Maharashtra Politics Updates Today : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा प्रमुख सामना या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. या विधानसभेच्या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. यातच ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काही मतदारसंघात बंडखोरी झालेली आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली तेथे काहीजण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात का? हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. या बरोबरच माहीम विधानसभा मतदारसंघावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबतं सुरु आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून सदा सरवणकर आपली उमेदवारी मागे घेतात का? याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच मनोज जरांगे पाटील हे आज आपल्या उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. सर्व उमेदवारांना मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी या ठिकाणी येण्याचं आवाहन केलं आहे. तसेच निवडणुकी संदर्भातील बातम्यांचा आढावा आणि राजकीय घडामोडी आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Breaking News Today, 03 November 2024 | ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने घडामोडीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

19:47 (IST) 3 Nov 2024
"२३ नोव्हेंबरला राज्यात बॉम्ब फुटणार", मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीला इशारा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचं राजकारण तापलं आहे. आता सर्वच पक्षांकडून प्रचारालाही सुरुवात करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली जाहीर प्रचारसभा कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्यासाठी पार पडली. या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. तसेच २३ नोव्हेंबर रोजी राज्यात बॉम्ब फुटणार आहे, असं म्हणत महाविकास आघाडीला मुख्यमंत्री शिंदे यांनी इशारा दिला. तसेच लाडक्या बहि‍णींना दर महिन्याला भाऊबीज मिळणार असून लाडक्या बहि‍णींना लखपती झालेलं पाहायचं आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.

18:21 (IST) 3 Nov 2024

भोसरी विधानसभा: बंडखोर रवी लांडगे आणि अजित गव्हाणे यांचं मनोमिलन भोसरीतील बंडखोरी शमली, रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार

भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

सविस्तर वाचा...

17:53 (IST) 3 Nov 2024
राज ठाकरे यांची राज्यातील पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी सभा ठाण्यात होणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राज्यातील पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी सभा ठाण्यात होणार आहे. उद्या सोमवारी (४ नोव्हेंबर २०२४) होणाऱ्या या सभांच्या निमित्ताने राज ठाकरे हे ठाणे जिल्ह्यात निवडणूक प्रचाराचा नारळ मनसे नेते प्रमोद (राजू) पाटील यांच्या डोंबिवलीतील सभेत फोडणार आहेत. ही जाहीर सभा कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर, उल्हासनगरचे उमेदवार भगवान भालेराव, मुरबाडच्या उमेदवार संगीताताई चेंदवणकर यांच्यासाठी असणार आहे. तसेच दुसरी जाहिस सभा मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासाठी ठाण्यात होईल, सदर सभा संदीप पाचंगे, कळवा मुंब्रा उमेदवार सुशांत सुर्यराव आणि मिराभाईंदर उमेदवार संदीप राणे यांच्यासाठीही असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

सभेचे ठिकाण व वेळ

पहिली सभा डोंबिवली आ.प्रमोद (राजू) पाटील

सोमवार, ४ नोव्हेंबर २०२४

वेळ: सायं ४.०० वाजता

स्थळ: श्री महावैष्णव मारुती मंदिर, पी & टी कॉलनी चौक, डोंबिवली (पूर्व)

दुसरी सभा- ठाणे उमेदवार अविनाश जाधव

सोमवार, ४ नोव्हेंबर २०२४

वेळ: सायं ६.०० वाजता

स्थळ: ब्रम्हांड सर्कल, आझादनगर, ठाणे

16:49 (IST) 3 Nov 2024
ठाण्यात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदुषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी दिवाळीनिमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत असल्यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक १९० वर पोहचला आहे.

सविस्तर वाचा...

16:34 (IST) 3 Nov 2024
जो गद्दारी करतो तो मुख्यमंत्री बनतो, उल्हासनगर भाजप जिल्हाध्यक्षाच्या वादग्रस्त वक्तव्याने तणाव

उल्हासनगर : ‘आज जो गद्दारी करतो तू मुख्यमंत्री बनतो, राजकारणाची आजची व्याख्या बदलली आहे’ असे गंभीर वक्तव्य उल्हासनगरच्या भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केले.

सविस्तर वाचा...

14:52 (IST) 3 Nov 2024
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा

ठाणे : संजय केळकर यांच्याविरोधात दंड थोपटत अपक्ष निवडणुक लढविण्याची घोषणा करणारे शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे या दोघांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बंड मागे घेतले आहे.

सविस्तर वाचा...

14:36 (IST) 3 Nov 2024
फुटीर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची आक्रमक रणनीती, भिवंडी ग्रामीणमध्ये जिल्ह्यातील पहिली सभा

ठाणे : पक्षातून फूटून गेलेल्या ४० आमदारांविरोधात उद्ध‌व ठाकरे यांनी आक्रमक प्रचार कराययचे ठरविले असून भिवंडी ग्रामीण मधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार शांताराम मोरे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यात आपली पहिली जाहीर सभा घेणार आहेत.

सविस्तर वाचा...

14:17 (IST) 3 Nov 2024
भिवंडीत उद्धव सेनेच्या बंडखोराला काँग्रेस नेत्याची साथ

ठाणे : वरळी आणि वांद्रे मतदार संघात मदत व्हावी म्हणून आमचा बळी दिला गेला का असा सवाल करत भिवंडी पूर्वेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी बंड करणारे रुपेश म्हात्रे यांना आता काँग्रेसच्या आगरी नेत्यांची साथ मिळू लागली आहे.

सविस्तर वाचा...

13:55 (IST) 3 Nov 2024
छगन भुजबळांचा जितेंद्र आव्हाडांना सल्ला; म्हणाले, "विचार करून शब्द वापरले पाहिजेत"

"आपण शब्द कुठले वापरावेत? याचा विचार जितेंद्र आव्हाड यांनी केला पाहिजे. विचार करून शब्द वापरले पाहिजेत. आपण कोणाला काय म्हणतो, कोणाला काय बोलतो? याचा विचार केला पाहिजे. जे तुमच्याबरोबर २५ ते ३० वर्ष राहिले आहेत. त्या सर्वांना ते लागू होतं. मला वाटतं की त्यांनी एवढ्यावर समजून घेतलं पाहिजे. कारण त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांना पुढे आणण्यात शरद पवारांचा हात आहे. तसं त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांना पुढे आणण्यात माझाही हात आहे हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी शब्द सांभाळून वापरले पाहिजेत", असा सल्ला छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे.

12:50 (IST) 3 Nov 2024
जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर बोलताना जीभ घसरली

"मुंब्र्यात एका सभेत बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांची जिभ घसरली. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, "अजित पवारांचा गट हा पाकिटमारांची टोळी आहे. जर तुमच्यात हिंमत होती, तुम्ही मर्दाची औलाद होती, तर मग तुम्ही स्वतःचे वेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती. मग आम्ही तुम्हाला मर्द समजले असते. ज्या काकांनी देशभरात स्वतःचा पक्ष पसरवला आणि वाढवला त्या पक्षाला तुम्ही माझं माझं म्हणत हिसकावून घेतला, पण जनतेला सत्य माहीत आहे", असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीका केली.

11:49 (IST) 3 Nov 2024

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मात्र, ऐन निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्ह्यात देवेंद्र गोडबोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सांगितली जात आहे. देवेंद्र गोडबोले हे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांना विधानसभेचं तिकीट न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.

11:13 (IST) 3 Nov 2024
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी, मुंबई पोलिसांना धमकी देणारा संदेश आला

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकी देणारा अनोळखी क्रमांकावरून एक संदेश प्राप्त झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन अलर्ट झालं आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास तातडीने सुरु करण्यात आला आहे.

10:16 (IST) 3 Nov 2024
मनोज जरांगे पाटील आज मोठा निर्णय घेणार; बोलावली तातडीची बैठक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आज आपल्या उमेदवारांना महत्वाचं आवाहन करत अंतरवाली सराटी या ठिकाणी बैठक बोलावली असून या बैठकीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सर्वांच्या मते एका-एका मतदारसंघात एक उमेदवार ठरवले जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra News

"लोकसभेला शरद पवारांना खूश केलं, आता...", अजित पवारांचं मतदारांना आवाहन "लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांच्या वयाचा आदर आणि विचार करून जर सुप्रिया सुळेंचा पराभव झाला तर शरद पवारांना धक्का बसेल असा विचार करून तुम्ही लोकसभेला शरद पवारांना खूश केलं आणि आम्हाला नाराज केलं. आता विधानसभेच्या निवडणुकीत मी उमेदवार आहे मला खूश करा", असं अजित पवार यांनी बारामतीत मेळाव्यात बोलताना म्हटलं आहे.

Story img Loader