Maharashtra Politics Live Updates Today: राज्य विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडींना वेग आला असून जागावाटप व तिकीटवाटपानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांनी भाषणातून आर. आर. पाटील यांच्याबाबत केलेल्या दाव्यांवर राजकीय वर्तुळातून पडसाद उमटू लागले आहेत. त्याचवेळी उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुकांकडूनही होणाऱ्या बंडखोरीमुळे काही मतदारसंघांमध्ये रंगत निर्माण झाली आहे.
Maharashtra Breaking News Live Today, 30 October 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ घडामोडींचा आढावा
काँग्रेसचं प्रचारगीत…
महाराष्ट्र काँग्रेसचे नवीन प्रचार गीत
— Pratik S Patil (@Liberal_India1) October 30, 2024
यंदा पंजा निवडून आणू ✋?
pic.twitter.com/terSMFmUDl
जिल्ह्यात सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण लागले असून सर्वाधिक बंडखोरांचे आव्हान महायुतीसमोर आहे. मेळघाटमधून केवलराम काळे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दरम्यान, आज भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकविले. सविस्तर वाचा…
बडनेरा मतदारसंघातील वातावरण सुरूवातीपासूनच तापलेले. युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा हे भाजप समर्थक आमदार. त्यामुळे येथे महायुतीला कुणाला पाठिंबा देणार, याची प्रतीक्षा होती. अपेक्षेप्रमाणे भाजपने रवी राणांना समर्थन जाहीर केले. सविस्तर वाचा…
डोंबिवली – येथील पूर्वेतील फडके रस्त्याला आगरकर छेद रस्ता आहे. सर्वाधिक वर्दळीचे रस्ते म्हणून हे दोन्ही रस्ते ओळखले जातात. गेल्या सहा महिन्यांपासून आगरकर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम एमएमआरडीएकडून सुरू आहे. हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने या रस्त्यावरील व्यापारी, रहिवासी त्रस्त आहेत.
मतदार आपल्याच पाठीशी असल्याचे प्रत्येक उमेदवार ठामपणे सांगत असतो. पक्षाने डावलले तर उद्विग्न होऊन ‘आता नाही तर कधीच नाही’ असा विचार करून मतदारांच्या भावनेला साद घालतो आणि पक्षाच्या विरोधात अपक्ष किंवा कोणत्या तरी नावाची आघाडी स्थापन करून निवडणुकीला सामोरे जातो. सविस्तर वाचा…
ठाणे : दिवाळी पहाट निमित्ताने ठाण्यातील मासुंदा तलावाच्या काठावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट, शिंदे गटाने आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक संस्थांच्या नावाने दिवाळी पहाट साजरी करणार आहेत.
Maharashtra Breaking News Live Today: शरद पवार गटाचा अजित पवारांना खोचक टोला
याला म्हणतात उत्तर देणं..! – शरद पवार गटाच्या मीडिया सेल पदाधिकाऱ्याची खोचक पोस्ट, शेअर केला ‘तो’ व्हिडीओ!
याला म्हणतात उत्तर देणं..!@RRPSpeaks @RRPSpeaks pic.twitter.com/e0GkP6QUBn
— yogesh sawant (@yogi_9696) October 29, 2024
मुंबई : दक्षिण मुंबईतील एकेकाळी काँग्रेसचा आणि आता भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने अमराठी उमेदवार दिल्यामुळे काही मराठी भाषकांनी एकत्र येऊन निवडणुकीसाठी मराठी उमेदवार उभा केला आहे.
डोंबिवली – दिवाळी सणानिमित्त गुरुवार, शुक्रवार डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावर तरुणाईचा जल्लोष असतो.
देवेंद्र फडणवीस साहेब , टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याचे कोणी सांगितले होते ? तर हे आपल्याच उद्योगमंत्र्यांनी २२ सप्टेबर २०२२ रोजी सांगितले होते. याचा अर्थ तेव्हापर्यंत हा प्रकल्प गुजरातला गेला नव्हता हे स्पष्ट आहे. तुमच्या म्हणण्यानुसार टाटा एअरबस गुजरातला आधीच गेला होता तर मग उद्योगमंत्री उदय सामंत हे महाराष्ट्राशी खोटे बोलले का ? एकतर तुम्ही खोटे बोलत आहात नाहीतर तुमचे मंत्री खोटे बोलत आहेत . खोटे पण रेटून बोलण्याची तुमची जुनी सवय महाराष्ट्राला चांगलीच ठाऊक आहे. कंत्राटी भरती रद्द करण्याची घोषण तुम्ही केली पण तुमच्या लाडक्या मित्राला दलालीचा प्रसाद मिळावा म्हणून तुम्ही कंत्राटी भरती पुन्हा सुरु केली, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देतो म्हणून तुम्ही आश्वासन दिले, त्यानंतर तुम्ही 750 कॅबिनेट घेतल्या पण निर्णय घेतला नाही .. राहिला प्रश्न वेदांत FOXCONN आणि राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीचा तर त्यासंदर्भात लवकर तुमचा खोटारडेपणा सविस्तरपणे जनतेसमोर आणेल..तयार रहा – रोहित पवार
देवेंद्र फडणवीस साहेब ,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 30, 2024
टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येत असल्याचे कोणी सांगितले होते ? तर हे आपल्याच उद्योगमंत्र्यांनी २२ सप्टेबर २०२२ रोजी सांगितले होते. याचा अर्थ तेव्हापर्यंत हा प्रकल्प गुजरातला गेला नव्हता हे स्पष्ट आहे. तुमच्या म्हणण्यानुसार टाटा एअरबस गुजरातला आधीच गेला… pic.twitter.com/9z1P1ucIh5
Maharashtra Assembly Election 2024: ठाकरे गटानं शेअर केला फडणवीसांचा ‘तो’ व्हिडीओ!
तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस नवाब मलिकचे अंडरवर्ल्ड आणि दाऊदशी असलेले संबंध उघड करत होते. आता महायुती नवाब मलिक यांना उमेदवारी देणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत निवडणूक लढवत आहे – उद्धव ठाकरे गट
तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस नवाब मलिकचे अंडरवर्ल्ड आणि दाऊदशी असलेले संबंध उघड करत होते. आता महायुती नवाब मलिक यांना उमेदवारी देणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत निवडणूक लढवत आहे. pic.twitter.com/Pp48fppRlR
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 30, 2024
Maharashtra Assembly Election 2024: संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
आबांचे केस फार लहान होते. ते केसानं गळा कापूच शकत नाहीत. अत्यंत प्रामाणिक व कर्तबगार असे ते गृहमंत्री होते. त्यांनी कधीच गृहमंत्री म्हणून चुकीचं काम केलेलं नाही. काल अजित पवारांनी आर. आर. पाटलांनी केलेली सही दाखवली. देवेंद्र फडणवीस व अजित पवारांवर गुन्हा दाखल व्हायला हवा. त्यांनी संविधानानुसार गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यांनी अशा प्रकारे गोपनीयतेचा भंग करणं गुन्हा आहे. राज्यपालांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले पाहिजेत. तुम्ही हे विषय कसे काय जनतेसमोर दाखवता आणि सांगता? – संजय राऊत</p>