Top Maharashtra Leaders Social Media Followers : सध्या राज्यात निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही गटांमध्ये प्रमुख तीन-तीन राजकीय पक्ष आहेत आणि इतर काही लहान पक्षही आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल दिसून आले. गेल्या पाच वर्षात कोणाच्या हातून पक्ष गेला तर कोणाच्या हातून आमदार निसटले; त्यामुळे यंदा लोक कोणाला मतदान करणार, कोणाच्या हातात राज्याची सत्ता येणार, कोणाच्या पदरी मुख्यमंत्रिपद येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच कारणाने ही निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

गेल्या महिन्यापासून नेते मंडळी जोरदार प्रचार करत आहेत, पण तुम्हाला माहितीये का, कोणता नेता सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहे? सोशल मीडियावर कोणाचे सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत? आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.

leaders abusive language in politics politicians use foul languages politicians use hate speech
नेत्यांच्या भाषेत ही सवंगता येते तरी कुठून?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
panvel maha vikas aghadi
पनवेल: महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी येणारे नेते गोंधळात
who can check helicopter and bags of political leader,
राजकीय नेत्यांचे हेलिकॉप्टर अन् बॅग तपासणारे अधिकारी कोण असतात? एफएसटी पथक म्हणजे काय? जाणून घ्या!
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Pune Prime Minister Narendra Modi Pandit Jawaharlal Nehru Pune print news
पुणे आवडे पंतप्रधानांना!
Bhau Kadam talk on Ajit Pawar, Bhau Kadam,
“अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत”, अभिनेते भाऊ कदम यांना विश्वास, आणखी काय म्हणाले?
who was pramod mahajan
पत्रकार, भाजपाचे लक्ष्मण ते पंतप्रधानपदाचे दावेदार; कशी होती प्रमोद महाजनांची राजकीय कारकीर्द?

शरद पवार (Sharad Pawar)

शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. ५० वर्षांहून अधिक काळ संसदीय राजकारण करणारे नेते म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. १९९९ साली ते काँग्रेसपासून वेगळे झाले आणि त्यांनी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. पण, अजित पवार यांनी २०२३ मध्ये बंडखोरी केली आणि त्यांचा पक्ष फुटला. आता अजित पवार यांच्याकडे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तर शरद पवार यांच्या पक्षाचे नाव “राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष” असे आहे.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ९ लाख १३ हजार फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – ८ लाख ९० हजार फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – २९ लाख फॉलोअर्स

हेही वाचा : Eknath Khadse Political Retirement : एकनाथ खडसे यांचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. २०१४ ते २०१९ दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळली. त्या वेळी ते महाराष्ट्रातील दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले होते.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ९१ लाख फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – २१ लाख फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – ५९ लाख फॉलोअर्स

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray )

२०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद भूषविले होते, पण हे मुख्यमंत्रिपद फार काळ टिकले नाही. २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले, तसेच मुख्यमंत्री पदाचासुद्धा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांच्या पक्षाचे नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे आहे, तर त्यांच्या पक्षाचे चिन्ह मशाल आहे.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ४ लाख ८६ हजार फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – ३ लाख फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – १६ लाख फॉलोअर्स

हेही वाचा : Saroj Patil: “पवार थकले म्हणून डिवचता…”, लाडक्या भावासाठी बहीण सरोज पाटील यांची जबरदस्त कविता

एकनाथ शिंदे (Eknath Shinde)

एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड पुकारून भाजपाबरोबर सरकार स्थापन केलं आणि सध्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मते, त्यांनी बंड केलेले नसून उठाव केलेला आहे आणि ते आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असल्याचे म्हणतात.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ३८ लाख फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – २८ लाख फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – १० लाख फॉलोअर्स

राज ठाकरे (Raj Thackeray)

महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. शिवसेनेपासून वेगळे होत त्यांनी स्वत:चा एक वेगळा पक्ष स्थापन केला. त्यांची भाषणे नेहमी चर्चेचा विषय ठरतात. सध्या त्यांच्या पक्षाचा महायुती किंवा महाविकास आघाडी अशा कोणत्याही गटात समावेश नाही.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ११ लाख फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – राज ठाकरे यांचे इन्स्टाग्रामवर अकाउंट नाही, पण त्यांचे फॅन पेज भरपूर आहे, ज्यावर त्यांना लाखो लोक फॉलो करतात.
एक्स (ट्विटर) – १८ लाख फॉलोअर्स

हेही वाचा : Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात ‘हे’ ४ दिवस मद्याची दुकाने बंद राहणार; जाणून घ्या कधी असेल ड्राय डे

अजित पवार (Ajit Pawar)

अजित पवार हे तीन वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख नेते मानले जातात. अजित पवार यांनी २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात बंडखोरी करत भाजपा आणि शिवसेनेबरोबर युती केली आणि राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ८ लाख २० हजार फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – ११ लाख फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – १६ लाख फॉलोअर्स

नाना पटोले (Nana Patole)

नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. याशिवाय ते विधानसभेत विरोधी पक्षनेतेसुद्धा होते. मे २०१४ मध्ये त्यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली, पण त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत.

सोशल मीडियावर फॉलोअर्स

फेसबुक – ३ लाख ७ हजार फॉलोअर्स
इन्स्टाग्राम – ९५ हजार फॉलोअर्स
एक्स (ट्विटर) – ३ लाख ७६ हजार तीनशे फॉलोअर्स