पुणे : पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारी न दिल्याने काँग्रेसच्या तीन पदाधिकाऱ्यांनी विधानसभेसाठी वेगवेगळ्या मतदारसंघांतून आपल्याच पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या या बंडखोरीचा फटका काँग्रेससह महाविकास आघाडीला बसणार आहे. या बंडखोरांवर कारवाई करण्याचे संकेत काँग्रेसने दिले असले, तरी निवडणूक लढविण्याचा निर्धार या सर्वच बंडखोर उमेदवारांनी केल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला जोरदार फटका बसला. याची पुनरावृत्ती विधानसभेत होऊ नये यासाठी गेल्या काही महिन्यांपासून महायुतीमध्ये सहभागी असलेल्या पक्षांकडून विशेष काळजी घेतली जात आहे. बंडखोरांची भेट घेऊन, त्यांची समजूत काढून, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महायुतीचे नेते पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील होते. त्यामुळे पुणे शहरातील महायुतीकडून बंडखोरी होण्याची भीती असलेल्या कसबा, पर्वती, कोथरूड, हडपसर तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी शमली.

Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
maharashtra assembly election 2024 Congress High Command started efforts for the return of the rebels in gondia
‘हायकमांड’चा आदेश अन् गोंदियातील काही बंडखोर नरमले, तर काही ठाम
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Devendra Fadnavis, Nagpur Devagiri, Nagpur,
नागपूरच्या देवगिरीवर फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री अडीचपर्यंत बंडखोरांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न
Maharashtra assembly election
बंडखोर लढण्यावर ठाम, नेत्यांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न; जागावाटपाच्या घोळामुळे बंडाळी अटळ
Kolhapur third alliance
कोल्हापुरात तिसऱ्या आघाडीलाही बंडखोरीचे ग्रहण
Devendra fadnavis, chandrashekhar bawankule,
बंडोबांच्या शांतीसाठी भाजप नेत्यांवर जबाबदारी

हेही वाचा >>> विधानसभेसाठी उत्तरप्रदेश मधील नेतेही मैदानात ! पुण्यातील येरवडा भागात १७ नोव्हेंबरला होणार सभा

दुसरीकडे, काँग्रेस नेते मात्र गाफील राहिल्याचे दिसते. काँग्रेसला मानणारा हक्काचा मतदार असलेल्या कसबा, शिवाजीनगर यांसह महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या वाट्याला आलेल्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केली आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये फक्त काँग्रेसच नाही, तर महाविकास आघाडीदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कसबा मतदारसंघातून काँग्रेसने विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांनी कसब्यातून, तर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे मनीष आनंद यांनी शिवाजीनगरमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पर्वती विधानसभेसाठी अश्विनी कदम यांना उमेदवारी दिलेली असतानाही काँग्रेसचे माजी उपमहापौर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांनी बंडखोरी केली आहे.

हेही वाचा >>> कसब्या’ची ९८ वर्षांपूर्वीची बिनविरोध निवडणूक…

या सर्व प्रकारामुळे महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारात उतरावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला आहे. मात्र, यानंतरही बंडखोरी केलेले पदाधिकारी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे पाहायला मिळते. या बंडखोरांची मनधरणी करून त्यांना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय करण्याचे मोठे आव्हान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. अन्यथा, निवडणुकीमध्ये मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा विरोधी पक्षाला मिळू शकतो.

देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी शिष्टाई

उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऐन दिवाळीत पुण्यात आले होते. पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेले वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, कसब्यामधून इच्छुक असलेले विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे, कोथरूडमधील विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दंड थोपटणारे माजी नगरसेवक अमोल बालवडकर, तसेच खडकवासला मतदारसंघातून इच्छुक असलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन फडणवीस यांनी त्यांची नाराजी दूर केली. पुढील काळात त्यांना वेगळ्या पद्धतीने नेतृत्वाची संधी देण्याचा शब्द फडणवीस यांनी दिल्याचे समजते. परिणामी, शहरातील महायुतीमधील बंडखोरी थांबली आहे.