Maharashtra Politics Updates Today: राज्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला असून जागावाटप व तिकीटवाटपानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांनी भाषणातून आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेल्या दाव्यांवर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत. त्याचवेळी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुकांकडूनही होणाऱ्या बंडखोरीमुळे काही मतदारसंघांमध्ये रंगत निर्माण झाली आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Today, 30 October 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ घडामोडींचा आढावा

18:49 (IST) 30 Oct 2024
कोल्हापुरात महायुती, महाविकास आघाडी, तिसऱ्या आघाडीतही बंडखोरीचे ग्रहण

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर महायुती आणि महाविकास आघाडीसह तिसऱ्या आघाडीतील बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. निवडणूक लढणारच असा निर्धार बंडखोरांनी केल्याने त्यांची समजूत तरी कशी काढायची याचा पेच त सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना पडला आहे.

सविस्तर वाचा....

18:35 (IST) 30 Oct 2024
चिंचवड, भोसरीतून ‘घड्याळ’ हद्दपार!

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील दोन मतदारसंघांतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह हद्दपार झाले आहे.

वाचा सविस्तर...

18:34 (IST) 30 Oct 2024
बंडखोरांमुळे भंडारा जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत तिरंगी लढतीची शक्यता; पक्षश्रेष्ठींसमोर आव्हान

भंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये ७८ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली असून उमेदवारांची संख्या ६५ आहे. महाविकास आघाडी व महायुतीमधील नेत्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

वाचा सविस्तर...

18:33 (IST) 30 Oct 2024
शहापूरच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना हद्दपार

शहापूरमध्ये गेल्या पाच वर्षात झालेल्या राजकीय स्थित्यंतरामुळे यंदा पहिल्यांदाच शिवसेनेचे धनुष्यबाण शहापूरातून हद्दपार झाले आहे.

वाचा सविस्तर...

18:07 (IST) 30 Oct 2024
राजकारणातील बड्या चेहऱ्यांची यंदा वंचितकडे पाठ

स्वपक्षाकडून उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेऊन बंडाचा झेंडा फडकावणाऱ्या राजकारणातील प्रभावी बड्या चेहऱ्यांनी यंदा वंचित बहुजन आघाडीकडे पाठ फिरवली आहे.

वाचा सविस्तर..

17:11 (IST) 30 Oct 2024

Maharashtra News Live Today: अजित पवारांच्या विधानामुळे वेदना झाल्या - सुप्रिया सुळे

अजित पवारांनी आर. आर. पाटलांबाबत जे विधान केलं, ते अतिशय अस्वस्थ करणारं आणि वेदना देणारं होतं. मी वहिनींना फोन केला आणि माफीही मागितली. वहिनींना, आबांच्या आईला आणि त्यांच्या कुटुंबाला यामुळे किती दु:ख झालं असेल. गेलेल्या माणसाबद्दल ज्या असंवेदनशीलपणे हे वक्तव्य आलंय, मला खरंच आश्चर्यही वाटलं, दु:खही वाटलं. हे खरंच अस्वस्थ करणारं आहे. राजकारण या पातळीला गेलंय का, याच्या वेदना झाल्या - सुप्रिया सुळे</p>

16:52 (IST) 30 Oct 2024

Maharashtra News Live Today: अजित पवारांच्या 'त्या' दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

आर. आर. आबा आता हयातीत नाहीत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणं मला प्रशस्त वाटत नाही. पण एवढंच सांगतो की अजित पवारांची चौकशी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळातच सुरू झाली होती - देवेंद्र फडणवीस</p>

16:41 (IST) 30 Oct 2024
शिवसेनेने उमेदवार देऊ नये अशी अपेक्षाच नव्हती; मनसेचे उमेदवार आमदार राजू पाटील यांची स्पष्टोक्ती

डोंबिवली - लोकसभा निवडणुकीत महायुतीचा एक समर्थक पक्ष म्हणून मनसेने महायुतीच्या उमेदवारांचे काम त्यावेळी केले. आता महायुती आणि मनसे समोरासमोर निवडणूक लढवित आहेत. महायुतीने मनसे उमेदवारांच्या मतदारसंघात उमेदवार देऊ नये असे ठरले नव्हते किंवा तशी अपेक्षाही नव्हती.

सविस्तर वाचा

16:40 (IST) 30 Oct 2024
खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा दिला, आता आमदारकीची अपेक्षा असताना भाजपकडून ऐनवेळी…

नागपूर: विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर २८८ जागांसाठी सुमारे ७,९९५ जणांनी १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन प्रमुख आघाड्यांमधील सर्वच पक्षांमध्ये अनेकांनी बंडखोरी केली असून मनसे, वंचित बहुजन आघाडी, स्थानिक आघाड्या, छोटे पक्ष हे देखील मैदानात उतरले आहेत. ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून तत्पूर्वी नाराजांचे मन वळवण्याचे खडतर आव्हान नेतेमंडळींना पार पाडावे लागणार आहे.

सविस्तर वाचा

16:39 (IST) 30 Oct 2024
कल्याण ग्रामीणचा निर्णय वरिष्ठांचा ! खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती

ठाणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उमेदवार दिला जाणार नसल्याचे बोलले जात असतानाचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने अखेरच्या यादीत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजेश मोरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली.

सविस्तर वाचा

16:39 (IST) 30 Oct 2024
जितेंद्र आव्हाड तुम्ही प्रचार करू नका...तुमचे काम बोलतयं

ठाणे : राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघामध्ये जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा सामना रंगला असतानाच, या मतदार संघातील कळवा- खारेगाव भागातील गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हाड यांना पाठविलेले पत्र सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे.

सविस्तर वाचा

16:38 (IST) 30 Oct 2024
रामटेकात आक्रीतच घडलं; जागा शिवसेनेची, बंडखोर काँग्रेसचा अन् सोबतीला विद्यमान खासदार व माजी मंत्री

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडाचे निशान फडकावले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चिंता वाढली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

सविस्तर वाचा

16:35 (IST) 30 Oct 2024
रत्नागिरी टिके येथे एका बंदुकीसह सहा जिवंत काडतुसे सापडली, पोलिसांनी दोघांसह दीड लाखांचा मुद्देमाल घेतला ताब्यात

रत्नागिरी तालुक्यातील टिके कांबळेवाडी फाटा येथे शिकारी करण्यासाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेत पोलिसांनी सिंगल बॅरल बंदुक, ६ जिवंत काडतूस, कार आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. रत्नागिरी ग्रामिण पोलिसांनी मंगळवारी २९ ऑक्टोबरला मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिश अरुण रेडीज (वय २४, रा. वाणीपेठ हरचेरी चांदेराई, रत्नागिरी) आणि संजय मधुकर महाजन ( वय ५५, रा. निरखुणेवाडी चिंद्रवली, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघा संशयितांची नावे आहेत.

12:29 (IST) 30 Oct 2024
मेळघाटात भाजपमध्‍ये बंडखोरी…. माजी आमदाराची रिंगणात उडी….

जिल्‍ह्यात सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले असून सर्वाधिक बंडखोरांचे आव्‍हान महायुतीसमोर आहे. मेळघाटमधून केवलराम काळे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दरम्‍यान, आज भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकविले. सविस्तर वाचा…

12:28 (IST) 30 Oct 2024
भाजप बंडखोर उमेदवार म्हणतात, आमची ‘ निष्‍ठावंत भारतीय जनता पार्टी...’ !  ...

बडनेरा मतदारसंघातील वातावरण सुरूवातीपासूनच तापलेले. युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा हे भाजप समर्थक आमदार. त्‍यामुळे येथे महायुतीला कुणाला पाठिंबा देणार, याची प्रतीक्षा होती. अपेक्षेप्रमाणे भाजपने रवी राणांना समर्थन जाहीर केले. सविस्तर वाचा…

12:21 (IST) 30 Oct 2024
डोंबिवली : फडके छेद रस्त्यावरील आगरकर काँक्रीट रस्त्याच्या संथगती कामामुळे वाहन कोंडी

डोंबिवली – येथील पूर्वेतील फडके रस्त्याला आगरकर छेद रस्ता आहे. सर्वाधिक वर्दळीचे रस्ते म्हणून हे दोन्ही रस्ते ओळखले जातात. गेल्या सहा महिन्यांपासून आगरकर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने या रस्त्यावरील व्यापारी, रहिवासी त्रस्त आहेत.

सविस्तर वाचा....

11:48 (IST) 30 Oct 2024
पुणेकर बंडखोरांना ‘योग्य जागा’ दाखवितात!

मतदार आपल्याच पाठीशी असल्याचे प्रत्येक उमेदवार ठामपणे सांगत असतो. पक्षाने डावलले तर उद्विग्न होऊन ‘आता नाही तर कधीच नाही’ असा विचार करून मतदारांच्या भावनेला साद घालतो आणि पक्षाच्या विरोधात अपक्ष किंवा कोणत्या तरी नावाची आघाडी स्थापन करून निवडणुकीला सामोरे जातो. सविस्तर वाचा…

11:29 (IST) 30 Oct 2024
मासुंदा तलावाच्या काठी सर्व पक्षीयांची दिवाळी

ठाणे : दिवाळी पहाट निमित्ताने ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट, शिंदे गटाने आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थांच्या नावाने दिवाळी पहाट साजरी करणार आहेत.

सविस्तर वाचा....

11:16 (IST) 30 Oct 2024

Maharashtra Breaking News Live Today: शरद पवार गटाचा अजित पवारांना खोचक टोला

याला म्हणतात उत्तर देणं..! - शरद पवार गटाच्या मीडिया सेल पदाधिकाऱ्याची खोचक पोस्ट, शेअर केला 'तो' व्हिडीओ!

https://twitter.com/yogi_9696/status/1851175980657750085

11:15 (IST) 30 Oct 2024
मलबार हिल मतदारसंघात ‘अमराठी’ला मराठीचे आव्हान

मुंबई : दक्षिण मुंबईतील एकेकाळी काँग्रेसचा आणि आता भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने अमराठी उमेदवार दिल्यामुळे काही मराठी भाषकांनी एकत्र येऊन निवडणुकीसाठी मराठी उमेदवार उभा केला आहे.

सविस्तर वाचा....

11:14 (IST) 30 Oct 2024
डोंबिवली : शुक्रवारी फडके रस्ता वाहतुकीस बंद, दिवाळी पहाटनिमित्त ढोलताशा वादनास बंदी

डोंबिवली – दिवाळी सणानिमित्त गुरुवार, शुक्रवार डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर तरुणाईचा जल्लोष असतो.

सविस्तर वाचा...

11:13 (IST) 30 Oct 2024
Maharashtra News Live Today: रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल...

देवेंद्र फडणवीस साहेब , टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याचे कोणी सांगितले होते ? तर हे आपल्याच उद्योगमंत्र्यांनी २२ सप्टेबर २०२२ रोजी सांगितले होते. याचा अर्थ तेव्हापर्यंत हा प्रकल्प गुजरातला गेला नव्हता हे स्पष्ट आहे. तुमच्या म्हणण्यानुसार टाटा एअरबस गुजरातला आधीच गेला होता तर मग उद्योगमंत्री उदय सामंत हे महाराष्ट्राशी खोटे बोलले का ? एकतर तुम्ही खोटे बोलत आहात नाहीतर तुमचे मंत्री खोटे बोलत आहेत . खोटे पण रेटून बोलण्याची तुमची जुनी सवय महाराष्ट्राला चांगलीच ठाऊक आहे. कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषण तुम्ही केली पण तुमच्या लाडक्या मित्राला दलालीचा प्रसाद मिळावा म्हणून तुम्ही कंत्राटी भरती पुन्हा सुरु केली, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देतो म्हणून तुम्ही आश्वासन दिले, त्यानंतर तुम्ही 750 कॅबिनेट घेतल्या पण निर्णय घेतला नाही .. राहिला प्रश्न वेदांत FOXCONN आणि राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीचा तर त्यासंदर्भात लवकर तुमचा खोटारडेपणा सविस्तरपणे जनतेसमोर आणेल..तयार रहा - रोहित पवार

https://twitter.com/RRPSpeaks/status/1851489653553053860

11:11 (IST) 30 Oct 2024

Maharashtra Assembly Election 2024: ठाकरे गटानं शेअर केला फडणवीसांचा 'तो' व्हिडीओ!

तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस नवाब मलिकचे अंडरवर्ल्ड आणि दाऊदशी असलेले संबंध उघड करत होते. आता महायुती नवाब मलिक यांना उमेदवारी देणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत निवडणूक लढवत आहे - उद्धव ठाकरे गट

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1851476496604676330

11:06 (IST) 30 Oct 2024

Maharashtra Assembly Election 2024: संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

आबांचे केस फार लहान होते. ते केसानं गळा कापूच शकत नाहीत. अत्यंत प्रामाणिक व कर्तबगार असे ते गृहमंत्री होते. त्यांनी कधीच गृहमंत्री म्हणून चुकीचं काम केलेलं नाही. काल अजित पवारांनी आर. आर. पाटलांनी केलेली सही दाखवली. देवेंद्र फडणवीस व अजित पवारांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यांनी संविधानानुसार गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यांनी अशा प्रकारे गोपनीयतेचा भंग करणं गुन्हा आहे. राज्यपालांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजेत. तुम्ही हे विषय कसे काय जनतेसमोर दाखवता आणि सांगता? - संजय राऊत</p>

Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula

काही मतदारसंघांमध्ये मविआ व महायुतीने उमेदवारच दिलेला नाही. (फोटो : लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

Maharashtra Breaking News Today, 30 October 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घ्या

Story img Loader