कारण…”, जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा खळबळजनक दावा
Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा >> Lok Sabha Election 2024 Phase 1 Live : देशभर मतदानाला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मराठीतून खास आवाहन

सुनेत्रा पवारांनी सुप्रिया सुळेंना दिलंय कर्ज

सुनेत्रा पवार यांनी सुळे यांना ३५ लाख, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ५० लाखांचं कर्ज दिलं आहे. तसंच, सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडूनही सुप्रिया सुळे यांनी २० लाखांचं कर्ज घेतल्याची नोंद या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुळे कुटुंबाकडे स्वतःचे एकही वाहन नाही.

सुनेत्रा पवारांची मालमत्ता किती?

सुनेत्रा पवार यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या कुटुंबाकडे सुमारे १२१.४५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तसंच, शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे ३४.३९ लाखांचे दागिने असून त्यांचे पती अजित पवार यांच्याकडे विविध बँकांमध्ये ३७.१५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हेही वाचा >> पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान; १९ राज्यांमधील १०२ मतदारसंघ सज्ज

सुप्रिया सुळेंची मालमत्ता किती?

विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबीय अब्जाधीश असून, सुळे कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे १६६ कोटी ५१ लाख ८६ हजार ३४८ रुपयांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात एक कोटी आठ लाख ९७ हजार ३४८ रुपयांनी भर पडली आहे. सुळे कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न सरासरी ५.६८ कोटी रुपये असून, सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून सन २०१९ मध्ये उसने घेतलेले ५५ लाख रुपये पाच वर्षांनंतरही फेडलेले नाहीत. पार्थ यांच्याकडून २० लाख रुपये, तर सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपये घेण्यात आले आहेत. सुळे दाम्प्त्याकडे सोने, चांदी आणि हिऱ्यांसह सुमारे ५.४५ कोटी रुपयांचे दागिने आहेत.

सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळेंसाठी सर्व मैदानात

जाहीर सभा घेऊन शक्तिप्रदर्शन करत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांनी गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांच्या जाहीर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पती अजित पवार उपस्थित होते. तर, सुप्रिया सुळे यांच्या जाहीर सभेला शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती. बारामतीमध्ये सात मे रोजी मतदान होणार आहे.

Story img Loader